< Mudre Izreke 5 >
1 Sine moj, čuj moju mudrost, prigni uho mojoj razboritosti
१माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव; माझ्या सुज्ञानाकडे काळजीपूर्वक आपला कान लाव.
2 da sačuvaš oprez, da ti usne zadrže znanje.
२म्हणून तू दूरदर्शीपणाविषयी शिक्षण घे, आणि तुझे ओठ तुझ्या विद्येचे रक्षण करतील.
3 Jer s usana žene preljubnice kaplje med i nepce joj je glađe od ulja,
३कारण व्यभिचारिणी स्त्रीच्या ओठातून मध टिपकतो, आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते,
4 ali je ona naposljetku gorka kao pelin, oštra kao dvosjekli mač.
४पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे, आणि दुधारी तलवारी सारखी धारदार होते.
5 Njene noge silaze k smrti, a koraci vode u Podzemlje. (Sheol )
५तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात. (Sheol )
6 Ona ne pazi na put života, ne mari što su joj staze kolebljive.
६म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. तिची पावले भटकतात, ती कोठे जाते हे तिला समजत नाही.
7 Zato me sada poslušaj, sine, i ne odstupaj od riječi mojih usta.
७आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; माझ्या तोंडची वचने ऐकण्यापासून दूर जाऊ नका.
8 Neka je put tvoj daleko od nje i ne približuj se vratima njezine kuće,
८तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख, आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नको.
9 da drugima ne bi dao svoju slavu i okrutnima svoje godine;
९गेलास तर तुझी अब्रू इतरांच्या हाती जाईल, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे क्रूरजनाच्या हाती जातील;
10 da se ne bi tuđinci nasitili tvoga dobra i da tvoja zaslužba ne ode u tuđu kuću;
१०तुझ्या संपत्तीने परके मेजवाणी करतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल.
11 da ne ridaš na koncu kad ti nestane tijela i puti
११जेव्हा तुझा देह व शरीर सर्वकाही नष्ट होईल, तेव्हा तुझ्या आयुष्याच्या शेवटी तू शोक करशील.
12 i da ne kažeš: “Oh, kako sam mrzio pouku i kako mi je srce preziralo ukor!
१२तू म्हणशील “मी शिस्तीचा कसा द्वेष केला, आणि माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानले!
13 I ne slušah glasa svojih učitelja, niti priklonih uho onima što me poučavahu.
१३मी माझ्या शिक्षकांच्या आज्ञा पाळल्या नाहीत, किंवा मला शिकवणाऱ्याकडे कान दिला नाही.
14 I umalo ne zapadoh u svako zlo, usred zbora i zajednice!”
१४मंडळी व सभा यांच्यादेखत मी बहुतेक पुर्णपणे नाश पावलो होतो.”
15 Pij vodu iz svoje nakapnice i onu što teče iz tvoga studenca.
१५तू आपल्याच टाकितले पाणी पी, तुझ्या स्वतःच्या विहिरितले वाहते पाणी पी.
16 Moraju li se tvoji izvori razlijevati i tvoji potoci teći ulicama?
१६तुझे झरे बाहेर सर्वत्र वाहून जावे काय, आणि तुझ्या पाण्याचा प्रवाह सार्वजनिक चौकात वाहावा कां?
17 Nego neka oni budu samo tvoji, a ne i tuđinaca koji su uza te.
१७ते केवळ तुझ्यासाठीच असावेत, आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत.
18 Neka je blagoslovljen izvor tvoj i raduj se sa ženom svoje mladosti:
१८तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो, आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा.
19 neka ti je kao mila košuta i ljupka gazela, neka te grudi njene opajaju u svako doba, njezina ljubav zatravljuje bez prestanka!
१९कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा.
20 TÓa zašto bi se, sine moj, zanosio preljubnicom i grlio tuđinki njedra?
२०माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे?
21 Jer pred Jahvinim su očima čovjekovi putovi i on motri sve njegove staze.
२१मनुष्य काय करतो हे परमेश्वर सर्वकाही पाहतो, तो त्याच्या सर्व वाटांकडे लक्ष देतो.
22 Opakoga će uhvatiti njegova zloća i sapet će ga užad njegovih grijeha.
२२दुष्ट मनुष्यास त्याची स्वतःचीच दुष्कर्मे धरतात, त्याची पापे दोरीप्रमाणे त्यास घट्ट पकडतील.
23 Umrijet će jer nema pouke, propast će zbog svoje goleme gluposti.
२३शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल.