< 2 Samuelova 4 >
1 A když uslyšel Izbozet syn Saulův, že umřel Abner v Hebronu, zemdlely ruce jeho, a všecken lid Izrael byl předěšen.
१हेब्रोन येथे अबनेर मरण पावल्याचे शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला कळले. तेव्हा तो आणि इतर सर्व इस्राएली लोक भयभीत झाले.
2 Měl pak syn Saulův dva muže hejtmany nad dráby, jméno jednoho Baana, a jméno druhého Rechab, synové Remmona Berotského z synů Beniamin; nebo i Berot počítá se v Beniaminovi.
२शौलाच्या पुत्राजवळ दोन माणसे सेनानायक होती; रेखाब आणि बाना ही त्यांची नावे होती. हे रिम्मोनचे पुत्र. रिम्मोन हा बैरोथचा, बैरोथ नगर बन्यामीन वंशाचे, म्हणून हे ही बन्यामिनी होत.
3 Utekli pak byli Berotští do Gittaim, a byli tam pohostinu až do toho dne.
३पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले. अजूनही ते तिथेच आहे.
4 Měl také byl Jonata syn Saulův syna chromého na nohy, ( nebo když byl v pěti letech a přišla pověst o Saulovi a Jonatovi z Jezreel, vzavši ho chůva jeho, utíkala, a když pospíchala utíkajici, on upadl a okulhavěl), jehož jméno Mifibozet.
४शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्यास घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला.
5 A odšedše synové Remmona Berotského, Rechab a Baana, vešli o poledni do domu Izbozetova. On pak spal na lůžku poledním.
५बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता.
6 A aj, když vešli až do domu, jako by bráti měli obilé, ranili ho v páté žebro, Rechab a Baana bratr jeho, a utekli.
६गहू घेण्याच्या आमिषाने रेखाब आणि बाना घरात घूसले त्यांनी त्याच्या पोटावर वार केला; मग ते दोघेही निसटून गेले.
7 Nebo když byli vešli do domu, a on spal na lůžku svém v pokojíku svém, kdež léhal, probodli jej a zabili, a sťavše hlavu jeho, vzali ji, a šli cestou po pustinách celou tu noc.
७ते घूसले तेव्हा आपल्या शयनगृहात ईश-बोशेथ झोपला होता. त्याच्यावर हल्ला करून या दोघांनी त्यास ठार मारले. त्याचे शीर धडावेगळे करून ते बरोबर घेतले. मग यार्देनच्या खोऱ्यातून रात्रभर वाटचाल करत.
8 I přinesli hlavu Izbozetovu k Davidovi do Hebronu a řekli králi: Aj, hlava Izbozeta syna Saulova, nepřítele tvého, kterýž hledal bezživotí tvého. Hle, pomstil dnes Hospodin pána mého krále nad Saulem i semenem jeho.
८ते हेब्रोन येथे पोहोचले आणि दावीदाला त्यांनी ईश-बोशेथचे मस्तक अर्पण केले. रेखाब आणि बाना दावीद राजाला म्हणाले, “शौल पुत्र ईश-बोशेथ या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलाला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शासन केले.”
9 Tedy odpovídaje David Rechabovi a Baanovi bratru jeho, synům Remmona Berotského, řekl jim: Živť jest Hospodin, kterýž vysvobodil duši mou ze všech úzkostí,
९पण दावीद बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना यांना म्हणाला, “देवाची शपथ परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटातून सोडवले आहे.
10 Kdyžť jsem toho, kterýž mi oznámil, řka: Aj, Saul zahynul, (ješto se jemu zdálo, že veselé noviny zvěstuje, ) vzal a zabil jsem ho v Sicelechu, jemuž se zdálo, že ho budu darovati za poselství:
१०यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पाहा शौल मेला त्यास वाटले या बातमीबद्दल मी त्यास बक्षीस देईन पण मी त्यास धरून सिकलाग येथे ठार केले.
11 Čím pak více lidi bezbožné, kteříž zamordovali muže spravedlivého v domě jeho na ložci jeho? A nyní, zdaliž nebudu vyhledávati krve jeho z ruky vaší, a nevyhladím vás z země?
११तुम्हासही आता ठार करून या भूमीवरून नष्ट केले पाहिजे. कारण, आपल्या घरात, आपल्या बिछान्यावर झोपलेल्या एका चांगल्या मनुष्यास तुम्ही दुष्टाव्याने ठार केलेत.”
12 I rozkázal David služebníkům, aby je zbili. I zutínali jim ruce i nohy jejich, a pověsili u rybníka při Hebronu. Hlavu pak Izbozetovu vzavše, pochovali v hrobě Abnerově v Hebronu.
१२असे म्हणून दावीदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अबनेरच्या कबरीजवळच त्यांनी ईश-बोशेथच्या मस्तकाचे दफन केले.