< Psalmi 98 >
1 Psalam. Pjevajte Jahvi pjesmu novu, jer učini djela čudesna. Pobjedu mu pribavi desnica njegova i sveta mišica njegova.
१परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे.
2 Jahve obznani spasenje svoje, pred poganima pravednost objavi.
२परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे.
3 Spomenu se dobrote i vjernosti prema domu Izraelovu. Svi krajevi svijeta vidješe spasenje Boga našega.
३त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
4 Sva zemljo, poklikni Jahvi, raduj se, kliči i pjevaj!
४अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा.
5 Zapjevajte Jahvi uz citaru, uz citaru i uza zvuke harfe;
५परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, वीणेवर मधुर स्वराने गायन करा.
6 uz trublje i zvuke rogova: kličite Jahvi kralju!
६कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा.
7 Neka huči more i što je u njemu, krug zemaljski i stanovnici njegovi!
७समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत.
8 Rijeke nek' plješću rukama, zajedno s njima neka se brda raduju!
८नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत.
9 Jer Jahve dolazi, dolazi suditi zemlji. Vladat će krugom zemaljskim po pravdi i pucima po pravici.
९परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.