< 1 Korintským 8 >
1 V těch pak věcech, kteréž modlám obětovány bývají, víme, že všickni známost máme. A známost nadýmá, ale láska vzdělává.
१आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण प्रीती उभारणी करते.
2 Zdá-li se pak komu, že něco umí, ještě nic nepoznal, tak jakž by měl znáti.
२आपण एखादी गोष्ट जाणतो असे कोणाला वाटत असेल, तर ती जशी समजली पाहिजे तशी अजून तो जाणत नाही.
3 Ale jestliže kdo miluje Boha, tenť jest vyučen od něho,
३पण कोणी देवावर प्रीती करीत असेल तर त्या मनुष्यास देव ओळखतो.
4 A protož o pokrmích, kteříž se modlám obětují, víme, že modla na světě nic není, a že není jiného žádného Boha než jeden.
४म्हणून आता, मूर्तींना वाहिलेल्या पदार्थांच्या सेवनाविषयी आपण जाणतो की, जगात मूर्ती ही काहीच नाही आणि एकाशिवाय दुसरा देव नाही,
5 Nebo ačkoli jsou někteří, ješto slovou bohové, i na nebi i na zemi, (jakož jsou mnozí bohové, a páni mnozí, )
५कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर देव म्हणलेले पुष्कळ असले, कारण तसे पुष्कळ दैवत आणि पुष्कळ प्रभू असतील,
6 Ale my máme jediného Boha Otce, z něhož všecko, a my v něm, a jednoho Pána Ježíše Krista, skrze něhož všecko, i my skrze něho.
६परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्वकाही निर्माण झाले आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याच्या द्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्या द्वारे आपण जगतो.
7 Ale ne ve všechť jest to umění. Nebo někteří s svědomím pro modlu až do dnes jako modlám obětované jedí, a svědomí jejich, jsuci mdlé, poškvrňuje se.
७पण हे ज्ञान प्रत्येक मनुष्यास असणार नाही कारण मूर्तींविषयी जे विवेक बाळगतात असे कित्येकजण, या घटकेपर्यंत, ते मूर्तीला वाहिलेले नैवेद्य खात आहेत; आणि त्यांचा विवेक दुर्बळ असल्यामुळे अशुद्ध होतो.
8 Nečiníť pak nás pokrm vzácných Bohu. Nebo budeme-li jísti, nic tím lepší nebudeme, a nebudeme-li jísti, nic horší nebudeme.
८पण अन्नामुळे देवापुढे आपली योग्यता ठरत नाही, आपण न खाण्याने कमी ठरत नाही किंवा खाण्याने अधिक ठरत नाही.
9 Ale vizte, aťby snad ta vaše moc nebyla k urážce mdlým.
९पण तुमचे हे स्वातंत्र्य दुर्बळ असलेल्यास, कोणत्याही प्रकारे, अडखळण होऊ नये म्हणून काळजी घ्या.
10 Nebo uzří-li kdo tebe, majícího známost, a ty sedíš při pokrmu modlám obětovaném, zdaliž svědomí toho, kterýž jest mdlý, nebude přivedeno k tomu, aby také jedl modlám obětované?
१०कारण ज्ञान असलेल्या तुला जर मूर्तीच्या असलेल्या ठिकाणी भोजनास बसलेले कोणी बघितले, तर तो दुर्बळ असल्यास त्याचा विवेक मूर्तींना वाहिलेले पदार्थ खाण्यास तयार होईल ना?
11 I zahyne pro to tvé vědění bratr mdlý, za kteréhož Kristus umřel.
११आणि ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला अशा दुर्बळ असलेल्या तुझ्या बंधूचा तुझ्या या ज्ञानामुळे नाश होतो.
12 A tak hřešíce proti bratřím, a urážejíce svědomí jejich mdlé, proti Kristu hřešíte.
१२पण तुम्ही जेव्हा अशाप्रकारे बंधूच्या विरूद्ध पाप करून त्यांचा दुर्बळ असलेला विवेक तुम्ही दुखावता, तेव्हा तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.
13 A protož jestližeť pohoršuje pokrm bratra mého, nebudu jísti masa na věky, abych nezhoršil bratra svého. (aiōn )
१३म्हणून, जर माझ्या बंधूला अन्नाने अडखळण होत असेल तर माझ्या बंधूंना अडथळा होण्यास मी कारणीभूत होऊ नये म्हणून मी कधीही मांस खाणार नाही. (aiōn )