< Ezechiel 30 >

1 Opět se stalo slovo Hospodinovo ke mně, řkoucí:
परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
2 Synu člověčí, prorokuj a rci: Takto praví Panovník Hospodin: Kvělte: Ach, nastojte na tento den.
“मानवाच्या मुला, भविष्य सांग आणि म्हण. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, विलाप करा, मोठ्या शोकाचे दिवस येत आहे!
3 Nebo blízko jest den, blízko jest, pravím, den Hospodinův, den mrákoty, čas národů bude.
तो दिवस नजीक आहे. परमेश्वराचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांसाठी न्यायाची वेळ असेल.
4 A přijde meč do Egypta, a bude přetěžká bolest v Mouřenínské zemi, když padati budou zbití v Egyptě, a poberou zboží jeho, a zbořeni budou základové jeho.
मग मिसराविरूद्ध तलवार येईल आणि जेव्हा मारलेले लोक मिसरात पडतील तेव्हा कूशात वेदना होतील, ते तिची संपत्ती घेऊन जातील आणि तिचे पाये नष्ट होतील.
5 Mouřenínové a Putští i Ludští i všelijaká směsice, též Kubští i obyvatelé země smlouvy s nimi mečem padnou.
कूशी, पूटी, लूदी आणि सर्व परदेशी, याजबरोबर करार केलेले लोक त्यासह तलवारीने पडतील.
6 Takť praví Hospodin, že padnou podpůrcové Egypta, a snížena bude vyvýšenost síly jeho; od věže Sevéne mečem padati budou v ní, praví Panovník Hospodin.
परमेश्वर असे म्हणतो, मग जो कोणी एक मिसराला मदत करील तो पडेल आणि तिच्या सामर्थ्याचा गर्व खाली उतरेल. मिग्दोलापासून सवेनेपर्यंतचे त्याचे सैनिक तलवारीने पडतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
7 I budou v pustinu obráceni nad jiné země pusté, a města jejich nad jiná města pustá budou.
ते जे देश ओसाड झाले आहेत त्यांच्यामध्ये ते घृणास्पद होतील आणि त्यांची नगरे नाश झालेल्या नगरात असतील.
8 I zvědí, že já jsem Hospodin, když zapálím oheň v Egyptě, a potříni budou všickni pomocníci jeho.
जेव्हा मी मिसरामध्ये आग लावीन आणि तिच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
9 V ten den vyjdou poslové od tváři mé na lodech, aby přestrašili Mouřenínskou zemi ubezpečenou, i budou míti bolest přetěžkou, jakáž byla ve dni Egypta; nebo aj, přicházíť.
त्या दिवशी, सुरक्षित कूशी लोकांस दहशत बसवायला माझ्यापासून दूत जहाजात बसून निघून जातील; आणि त्या दिवशी तेथे मिसरांच्यामध्ये न चुकणाऱ्या वेदना त्यांच्यावर येतील. कारण पाहा! ती येत आहे!
10 Takto praví panovník Hospodin: Učiním zajisté konec množství Egyptskému skrze ruku Nabuchodonozora krále Babylonského.
१०प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी मिसराचा समुदाय बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाताने नाहीसा करीन.
11 On i lid jeho s ním, nejukrutnější národové přivedeni budou, aby zkazili tu zemi; nebo vytrhnou meče své na Egypt, a naplní tu zemi zbitými.
११तो व त्याच्याबरोबर त्याची सेना, राष्ट्राची दहशत, देशाचा नाश करण्यासाठी आणण्यात येईल; ते मिसराविरूद्ध आपल्या तलवारी काढतील व देश मरण पावलेल्या लोकांनी भरुन टाकतील.
12 A obrátě řeky v sucho, prodám tu zemi v ruku nešlechetných, a tak v pustinu uvedu zemi, i což v ní jest, skrze ruku cizozemců. Já Hospodin mluvil jsem.
१२मी नद्यांना कोरडी भूमी करीन आणि मी देश दुष्ट मनुष्यांच्या हाती विकत देईन. मी, परमेश्वर, सांगतो की परक्यांच्या हातून हा देश व यातले सर्व काही यांची नासधूस करवीन. मी, परमेश्वर, असे सांगत आहे.
13 Takto praví Panovník Hospodin: Zkazím i ukydané bohy, a konec učiním modlám v Nof, a knížete z země Egyptské nebude více, když pustím strach na zemi Egyptskou.
१३प्रभू परमेश्वर असे म्हणतोः मी मूर्तींचा नाश करीन आणि मी नोफातून कवडीमोलाच्या मूर्त्त्यां नाहीशा करीन. ह्यापुढे मिसर देशामध्ये कोणीही अधिपती होणार नाही आणि मी मिसर देशावर दहशत ठेवीन.
14 Nebo pohubím Patros, a zapálím oheň v Soan, a vykonám soudy v No.
१४मी पथ्रोसला ओसाड करीन. व सोअनास आग लावीन. मी नो याला न्यायदंड करीन.
15 Vyleji prchlivost svou i na Sin, pevnost Egyptskou, a vypléním množství No.
१५कारण मी मिसराचा बालेकिल्ला जो सीन त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन. व नोच्या समुदायाला कापून काढीन.
16 Když zapálím oheň v Egyptě, velikou bolest bude míti Sin, a No bude roztrháno, Nof pak nepřátely bude míti ve dne.
१६मी मिसराला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील व नो मोडून पडेल. प्रत्येक दिवशी नोफावर शत्रू येतील.
17 Mládenci On a Bubastští mečem padnou, panny pak v zajetí půjdou.
१७आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील आणि त्यांची नगरे बंदिवासात जातील.
18 A v Tachpanches zatmí se den, když tam polámi závory Egypta, a přítrž se stane v něm vyvýšenosti síly jeho. Mrákota jej přikryje, dcery pak jeho v zajetí půjdou.
१८जेव्हा मी तहपन्हेस येथे मिसराची जोखडे तोडीन तेव्हा त्यादिवशी मी त्यांचा प्रकाश धरून ठेवीन आणि त्यांच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा होईल. तिला ढग झाकेल आणि तिच्या मुलींना कैद करून नेले जाईल.
19 A tak vykonám soudy při Egyptu, i zvědí, že já jsem Hospodin.
१९अशा रीतीने, मी मिसरावर न्यायादंड आणीन, मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
20 Opět bylo jedenáctého léta, prvního měsíce, sedmého dne, že se stalo slovo Hospodinovo ke mně, řkoucí:
२०मग अकराव्या वर्षात, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
21 Synu člověčí, rámě Faraona krále Egyptského zlámal jsem, a aj, nebudeť uvázáno, ani přičiněno lékařství, aniž přiložen bude šat pro obvázání jeho a posilnění jeho k držení meče.
२१“मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारो याचा भुज मी मोडला आहे. पाहा! त्याच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून त्यास बरे करण्यासाठी औषधोपचार करून पट्टी लावून त्यास कोणीही बांधले नाही.
22 Protož takto praví panovník Hospodin: Aj, já jsem proti Faraonovi králi Egyptskému, a polámi ramena jeho, i sílu jeho, i budeť zlámané, a vyrazím meč z ruky jeho.
२२यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मिसराचा राजा फारो! याच्याविरूद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला आहे तोही मोडीन. आणि त्याच्या हातातून तलवार गळून पडेल असे मी करीन.
23 A rozptýlím Egyptské mezi národy, a rozženu je do zemí.
२३मग मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन आणि त्यांना देशामध्ये उधळून लावीन.
24 Posilním zajisté ramen krále Babylonského, a dám meč svůj v ruku jeho, i polámi ramena Faraonova, tak že stonati bude před ním, jakž stonává smrtelně raněný.
२४मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन. आणि आपली तलवार त्यांच्या हाती देईन. यासाठी की, मी फारोचे बाहू तोडीन. मग तो बाबेल राजासमोर मरणाऱ्या मनुष्याप्रमाणे कण्हण्यांनी कण्हून ओरडेल.
25 Posilním, pravím, ramen krále Babylonského, ramena pak Faraonova klesnou. I zvědí, že já jsem Hospodin, když dám meč svůj v ruku krále Babylonského, aby jej vztáhl na zemi Egyptskou.
२५कारण मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन, पण फारोचे बाहू गळून पडतील. जेव्हा मी मिसर देशावर उगारण्यासाठी आपली तलवार बाबेल राजाच्या हातात ठेवीन. मग तो तीने त्यांच्या देशावर हल्ला करील. तेव्हा ते जाणतील की परमेश्वर आहे.
26 A tak rozptýlím Egyptské mezi národy, a rozženu je do zemí, i zvědí, že já jsem Hospodin.
२६म्हणून मी मिसऱ्यांना राष्ट्रांत विखरुन टाकीन आणि त्यांना देशातून पांगविन. मग ते जाणतील की मीच परमेश्वर आहे.”

< Ezechiel 30 >