< Ruta 4 >

1 Boaz potom iziđe na gradska vrata i sjede ondje. I gle, naiđe onaj skrbnik o kome je govorio. I dozva ga Boaz: “Ej, hodi ovamo i sjedni!” Onaj dođe i sjede.
आता बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला, तेव्हा हा त्यास म्हणाला, “मित्रा, येथे येऊन बस.” तेव्हा तो तेथे जाऊन बसला.
2 Onda Boaz uze deset ljudi između starješina gradskih i reče: “Posjedajte ovdje!” I posjedaše.
मग गावातील दहा वडील जनांना बोलावून तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा” आणि तेसुध्दा बसले.
3 Zatim reče skrbniku: “Noemi, koja se vratila s Moapskih polja, htjela bi prodati ono zemlje našega brata Elimeleka.
मग तो त्या जवळच्या नातलगाला म्हणाला, “मवाब देशातून नामी आली आहे; ती तुझा माझा बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे,
4 Zato sam odlučio da se s tobom razgovorim i predložim ti: otkupi njivu pred ovima koji sjede ovdje i pred starješinama moga naroda. Ako je kaniš otkupiti, onda otkupi; ako ne kaniš, kaži mi da znam. Jer prije tebe nema nitko pravo na otkup; ja sam na redu tek iza tebe.” A onaj reče: “Hoću, otkupit ću je.”
आणि तुला हे कळवावे व येथे या बसलेल्यांसमोर आणि माझ्या वडीलजनांसमोर तू तो विकत घ्यावा. तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्यानंतर मी आहे.” तो म्हणाला, “मी खंडून घेईन.”
5 Onda kaza Boaz: “Kad uzmeš zemlju iz ruke Noemi, treba da uzmeš i Rutu Moapku, pokojnikovu ženu, da se pokojniku sačuva ime na baštini.”
मग बवाज म्हणाला, “ज्या दिवशी ते शेत नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची पत्नी मवाबी रूथ हिच्याकडूनही तुला ते विकत घ्यावे लागेल, ते अशासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनाला चालावे.”
6 Ali skrbnik reče: “E, onda ne mogu biti otkupnik, da ne raspem svoje baštine. Otkupi ti po svome skrbničkom pravu jer ja ne mogu.”
तेव्हा तो जवळचा नातलग म्हणाला, “माझ्याच्याने ते वतन खंडणी भरून सोडवता येत नाही; सोडवले तर माझ्या वतनाचे माझ्याकडून नुकसान होईल, म्हणून माझा खंडून घेण्याचा अधिकार तू घे.”
7 A bijaše od starine običaj u Izraelu: da se čemu potkrijepi valjanost otkupa ili zamjene, čovjek bi izuo sandalu i dao je drugome. To bijaše svjedočanstvo u Izraelu.
वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून करार पक्के करण्याची पूर्वी इस्राएलात अशी पद्धत होती की मनुष्य आपल्या चपला काढून दुसऱ्याला देत असे.
8 Tako dakle i onaj skrbnik reče Boazu: “Otkupi ti!” te izu sandalu i dade mu je.
तो जवळचा नातलग बवाजाला म्हणाला, “तूच ते विकत घे,” आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या.
9 Tada Boaz kaza starješinama i svemu narodu: “Vi ste danas svjedoci da ja otkupljujem iz ruke Noemine sve ono što je bilo Elimelekovo, sve što je bilo Kiljonovo i Mahlonovo.
बवाज त्या वडीलजनांना व सर्व लोकांस म्हणाला, “आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे.
10 Uz to uzimam za ženu Rutu Moapku, ženu Mahlonovu, da bi se sačuvalo ime pokojnikovo na baštini i da se ime njegovo ne bi zatrlo među braćom njegovom i nestalo s vrata zavičaja njegova. Vi ste danas tome svjedoci.”
१०याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी पत्नी म्हणून मी तिचा स्वीकार करतो; ते यासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनात कायम रहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये, आज तुम्ही याविषयी साक्षी आहात.”
11 Sav narod koji se nalazio na vratima gradskim i starješine rekoše: “Svjedoci smo! Dao Jahve da žena koja ulazi u dom tvoj bude kao Rahela i Lea, koje su obje podigle kuću Izraelovu! Obogati se u Efrati, a prodiči u Betlehemu!
११तेव्हा वेशीतील सर्व लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहो, ही जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ ह्यांच्याप्रमाणे करो; एफ्राथा येथे भरभराट आणि बेथलहेमात कीर्ती होवो.
12 Neka tvoja kuća, po potomstvu koje će ti dati Jahve od ove mlade žene, bude kao kuća Peresa, koga Judi rodi Tamara!”
१२आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्याद्वारे होवो.”
13 Tako Boaz uze Rutu i ona posta žena njegova. Uđe on k njoj i Jahve joj dade te ona zatrudnje i rodi sina.
१३मग बवाजाने रूथशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला.
14 Onda žene rekoše Noemi: “Blagoslovljen bio Jahve koji ti danas nije uskratio skrbnika! I prodičio njegovo ime u Izraelu!
१४तेव्हा तेथील स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही, त्याचे नाव इस्राएलात प्रसिद्ध होवो.
15 On će biti tvoja utjeha i potpora starosti tvojoj; jer ga rodi snaha tvoja koja te ljubi i koja ti vrijedi više od sedam sinova.”
१५तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृद्धापकाळी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीती करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे.”
16 Noemi uze dječaka, metnu ga sebi na krilo i bi mu odgojiteljicom.
१६तेव्हा नामीने ते बालक घेतले आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली.
17 Susjede mu nadjenuše ime govoreći: “Noemi se rodio sin!” I prozvaše ga Obed; on je otac Jišaja, oca Davidova.
१७“नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला.
18 A ovo je rodoslovlje Peresovo: Peres imade sina Hesrona,
१८पेरेशाची वंशावळ: पेरेस हेस्रोनाचा पिता झाला,
19 Hesron Rama, Ram Aminadaba,
१९हेस्रोन रामचा पिता झाला, राम अम्मीनादाबाचा पिता झाला,
20 Aminadab Nahšona, Nahšon Salmona,
२०अम्मीनादाब नहशोनाचा पिता झाला, नहशोन सल्मोनाचा पिता झाला,
21 Salmon Boaza, Boaz Obeda,
२१सल्मोन बवाजाचा पिता झाला, बवाज ओबेदाचा पिता झाला,
22 Obed Jišaja, a Jišaj Davida.
२२ओबेद इशायाचा पिता झाला आणि इशाय दाविदाचा पिता झाला.

< Ruta 4 >