< Levitski zakonik 15 >

1 Jahve reče Mojsiju i Aronu:
परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना आणखी म्हणाला,
2 “Govorite Izraelcima i kažite im: 'Kad koji čovjek imadne izljev iz svoga tijela, njegov je izljev nečist.
इस्राएल लोकांस सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्त्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय.
3 Evo u čemu je njegova nečistoća ako ima taj izljev: ispusti li njegovo tijelo izljev ili ga zadrži, on je nečist.
त्याचा स्त्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.
4 Svaka postelja na koju legne onaj koji ima izljev neka je nečista; i svaki predmet na koji sjedne neka je nečist.
स्त्राव होणारा मनुष्य ज्या बिछान्यावर झोपेल तो अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय.
5 A svaki koji se dotakne njegove posteljine neka opere svoju odjeću, u vodi se okupa i nečistim ostane do večeri.
जो कोणी त्याच्या बिछान्याला स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
6 Tko god sjedne na predmet na kojemu je sjedio onaj koji je imao izljev neka opere svoju odjeću, u vodi se okupa i nečistim ostane do večeri.
स्त्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
7 Tko se dotakne tijela onoga koji je imao izljev neka opere svoju odjeću, u vodi se okupa i do večeri nečistim ostane.
स्त्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला जर कोणी स्पर्श केला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
8 Ako onaj koji ima izljev pljune na koga tko je čist neka taj opere svoju odjeću, u vodi se okupa i nečistim ostane do večeri.
स्त्राव होणारा मनुष्य जर एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुंकला तर त्या शुद्ध मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
9 Neka je nečisto i svako sjedalo na koje za vožnje sjedne onaj koji ima izljev;
स्त्राव होणारा मनुष्य ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय.
10 i tko se dotakne čega što je pod tim bolesnikom bilo neka je nečist do večeri. Tko ponese štogod takvo neka svoju odjeću opere, u vodi se okupa i ostane nečistim do večeri.
१०त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तुला कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
11 A svaki koga se onaj koji ima izljev dotakne neopranih ruku neka svoju odjeću opere, u vodi se okupa i ostane nečistim do večeri.
११स्त्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता कोणाला स्पर्श केला तर त्या दुसऱ्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
12 Zemljana posuda koje se dotakne onaj s izljevom neka se razbije, a svaki drveni sud neka se vodom ispere.
१२परंतु स्त्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला स्पर्श केला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे.
13 Kad se onaj koji ima izljev od toga izliječi, neka onda nabroji sedam dana za svoje oćišćenje; neka opere svoju odjeću, okupa se u živoj vodi i neka je čist.
१३स्त्राव होणारा मनुष्य आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
14 Osmoga pak dana neka uzme dvije grlice ili dva golubića, dođe pred Jahvu na ulaz u Šator sastanka pa ih svećeniku preda.
१४आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी.
15 Neka ih svećenik prinese jedno kao žrtvu okajnicu, a drugo kao žrtvu paljenicu. Time će svećenik izvršiti obred pomirenja nad tim čovjekom za njegov izljev.
१५मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या मनुष्याच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.
16 Kad čovjek imadne sjemeni izljev, neka u vodi okupa cijelo svoje tijelo i ostane nečistim do večeri.
१६एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
17 Svaka haljina i svaka koža na koju dospije takav sjemeni izljev neka se u vodi opere i ostane nečistom do večeri.
१७ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे.
18 Ako koja žena legne s kojim čovjekom i on ispusti sjeme, neka se okupaju u vodi i budu nečisti do večeri'.”
१८स्त्री बरोबर निजला असताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
19 “Kad žena imadne krvarenje, izljev krvi iz svoga tijela, neka ostane u svojoj nečistoći sedam dana; tko se god nje dotakne neka je nečist do večeri.
१९एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे;
20 Na što god bi legla za svoje nečistoće neka je nečisto; na što god sjedne neka je nečisto.
२०ती दूर असेपर्यंत ज्यावर ती झोपेल वा बसेल तेही अशुद्ध होय.
21 Tko se dotakne njezine posteljine neka opere svoju odjeću, u vodi se okupa i do večeri ostane nečistim.
२१जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
22 Tko god dotakne bilo koji predmet na kojemu je ona sjedila neka svoju odjeću opere, u vodi se okupa i nečist ostane do večeri.
२२ती ज्यावर बसली असेल त्यास जो कोणी स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
23 A ako bi se dotakao čega što je bilo na njezinoj postelji ili na predmetu na kojem je ona sjedila, neka je nečist do večeri.
२३तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्यास शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
24 Ako koji čovjek s njom legne, njezina nečistoća za nj prianja, pa neka je nečist sedam dana. Svaka postelja na koju on legne neka je nečista.
२४अशा स्त्रीबरोबर लैगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध रहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे.
25 Ako žena imadne krvarenje dulje vremena izvan svoga mjesečnog pranja, ili ako se njezino mjesečno pranje produžuje, neka se smatra nečistom sve vrijeme krvarenja kao da su dani njezina mjesečnog pranja.
२५एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे स्त्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे. ती अशुद्ध होय.
26 Svaka postelja na koju legne za sve vrijeme svoga krvarenja bit će joj kao i postelja za njezina mjesečnog pranja. I svaki predmet na koji sjedne neka postane nečistim kao što bi bio nečist u vrijeme njezina mjesečnog pranja.
२६तिला स्त्राव होत असतानाच्या सर्व काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल, ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात अशुद्ध असते. तशी अशुद्ध समजावी.
27 A svatko tko ih se dotakne neka je nečist; neka opere svoju odjeću, okupa se u vodi i ostane nečistim do večeri.
२७जर कोणी त्या वस्तूंना स्पर्श करेल तर तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
28 Ako ozdravi od svog krvarenja, neka namiri sedam dana, a poslije toga neka je čista.
२८त्या स्त्रीचा स्त्राव बंद झाल्यावर तिने सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध होईल.
29 Osmoga dana neka uzme dvije grlice ili dva golubića te ih donese svećeniku na ulaz u Šator sastanka.
२९मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे.
30 Neka jedno svećenik prinese kao žrtvu okajnicu, a drugo kao žrtvu paljenicu. Tako će svećenik obaviti pred Jahvom obred pomirenja nad njom, za njezino nečisto krvarenje.”
३०मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
31 “Odvraćajte Izraelce od njihovih nečistoća, da ne bi zbog njih pomrli oskvrnjujući moje Prebivalište koje se nalazi među njima.
३१ह्याप्रकारे तुम्ही इस्राएल लोकांस अशुद्धतेबद्दल बजावून ठेवावे; नाहीतर ते माझा पवित्र निवासमंडप भ्रष्ट करतील आणि मग त्याच्याबद्दल त्यांना मरावेच लागेल!
32 To je propis za čovjeka koji ima izljev; za onoga koga čini nečistim sjemeni izljev;
३२स्त्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो;
33 za ženu u vrijeme nečistoće njezina mjesečnog pranja; za svakoga - bilo muško bilo žensko - tko imadne izljev, a tako i za čovjeka koji legne s onečišćenom ženom.”
३३आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष, ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करून अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत.

< Levitski zakonik 15 >