< Matej 15 >

1 Tada pristupe Isusu farizeji i pismoznanci iz Jeruzalema govoreći:
तेव्हा यरूशलेम शहराहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले,
2 “Zašto tvoji učenici prestupaju predaju starih? Ne umivaju ruku prije jela!”
“तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.”
3 On im odgovori: “A zašto vi prestupate zapovijed Božju radi svoje predaje?
येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता?
4 Ta reče Bog: Poštuj oca i majku! I: Tko prokune oca ili majku, smrću neka se kazni!
कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आई-वडीलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आई-वडीलांबद्दल वाईट बोलतो, त्यास जिवे मारावे.’
5 A vi velite: 'Rekne li tko ocu ili majci: Pomoć koja te od mene ide neka bude sveti dar,
पण तुम्ही म्हणता, ‘जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते, ते मी देवाला अर्पण केले आहे.’
6 ne treba da poštuje oca svoga ni majku svoju.' Tako dokinuste riječ Božju radi svoje predaje.
ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.
7 Licemjeri, dobro prorokova o vama Izaija:
अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्याने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो:
8 Narod me ovaj usnama časti, a srce mu je daleko od mene.
हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
9 Uzalud me štuju naučavajući nauke - uredbe ljudske.”
आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.”
10 Tada dozove mnoštvo i reče: “Slušajte i razumijte!
१०तेव्हा लोकांस आपल्याजवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या.
11 Ne onečišćuje čovjeka što ulazi u usta, nego što iz usta izlazi - to čovjeka onečišćuje.”
११जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते.”
12 Tada pristupe k njemu učenici i kažu mu: “Znaš li da su se farizeji sablaznili kad su čuli tu riječ?”
१२नंतर शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, “परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणाला कळले काय?”
13 On im odgovori: “Svaki nasad koji ne posadi Otac moj nebeski iskorijenit će se.
१३पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोप जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल.
14 Pustite ih! Slijepi su, vođe slijepaca! A ako slijepac slijepca vodi, obojica će u jamu pasti.”
१४त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
15 Petar prihvati i reče mu: “Protumači nam tu prispodobu!”
१५पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी हा दाखला स्पष्ट करून सांगा.”
16 A on reče: “I vi još uvijek ne razumijete?
१६येशूने त्यांना विचारले, “तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय?
17 Ne shvaćate li: sve što ulazi na usta, ide u trbuh te se izbacuje u zahod.
१७जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग शौचकूपातून बाहेर टाकले जाते. हे तुम्हास अजून समजत नाही काय?
18 Naprotiv, što iz usta izlazi, iz srca izvire i to onečišćuje čovjeka.
१८परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात.
19 Ta iz srca izviru opake namisli, ubojstva, preljubi, bludništva, krađe, lažna svjedočanstva, psovke.
१९कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात.
20 To onečišćuje čovjeka; a jesti neopranih ruku ne onečišćuje čovjeka.”
२०या गोष्टी मनुष्यास अशुद्ध करतात. परंतु न धुतलेल्या हाताने खाण्याने मनुष्य अशुद्ध होत नाही.”
21 Isus zatim ode odande i povuče se u krajeve tirske i sidonske.
२१नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनाच्या भागात गेला.
22 I gle: žena neka, Kanaanka iz onih krajeva, iziđe vičući: “Smiluj mi se, Gospodine, Sine Davidov! Kći mi je teško opsjednuta!”
२२तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे.”
23 Ali on joj ne uzvrati ni riječi. Pristupe mu na to učenici te ga moljahu: “Udovolji joj jer viče za nama.”
२३पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्यास विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”
24 On odgovori: “Poslan sam samo k izgubljenim ovcama doma Izraelova.”
२४पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवले आहे.”
25 Ali ona priđe, pokloni mu se ničice i kaže: “Gospodine, pomozi mi!”
२५मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.”
26 On odgovori: “Ne priliči uzeti kruh djeci i baciti ga psićima.”
२६परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे योग्य नाही.”
27 A ona će: “Da, Gospodine! Ali psići jedu od mrvica što padaju sa stola njihovih gospodara!”
२७ती स्त्री म्हणाली, “होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात.”
28 Tada joj Isus reče: “O ženo! Velika je vjera tvoja! Neka ti bude kako želiš.” I ozdravi joj kći toga časa.
२८तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “मुली, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला प्राप्त होवो.” आणि त्याचवेळी तिची मुलगी बरी झाली.
29 Otišavši odande, dođe Isus do Galilejskog mora, uziđe na goru i sjede ondje.
२९नंतर येशू तेथून निघून गालीलच्या सरोवराजवळ आला व येशू डोंगरावर चढून तेथे बसला.
30 Tada nagrnu k njemu silan svijet s hromima, kljastima, slijepima, nijemima i mnogima drugima. Polože mu ih do nogu, a on ih izliječi.
३०मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांस आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले.
31 Gledajući kako su nijemi progovorili, kljasti ozdravili, hromi prohodali, slijepi progledali, divilo se mnoštvo i slavilo Boga Izraelova.
३१मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.
32 A Isus dozva svoje učenike pa im reče: “Žao mi je naroda jer su već tri dana uza me, a nemaju što jesti. Otpraviti ih gladne neću da ne klonu putem.”
३२मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवसांपासून माझ्याबरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील.”
33 Kažu mu učenici: “Odakle nam u pustinji toliko kruha da nahranimo toliko mnoštvo?”
३३शिष्य त्यास म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”
34 A Isus im reče: “Koliko kruhova imate?” Oni će: “Sedam, i malo riba.”
३४तेव्हा येशू म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत.”
35 Nato zapovjedi mnoštvu da posjeda po zemlji,
३५मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली.
36 uze sedam kruhova i ribe, zahvali, razlomi i davaše učenicima, a učenici mnoštvu.
३६मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या.
37 I jeli su i nasitili se. A od preteklih ulomaka nakupiše sedam punih košara.
३७तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात टोपल्या गोळा केल्या.
38 A blagovalo je četiri tisuće muškaraca, osim žena i djece.
३८आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते.
39 Tada otpusti mnoštvo, uđe u lađu i ode u kraj magadanski.
३९मग समुदायास निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या प्रदेशात गेला.

< Matej 15 >