< Otkrivenje 13 >
1 I stade na morski žal. I vidjeh: iz mora Zvijer izlazi sa deset rogova i sedam glava; na rogovima joj deset kruna, na glavama bogohulna imena.
१आणि तो अजगर समुद्राच्या वाळूवर उभा राहिला. आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्यास दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती.
2 Ta Zvijer što je vidjeh bijaše nalik na leoparda, noge joj kao medvjeđe, usta kao usta lavlja. Zmaj joj dade svoju silu i prijestolje i vlast veliku.
२आणि मी पाहिलेला पशू तो चित्त्यासारखा होता, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते; त्यास अजगराने आपली शक्ती आणि राजासन दिले आणि मोठा अधिकार दिला.
3 Jedna joj glava bijaše kao na smrt zaklana, ali joj se smrtna rana zaliječila. Sva se zemlja, začuđena, zanijela za Zvijeri
३त्या पशूच्या डोक्यापैकी, त्याच्या एका डोक्याला जीवघेणी जखम झाली होती, त्यामुळे तो मरून जाईल असे वाटले. पण त्याची ती जखम बरी झाली; आणि सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या पशूच्यामागे गेली.
4 i svi se pokloniše Zmaju koji dade takvu vlast Zvijeri. Pokloniše se i Zvijeri govoreći: “Tko je kao Zvijer! Tko bi smio ratovati s njom?”
४आणि त्यांनी अजगराला नमन केले, कारण त्याने आपला अधिकार त्या पशूला दिला होता; आणि त्यांनी त्या पशूलाही नमन करून म्हटले, “या पशूसारखा कोण आहे? ह्याच्याशी कोण लढू शकेल?”
5 I dana su joj usta da govori drskosti i hule i dana joj je vlast da to čini četrdeset i dva mjeseca.
५आणि, त्या पशूला मोठ्या गर्विष्ठ गोष्टी व अपमानास्पद शब्द बोलणारे तोंड दिले होते; आणि त्यास हे करायला बेचाळीस महिने अधिकार दिला होता.
6 I ona otvori usta da huli Boga, da huli ime njegovo, njegov Šator i nebesnike.
६त्या पशूने देवाविरुद्ध त्याच्या नावाविषयी, त्याच्या मंडपाविषयी आणि स्वर्गात राहणाऱ्यांविषयी निंदा करायला आपले तोंड उघडले.
7 I dano joj je da se zarati sa svecima i da ih pobijedi. Dana joj je vlast nad svakim plemenom i pukom i jezikom i narodom:
७आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास व त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली; आणि त्यास प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणाऱ्यांवर आणि राष्ट्रांवर अधिकार दिलेला होता.
8 da joj se poklone svi pozemljari, oni kojima ime nije zapisano u knjizi života zaklanog Jaganjca, od postanka svijeta.
८आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या पशूला नमन करतील.
9 Tko ima uho, nek posluša!
९जर कोणाला कान असेल तर तो ऐको.
10 Je li tko za progonstvo, u progonstvo će ići! Je li tko za mač, da bude pogubljen, mačem će biti pogubljen! U tom je postojanost i vjera svetih.
१०जो कैदेत जायचा तो कैदेत जातो; जो तलवारीने जीवे मारील त्यास तलवारीने मरणे भाग आहे. ह्यात पवित्र जनांची सहनशिलता आणि विश्वास दिसून येतो.
11 I vidjeh: druga jedna Zvijer uzlazi iz zemlje, ima dva roga poput jaganjca, a govori kao Zmaj.
११आणि मी बघितले की, आणखी एक पशू भूमीतून वर येत आहे. त्यास कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती; आणि तो अजगरासारखा बोलत होता.
12 Vrši svu vlast one prve Zvijeri, u njenoj nazočnosti. Prisiljava zemlju i sve pozemljare da se poklone prvoj Zvijeri kojoj ono zacijeli smrtna rana.
१२तो पहिल्या पशूची सर्व सत्ता त्याच्यासमक्ष स्वतः चालवतो; ज्या पहिल्या पशूची जीवघेणी जखम बरी झाली होती त्यास पृथ्वीने व तीवर राहणाऱ्यांनी नमन करावे असे तो करतो.
13 Čini znamenja velika: i oganj spušta s neba na zemlju naočigled ljudi.
१३तो मोठी चिन्हे करतो; लोकांच्या दृष्टीपुढे आकाशातून पृथ्वीवर अग्नी उतरेल असे तो करतो,
14 Tako zavodi pozemljare znamenjima koja joj je dano činiti u nazočnosti Zvijeri: svjetuje pozemljarima da načine kip Zvijeri koja bijaše udarena mačem, ali preživje.
१४आणि त्यास त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणाऱ्यांना फसवतो आणि ज्या पशूला तलवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणाऱ्यांस सांगतो.
15 I dano joj je udahnuti život kipu Zvijeri te kip Zvijeri progovori i poubija sve koji se god ne klanjaju kipu Zvijeri.
१५दुसऱ्या पशूला, पहिल्या पशूच्या मूर्तीला जीवन देण्याची परवानगी होती. म्हणजे त्या पशूच्या मूर्तीने बोलावे आणि असे करावे की, जितके लोक त्या पशूच्या मूर्तीला नमन करणार नाहीत तितक्यांना जिवे मारले जावे.
16 Ona postiže da se svima - malima i velikima, bogatima i ubogima, slobodnjacima i robovima - udari žig na desnicu ili na čelo,
१६आणि तो असे करतो की, लहान व मोठे, धनवान व दरिद्री, स्वतंत्र व दास, अशा सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळांवर एक खूण घ्यावी,
17 i da nitko ne mogne kupovati ili prodavati osim onog koji nosi žig s imenom Zvijeri ili s brojem imena njezina.
१७आणि ती खूण म्हणजे त्या पशूचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे, त्याच्यावाचून इतर कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकता येऊ नये.
18 U ovome je mudrost: u koga je uma, nek odgoneta broj Zvijeri. Broj je to jednog čovjeka, a broj mu je šest stotina šezdeset i šest.
१८येथे ज्ञानीपणच आहे; ज्याला बुद्धी असेल त्याने पशूच्या संख्येचा हिशोब करावा कारण, ती एका मनुष्याची संख्या आहे आणि त्याची संख्या सहाशे सहासष्ठ आहे.