< Psalmi 118 >
1 Aleluja! Zahvaljujte Jahvi jer je dobar, jer je vječna ljubav njegova!
१परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
2 Neka rekne dom Izraelov: “Vječna je ljubav njegova!”
२इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
3 Neka rekne dom Aronov: “Vječna je ljubav njegova!”
३अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
4 Svi koji se Jahve boje neka reknu: “Vječna je ljubav njegova!”
४परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
5 Iz tjeskobe Jahvu ja zazvah: on me usliša i oslobodi.
५मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
6 Jahve je sa mnom i ja ne strahujem: što mi tko može?
६परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; मनुष्य माझे काय करू शकेल?
7 Jahve je sa mnom, pomoć moja, i zbunjene gledam dušmane.
७माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन.
8 Bolje se Jahvi uteći nego se uzdat' u čovjeka.
८मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.
9 Bolje se Jahvi uteći nego se uzdat' u mogućnike.
९मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.
10 Pogani me okružiše: imenom ih Jahvinim uništih.
१०सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन.
11 Opkoliše me odasvud: imenom ih Jahvinim uništih.
११त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
12 Opkoliše me poput pčela, ubod im žeže kao trnje zapaljeno: imenom ih Jahvinim uništih.
१२त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
13 Gurahu me, gurahu, da me obore, ali mi Jahve pomože.
१३मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली.
14 Jahve je moja snaga i pjesma, on mi je spasitelj.
१४परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे.
15 Čuj! Radost i spasenje odzvanja šatorima pravednika: Jahvina se proslavi desnica,
१५उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
16 Jahvina me uzdigne desnica, Jahvina se proslavi desnica!
१६परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
17 Ne, umrijeti neću nego živjeti i kazivat ću djela Jahvina.
१७मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.
18 Kaznom teškom kaznio me Jahve, ali me smrti ne preda.
१८परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही.
19 Otvorite mi širom vrata pravde: ući ću, Jahvi zahvalit'!
१९माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन.
20 “Ovo su vrata Jahvina, na njih ulaze pravedni!”
२०हे परमेश्वराचे दार आहे; नितीमान त्यातून प्रवेश करतील.
21 Zahvalit ću ti što si me uslišio i moj postao spasitelj.
२१मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे आणि तू माझे तारण झाला आहेस.
22 Kamen što ga odbaciše graditelji postade kamen zaglavni.
२२इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, तोच कोनाशिला झाला आहे.
23 Jahvino je to djelo: kakvo čudo u očima našim!
२३परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे.
24 Ovo je dan što ga učini Jahve: kličimo i radujmo se njemu!
२४परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; ह्यात आपण आनंद व उल्लास करू.
25 O Jahve, spasenje nam daj! Jahve, sreću nam daj!
२५हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर.
26 Blagoslovljen koji dolazi u imenu Jahvinu! Blagoslivljamo vas iz Doma Jahvina!
२६परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो; परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो.
27 Obasjao nas Bog Jahve! Složite povorku s grančicama u ruci sve do rogova žrtvenika.
२७परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे; यज्ञाचा पशू वेदीच्या शिंगास दोरीने बांधा.
28 Ti si Bog moj - tebi zahvaljujem: Bože moj, tebe ja uzvisujem.
२८तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन. तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन.
29 Zahvaljujte Jahvi jer je dobar, jer je vječna ljubav njegova!
२९अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.