< Otkrivenje 15 >
1 I vidjeh drugo znamenje na nebu, veliko i čudesno: sedam anđela sa sedam zala posljednjih - s njima se navršuje gnjev Božji.
१यानंतर मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह बघितले; ज्यांच्याजवळ सात पीडा होत्या, असे सात देवदूत मी पाहिले त्या शेवटल्या पीडा होत्या, कारण देवाचा क्रोध त्यानंतर पूर्ण होणार होता.
2 I vidjeh kao neko more od prozirca pomiješano s ognjem. Oni koji pobijediše Zvijer i kip njezin i broj imena njezina stoje u moru od prozirca s citrama Božjim u ruci.
२मग मी बघितले की, जणू एक अग्निमिश्रित काचेचा समुद्र आहे आणि ज्यांनी त्या पशूवर व त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय प्राप्त केला होता ते त्या काचेच्या समुद्राजवळ, देवाने दिलेली वीणा घेऊन उभे होते.
3 Pjevaju pjesmu Mojsija, sluge Božjega, i pjesmu Jaganjčevu: “Velika su i čudesna djela tvoja, Gospodine, Bože, Svevladaru! Pravedni su i istiniti putovi tvoji, Kralju naroda!
३देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गात होते. सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे प्रभू देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत.
4 Tko da te se ne boji, Gospodine, tko da ne slavi ime tvoje! Ti si jedini svet! I zato svi će narodi doći i klanjati se pred tobom jer se očitovahu pravedna djela tvoja!”
४हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही? कारण तू एकच पवित्र आहेस; कारण सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.
5 Nakon toga vidjeh: otvori se hram Šatora svjedočanstva na nebu!
५नंतर मी बघितले आणि साक्षीच्या मंडपाचे परमेश्वराचे स्वर्गातील भवन उघडले गेले.
6 Iziđe sedam anđela sa sedam zala iz hrama; odjeveni bijahu u blistav bijeli lan, oko prsiju opasani zlatnim pojasom.
६आणि त्या भवनातून सात देवदूत बाहेर आले; त्यांच्याजवळ सात पीडा होत्या. त्यांनी स्वच्छ, शुभ्र तागाची वस्त्रे परिधान केली होती आणि आपल्या छातीभोवती सोन्याचे पट्टे बांधले होते.
7 Jedno od četiri bića dade sedmorici anđela sedam zlatnih čaša, punih gnjeva Boga koji živi u vijeke vjekova. (aiōn )
७तेव्हा त्या चार प्राण्यांतील एकाने त्या सात देवदूतांना, जो युगानुयुग जिवंत आहे त्या देवाच्या रागाने भरलेल्या, सात सोन्याच्या वाट्या दिल्या. (aiōn )
8 I hram se napuni dimom od Slave Božje i od njegove snage te nitko ne mogaše ući u hram dok se ne navrši sedam zala sedmorice anđela.
८आणि देवाच्या सामर्थ्यापासून व तेजापासून जो धूर निघाला, त्याने परमपवित्रस्थान भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या सात पीडा पूर्ण होईपर्यंत कोणीही आत जाऊ शकला नाही.