< 1 Kronická 13 >

1 David pak poradil se s hejtmany nad tisíci, s setníky a se všemi vývodami.
दावीदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला.
2 A řekl David všemu shromáždění Izraelskému: Jestliže se vám líbí, a jestli to od Hospodina Boha našeho, rozešleme posly k bratřím našim pozůstalým do všech zemí Izraelských, a též kněžím a Levítům do měst a předměstí jejich, a nechť se shromáždí k nám,
मग दावीदाने इस्राएलमधील सर्व मंडळीस म्हटले. “तुम्हास जर हे योग्य वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याच्याकडून हे असेल तर आपले भाऊ, इस्राएलाच्या सर्व प्रदेशात राहिलेले आहेत त्यास आपापल्या नगरांत व खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांना आपणाकडे एकत्र जमण्यास त्यांच्याकडे दूत पाठवू.
3 Abychom zase k nám přivezli truhlu Boha našeho; nebo jsme jí nehledali ve dnech Saulových.
आपल्या देवाचा कोश आपणाकडे पुन्हा आणू. शौल राज्य करत असताना आपण त्याचा शोध केला नाही.”
4 I řeklo všecko množství, aby se tak stalo; nebo líbila se ta věc všemu lidu.
तेव्हा सर्व मंडळीने या गोष्टी करण्याची सहमती दिली कारण ती गोष्ट सर्व लोकांच्या दृष्टीने बरोबर होती.
5 Protož shromáždil David všecken lid Izraelský od Nílu Egyptského, až kudy se vchází do Emat, aby přivezli truhlu Hospodinovu z Kariatjeharim.
किर्याथ-यारीमाहून देवाचा कोश आणण्यासाठी दावीदाने मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हमाथच्या प्रदेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले.
6 A tak vstoupil David a všecken lid Izraelský do Bála, v Kariatjeharim, kteréž jest v Judstvu, aby přenesli odtud truhlu Boha Hospodina, sedícího nad cherubíny, jehož se jméno vzývá.
करुबांवरती राहणारा देवाचा कोश, ज्याला परमेश्वर देवाचे नाव ठेवले आहे तो, यहूदातील बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून दावीदासह सर्व इस्राएली तिकडे चढून वर गेले.
7 I vstavili truhlu Boží na nový vůz, vzavše ji z domu Abinadabova, Uza pak a Achio spravovali vůz.
मग त्यांनी देवाचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून, तो नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते.
8 Ale David a všecken lid Izraelský hrali před Bohem ze vší síly, v zpěvích na harfy, na loutny, na bubny, na cymbály a na trouby.
दावीद आणि सर्व इस्राएल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.
9 A když přišli až k humnu Kídon, vztáhl Uza ruku svou, aby pozdržel truhly; nebo uchýlili se volové.
किदोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोश धरण्यास हात पुढे केला.
10 Protož rozhněval se Hospodin na Uzu a zabil jej, proto že vztáhl ruku svou k truhle; a umřel tu před Bohem.
१०तेव्हा परमेश्वराचा उज्जावर कोप भडकला व उज्जाने कोशाला हात लावला म्हणून त्याने त्यास मारले आणि तेथे तो देवासमोर मेला.
11 Tedy zkormoutil se David, proto že se Hospodin tak přísně obořil na Uzu. I nazval to místo Perez Uza až do tohoto dne.
११परमेश्वराने उज्जाला असा मार दिला. याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा असे आहे.
12 A boje se David Boha v ten den, řekl: Kterakž mám k sobě přivezti truhlu Boží?
१२दावीदाला त्यादिवशी देवाची भीती वाटली. तो म्हणाला, “आपल्या घरी मी देवाचा कोश कसा आणू?”
13 Pročež nepřenesl David truhly k sobě do města Davidova, ale obrátil ji do domu Obededoma Gittejského.
१३त्यामुळे दावीदाने दावीद नगरात तो कोश आणला नाही, पण तो ओबेद-अदोम गीत्ती याच्या घरात एकाबाजूला नेऊन ठेवला.
14 I pozůstala truhla Boží mezi čeledí Obededomovou, v domě jeho za tři měsíce, a požehnal Hospodin domu Obededomovu a všem věcem jeho.
१४मग देवाचा कोश ओबेद-अदोम याच्या घरात तीन माहिने राहिला. परमेश्वराने त्याच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला आशीर्वादित केले.

< 1 Kronická 13 >