< 2 Korintským 6 >

1 Protož napomáhajíce, i napomínáme vás, abyste milosti Boží nadarmo nebrali,
म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
2 (Neboť praví: V čas příhodný uslyšel jsem tě, a v den spasení spomohl jsem tobě. Aj, nyníť jest čas příhodný, aj, nyní dnové spasení.)
कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा, आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे.
3 Žádného nedávajíce v ničemž pohoršení, aby bylo bez ouhony přisluhování,
या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला, अडखळण्यास कारण होत नाही.
4 Ale ve všem se chovajíce jako Boží služebníci, ve mnohé trpělivosti, v utištěních, v nedostatcích, v úzkostech,
उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात;
5 V ranách, v žalářích, v nepokojích, v pracech, v bděních, v postech,
फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत;
6 V čistotě, v umění, v dlouhočekání, v dobrotivosti, v Duchu svatém, v lásce neošemetné,
शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने;
7 V slovu pravdy, v moci Boží, skrze odění spravedlnosti na pravo i na levo,
खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्त्वाची शस्त्रे बाळगून,
8 Skrze slávu i pohanění, skrze zlou i dobrou pověst, jako bludní, a jsouce pravdomluvní,
गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत,
9 Jako neznámí, a jsouce známí, jako umírající, a aj, živi jsme, jako potrestaní, a nezmordovaní,
अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही.
10 Jako smutní, a však se vždycky radujíce, jako chudí, však mnohé zbohacujíce, jako nic nemajíce, a však všemi věcmi vládnouce.
१०आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
11 Ústa naše otevřína jsou k vám, ó Korinští, srdce naše rozšířeno jest.
११अहो करिंथकर बंधूंनो, तुमच्यासाठी आम्ही तोंड उघडले आहे आणि आमचे अंतःकरण मोठे झाले आहे.
12 Nejste v nás ssouženi, než ssouženi jste v střevách svých.
१२आमच्यात तुम्ही संकुचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्याविषयी संकुचित झाला आहात.
13 O takovéžť pak odměně jakožto synům pravím: Rozšiřtež se i vy.
१३आता तुम्हीही असलीच फेड करून तुमचेही अंतःकरण मोठे करा. हे मी तुम्हास मुले म्हणून सांगतो.
14 Netáhněte jha s nevěřícími. Nebo jaký jest spolek spravedlnosti s nepravostí? A jaké obcování světla s temnostmi?
१४विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?
15 A jaké srovnání Krista s Beliálem? Aneb jaký díl věrnému s nevěrným?
१५ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?
16 A jaké spolčení chrámu Božího s modlami? Nebo vy jste chrám Boha živého, jakž pověděl Bůh: Přebývati budu v nich, a procházeti se, a budu jejich Bohem, a oni budou mým lidem.
१६आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’
17 A protož vyjdětež z prostředku jejich, a oddělte se, praví Pán; a nečistého se nedotýkejte, a já přijmu vás.
१७आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन.
18 A budu vám za Otce, a vy mi budete za syny a za dcery, praví Pán všemohoucí.
१८आणि मी तुम्हास पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’

< 2 Korintským 6 >