< 1 Kronická 26 >
1 Zpořádání pak vrátných takové bylo: Z Chorejských Meselemiáš syn Chóre, z synů Azafových.
१द्वारपालांचे गट: हे पहारेकरी कोरहाच्या वंशजातील होते. त्यांची नावे अशी: आसाफाच्या वंशातील कोरहाचा पुत्र मेशेलेम्या.
2 A z Meselemiášových synů: Zachariáš prvorozený, Jediael druhý, Zebadiáš třetí, Jatniel čtvrtý,
२मेशेलेम्या याला पुत्र होते. जखऱ्या हा त्यातला मोठा. यदीएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा
3 Elam pátý, Jochanan šestý, Elioenai sedmý.
३एलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेनय सातवा.
4 A z Obededomových synů: Semaiáš prvorozený, Jozabad druhý, Joach třetí, Sachar čtvrtý a Natanael pátý,
४ओबेद-अदोम, याची अपत्ये. शमाया थोरला, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,
5 Amiel šestý, Izachar sedmý, Pehulletai osmý; nebo požehnal mu Bůh.
५अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमावर खरोखच कृपादृष्टी होती.
6 Semaiášovi pak synu jeho zrodili se synové, kteříž panovali v domě otce svého; nebo muži udatní byli.
६शमाया हा ओबेद-अदोमाचा पुत्र. त्यालाही पुत्र संतती होती. हे पुत्र सामर्थ्यवान असल्यामुळे त्यांची आपल्या घराण्यावर सत्ता होती.
7 Synové Semaiášovi: Otni a Refael, Obéd a Elzabad, jehož bratří byli muži udatní; též Elihu a Semachiáš.
७अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशल होते.
8 Všickni ti z potomků Obededomových, oni sami i synové jejich a bratří jejich, jeden každý muž udatný a způsobný k službě, šedesáte a dva všech z Obededoma.
८हे सर्व ओबेद-अदोमाचे वंशज त्याची अपत्ये, पुरुष नातेवाईक असे सर्वच निवासमंडपाच्या सेवेत बलवान व पराक्रमी होते. ओबेद-अदोमाचे एकंदर बासष्ट वंशज होते.
9 Též synů a bratří Meselemiášových, mužů silných, osmnáct.
९मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते.
10 Z Chosových pak, kterýž byl z synů Merari, synové byli: Simri kníže. Ačkoli nebyl prvorozený, však postavil ho otec jeho za předního.
१०मरारीच्या वंशातला होसा. शिम्रीला ज्येष्ठपद दिले होते. हा जन्माने ज्येष्ठ नव्हता, पण त्याच्या पित्याने त्यास मुख्य केले होते.
11 Helkiáš druhý, Tebaliáš třetí, Zachariáš čtvrtý. Všech synů a bratří Chosových třinácte.
११हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसास पुत्र आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.
12 Těm rozděleny jsou povinnosti, aby byli vrátnými po mužích předních, držíce stráž naproti bratřím svým při službě v domě Hospodinově.
१२यांना द्वारपालांच्या गटांवर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते.
13 Nebo metali losy, jakož malý, tak veliký, po domích svých otcovských, k jedné každé bráně.
१३एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यामध्ये वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता.
14 I padl los k východu Selemiášovi. Zachariášovi také synu jeho, rádci opatrnému, uvrhli losy, i padl los jeho na půlnoci.
१४शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा पुत्र जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा समजदार मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली.
15 Obededomovi pak na poledne, ale synům jeho na dům pokladů.
१५ओबेद-अदोमाच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमाच्या मुलांकडे आले.
16 Suppimovi a Chosovi na západ s branou Salléchet, na cestě podlážené vzhůru jdoucí. Stráž byla naproti stráži.
१६शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथाची चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. प्रत्येक घराण्यासाठी पहारेकरी स्थापित केले होते.
17 K východu Levítů šest, k půlnoci na den čtyři, ku poledni na den čtyři, a při domě pokladů dva a dva,
१७पूर्वेला सहा लेवी, उत्तरेला प्रतिदिनी चार, दक्षिणेला प्रतिदिनी चार आणि भांडाराच्या रक्षणासाठी दोन जोड्या होत्या.
18 V straně zevnitřní k západu, po čtyřech k příkopu, po dvou k straně zevnitřní.
१८पश्चिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत, चारजण त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि दोन शिवारात असत.
19 Ta jsou zpořádání vrátných synů Chóre a synů Merari.
१९हे व्दारपालांचे वर्ग होते. कोरहाचे वंशज आणि मरारीरीचे वंशज यांनी ते भरले होते.
20 Tito také Levítové: Achiáš byl nad poklady domu Božího, totiž nad poklady věcí posvátných.
२०देवाच्या मंदिरातील भांडारावर आणि समर्पित वस्तूंच्या भांडारावर लेव्यातला अहीया हा प्रमुख होता.
21 Z synů Ladanových synové Gersunských, z Ladana knížata otcovských čeledí, z Ladana totiž Gersunského Jechiel.
२१लादान हा गेर्षोनाच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक होता.
22 Synové Jechielovi, Zetam a Joel bratr jeho, byli nad poklady domu Hospodinova.
२२जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे पुत्र होते. परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावर देखरेख ठेवणारे होते.
23 Z Amramských, z Izarských z Hebronských a z Ozielských.
२३अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांतूनसुध्दा आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.
24 Sebuel pak syn Gersoma, syna Mojžíšova, přední nad poklady.
२४मोशेचा पुत्र गेर्षोम, याचा पुत्र शबुएल हा भांडारावर देखरेख करणारा नायक होता.
25 Ale bratří jeho z Eliezera: Rechabiáš syn jeho, a Izaiáš syn jeho, a Joram syn jeho, a Zichri syn jeho, a Selomit syn jeho.
२५अलियेजराकडून त्याचे भाऊबंद: अलियेजाराचा पुत्र हा रहब्या होता. रहब्याचा पुत्र यशया. यशयाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र जिख्री. आणि जिख्रीचा पुत्र शलोमोथ.
26 Ten Selomit a bratří jeho byli nade všemi poklady věcí posvátných, kterýchž byl posvětil David král a knížata čeledí otcovských, i hejtmané a setníci s vývodami vojska.
२६दावीद राजा व पित्याच्या प्रमुखांनी व हजारांचे व शंभरांचे सेनापती आणि सैन्याचे सरदार यांनी मंदिरासाठी समर्पित केलेल्या वस्तूच्या भांडारावर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद देखरेख करत होते.
27 Nebo z bojů a z kořistí obětovávali k opravě domu Hospodinova,
२७युध्दात मिळालेल्या काही लूटीपैकी त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी समर्पित केली.
28 A čehožkoli byl posvětil Samuel prorok, a Saul syn Cis, a Abner syn Nerův, a Joáb syn Sarvie. Kdokoli posvěcoval čeho, dával do rukou Selomita a bratří jeho.
२८शमुवेल संदेष्टा, कीशचा पुत्र शौल आणि नेरचा पुत्र अबनेर, सरुवेचा पुत्र यवाब यांनी परमेश्वरास समर्पित केलेल्या प्रत्येक पवित्र वस्तूंचे रक्षणही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत.
29 Z Izarských Chenaniáš a synové jeho, nad dílem, kteréž vně děláno, byli v Izraeli za úředníky a soudce.
२९इसहाराच्या वंशजापैकी कनन्या व त्याची अपत्ये इस्राएलांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख होते. ते अधिकारी व न्यायधीश होते.
30 Z Hebronských Chasabiáš a bratří jeho, mužů silných tisíc a sedm set bylo v přednosti nad Izraelem, za Jordánem k západu, ve všelikém díle Hospodinově a v službě královské.
३०हेब्रोनी वंशातला, हशब्या व त्याचे भाऊबंद, एक हजार सातशे शूर वीर, यार्देनेच्या अलिकडे पश्चिमेस, परमेश्वराच्या सेवेसाठी व राजाच्या कामासाठी इस्राएलावर देखरेख करत होते.
31 Mezi kterýmiž Hebronskými Jeriáš kníže byl nad Hebronskými v pokolení jejich, po čeledech otcovských; nebo léta čtyřidcátého kralování Davidova vyhledáváni byli, a nalezeni jsou mezi nimi muži udatní v Jazar Galádské,
३१हेब्रोनी यांच्या वंशातला यरीया हा त्यांच्या वंशाचा प्रमुख होता, त्याच्या घराण्यावरुन त्याची मोजणी केली. दावीदाच्या राज्याच्या कारकिर्दीच्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा तपास केला आणि त्यांना गिलाद मधल्या याजेर नगरात कर्तबगार अशी माणसे आढळली.
32 A bratří jeho, mužů silných, dva tisíce a sedm set, knížat otcovských čeledí. Kteréž ustanovil David král nad Rubenskými a Gádskými, a nad polovicí pokolení Manassesova, ve všech věcech Božských i věcech královských.
३२आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे दोन हजार सातशे नातलग यरीयाला होते. देवाच्या प्रत्येक कार्यासाठी आणि राज्याचे कामकाज यासाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे दोन हजार सातशे जण दावीदाने नेमले.