< Žalmy 91 >
1 Ten, kdož v skrýši Nejvyššího přebývá, v stínu Všemohoucího odpočívati bude.
१जो परात्पराच्या आश्रयात राहतो, तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.
2 Dím Hospodinu: Útočiště mé a hrad můj, Bůh můj, v němž naději skládati budu.
२मी परमेश्वराविषयी म्हणेन की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे, माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.”
3 Onť zajisté vysvobodí tě z osídla lovce, a od nejjedovatějšího nakažení morního.
३कारण तो तुला पारध्याच्या पाशातून आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.
4 Brky svými přikryje tě, a pod křídly jeho bezpečen budeš; místo štítu a pavézy budeš míti pravdu jeho.
४तो तुला आपल्या पंखानी झाकील, आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे.
5 Nebudeš se báti přístrachu nočního, ani střely létající ve dne.
५रात्रीच्या दहशतीचे भय, किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला,
6 Ani nakažení morního, vlekoucího se v mrákotě, ani povětří morního, v polední čas hubícího.
६किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस.
7 Padne jich po boku tvém tisíc, a deset tisíců po pravici tvé, ale k tobě se to nepřiblíží.
७तुझ्या एका बाजूला हजार पडले, आणि तुमच्या उजव्या हातास दहा हजार पडले, पण तरी ती तुझ्याजवळ येणार नाही.
8 Očima toliko svýma to spatříš, a odplatě bezbožných se podíváš.
८तू मात्र निरीक्षण करशील, आणि दुष्टांना झालेली शिक्षा पाहशील.
9 Poněvadž jsi Hospodina, kterýž útočiště mé jest, a Nejvyššího za svůj příbytek položil,
९कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्परालासुद्धा आपले आश्रयस्थान केले आहेस.
10 Nepřihodí se tobě nic zlého, aniž se přiblíží jaká rána k stánku tvému.
१०तुमच्यावर वाईट मात करणार नाही. तुमच्या घराजवळ कोणतीही पिडा येणार नाही.
11 Nebo andělům svým přikázal o tobě, aby tě ostříhali na všech cestách tvých.
११कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
12 Na rukou ponesou tě, abys neurazil o kámen nohy své.
१२ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील अशासाठी की, तू घसरून दगडावर पडू नये.
13 Po lvu a bazališku choditi budeš, a pošlapáš lvíče i draka.
१३तू आपल्या पायाखाली सिंह आणि नागाला चिरडून टाकशील; तू सिंह व अजगर ह्याला तुडवीत चालशील.
14 Poněvadž mne, dí Bůh, zamiloval, vysvobodím jej, a vyvýším; nebo poznal jméno mé.
१४तो माझ्याशी निष्ठावान आहे, म्हणून मी त्यास सोडवीन; मी त्यास सुरक्षित ठेवीन कारण तो माझ्याशी प्रामाणिक आहे.
15 Vzývati mne bude, a vyslyším jej; já s ním budu v ssoužení, vytrhnu a oslavím jej.
१५जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्यास उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन; मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन.
16 Dlouhostí dnů jej nasytím, a ukáži jemu spasení své.
१६मी त्यास दीर्घायुष्य देईन, आणि त्यास माझे तारण दाखवीन.