< Ivan 7 >
1 Nakon toga Isus je obilazio po Galileji; nije htio u Judeju jer su Židovi tražili da ga ubiju.
१यानंतर येशू गालील प्रांतात फिरू लागला, कारण यहूदी अधिकारी त्यास ठार मारायला पाहत होते. म्हणून त्यास यहूदीया प्रांतात फिरावेसे वाटले नाही.
2 Bijaše blizu židovski Blagdan sjenica.
२यहूद्यांचा मंडपाचा सण जवळ आला होता.
3 Rekoše mu stoga njegova braća: “Otiđi odavle i pođi u Judeju da i tvoji učenici vide djela što činiš.
३म्हणून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू इथून नीघ आणि यहूदीया प्रांतात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत.
4 Ta tko želi biti javno poznat, ne čini ništa u tajnosti. Ako već činiš sve to, očituj se svijetu.”
४जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही. तू या गोष्टी करीत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो.”
5 Jer ni braća njegova nisu vjerovala u njega.
५कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.
6 Reče im nato Isus: “Moje vrijeme još nije došlo, a za vas je vrijeme svagda pogodno.
६त्यावरून येशू त्यांना म्हणाला, “सणाला जाण्याची माझी वेळ अजून आलेली नाही; तुमची वेळ तर सर्वदा सिद्ध आहे.
7 Vas svijet ne može mrziti, ali mene mrzi jer ja svjedočim protiv njega: da su mu djela opaka.
७जगाने तुमचा द्वेष करवा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत.
8 Vi samo uziđite na blagdan. Ja još ne uzlazim na ovaj blagdan jer moje se vrijeme još nije ispunilo.”
८तुम्ही सणाला वर जा. मी या सणाला आताच वर जात नाही कारण माझी वेळ अजून पूर्ण झालेली नाही.”
9 To im reče i ostade u Galileji.
९असे त्यांना सांगून तो गालील प्रांतात राहिला.
10 Ali pošto njegova braća uziđoše na blagdan, uziđe i on, ne javno, nego potajno.
१०पण त्याचे भाऊ सणाला वर गेल्यानंतर तोसुध्दा, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला.
11 A Židovi su ga tražili o blagdanu pitajući: “Gdje je onaj?”
११तेव्हा, यहूदी त्यास सणात शोधीत होते आणि म्हणत होते, “तो आहे तरी कोठे?”
12 I među mnoštvom o njemu se mnogo šaptalo. Jedni govorahu: “Dobar je!” Drugi pak: “Ne, nego zavodi narod.”
१२आणि लोकांतही त्याच्याविषयी पुष्कळ कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहेः” दुसरे कोणी म्हणत होते, “नाही, तो लोकांस फसवतो.”
13 Ipak nitko nije otvoreno govorio o njemu zbog straha od Židova.
१३तरी यहूद्यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नसे.
14 Usred blagdana uziđe Isus u Hram i stade naučavati.
१४मग सण अर्धा आटोपल्यावर येशू वर परमेश्वराच्या भवनात जाऊन शिक्षण देऊ लागला.
15 Židovi se u čudu pitahu: “Kako ovaj znade Pisma, a nije učio?”
१५तेव्हा यहूदी आश्चर्य करून म्हणू लागले, “शिकल्यावाचून याला विद्या कशी आली?”
16 Nato im Isus odvrati: “Moj nauk nije moj, nego onoga koji me posla.
१६त्यावरून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.
17 Ako tko hoće vršiti volju njegovu, prepoznat će da li je taj nauk od Boga ili ja sam od sebe govorim.
१७जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगील त्यालाही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनाचे बोलतो हे समजेल.
18 Tko sam od sebe govori, svoju slavu traži, a tko traži slavu onoga koji ga posla, taj je istinit i nema u njemu nepravednosti.
१८जो आपल्या मनाचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.
19 Nije li vam Mojsije dao Zakon? Pa ipak nitko od vas ne vrši Zakona.” “Zašto tražite da me ubijete?”
१९मोशेने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तर तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारायला का पाहता?”
20 Odgovori mnoštvo: “Zloduha imaš! Tko traži da te ubije?”
२०लोकांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुला भूत लागले आहे. तुला ठार मारायला कोण पाहतो?”
21 Uzvrati im Isus: “Jedno djelo učinih i svi se čudite.
२१येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता.
22 Mojsije vam dade obrezanje - ne, ono i nije od Mojsija, nego od otaca - i vi u subotu obrezujete čovjeka.
२२मोशेने तुम्हास सुंता लावून दिली (तरी ती मोशेपासून नाही, पण पूर्वजांपासून आहे.) आणि तुम्ही शब्बाथ दिवशी मनुष्याची सुंता करता.
23 Ako čovjek može primiti obrezanje u subotu da se ne prekrši Mojsijev zakon, zašto se ljutite na mene što sam svega čovjeka ozdravio u subotu?
२३मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर, तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्यास अगदी बरे केले यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय?
24 Ne sudite po vanjštini, nego sudite sudom pravednim!”
२४तोंड पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”
25 Rekoše tada neki Jeruzalemci: “Nije li to onaj koga traže da ga ubiju?
२५यावरुन यरूशलेमकरांपैकी कित्येकजण म्हणू लागले, “ज्याला ठार मारायला पाहतात तो हाच ना?
26 A evo, posve otvoreno govori i ništa mu ne kažu. Da nisu možda i glavari doista upoznali da je on Krist?
२६पाहा, तो उघडपणे बोलत आहे आणि ते त्यास काहीच बोलत नाहीत. हाच ख्रिस्त आहे, हे खरोखर अधिकार्यांना कळले आहे काय?
27 Ali za njega znamo odakle je, a kad Krist dođe, nitko neće znati odakle je!”
२७तरी हा कुठला आहे हे आम्हास ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही.”
28 Nato Isus, koji je učio u Hramu, povika: “Da! Poznajete me i znate odakle sam! A ipak ja nisam došao sam od sebe: postoji jedan istiniti koji me posla. Njega vi ne znate.
२८यावरुन येशू परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता; तरीही मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे त्यास तुम्ही ओळखत नाही.
29 Ja ga znadem jer sam od njega i on me poslao.”
२९मी तर त्यास ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.”
30 Židovi su otad vrebali da ga uhvate. Ipak nitko ne stavi na nj ruke jer još nije bio došao njegov čas.
३०यावरुन ते त्यास धरण्यास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती.
31 A mnogi iz mnoštva povjerovaše u nj te govorahu: “Zar će Krist, kada dođe, činiti više znamenja nego što ih ovaj učini?”
३१तेव्हा लोकसमुदायातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा याने केलेल्या चिन्हांपेक्षा तो काही अधिक काय करणार आहे?”
32 Dočuli farizeji da se to u mnoštvu o njemu šapće. Stoga glavari svećenički i farizeji poslaše stražare da ga uhvate.
३२लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले आणि मुख्य याजक लोक व परूश्यांनी त्यास धरण्यास कामदार पाठवले.
33 Tada Isus reče: “Još sam malo vremena s vama i odlazim onomu koji me posla.
३३यावरुन येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे.
34 Tražit ćete me i nećete me naći; gdje sam ja, vi ne možete doći.”
३४तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हास सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.”
35 Rekoše nato Židovi među sobom: “Kamo to ovaj kani da ga mi nećemo naći? Da ne kani poći raseljenima među Grcima i naučavati Grke?
३५यामुळे यहूदी आपसात म्हणाले, “हा आपल्याला सापडणार नाही असा हा कोठे जाईल? हा ग्रीकमधील आपल्या पांगलेल्या यहूदी लोकांस जाऊन त्यांस शिकवील काय?
36 Što li znači besjeda koju reče: 'Tražit ćete me i nećete me naći; gdje sam ja, vi ne možete doći'?”
३६हा जे म्हणतो की, ‘तुम्ही माझा शोध कराल आणि मी तुम्हास सापडणार नाही आणि मी असेन तिथे तुम्ही येऊ शकणार नाही,’ हे म्हणणे काय आहे?”
37 U posljednji, veliki dan blagdana Isus stade i povika: “Ako je tko žedan, neka dođe k meni! Neka pije
३७मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.
38 koji vjeruje u mene! Kao što reče Pismo: 'Rijeke će žive vode poteći iz njegove utrobe!'”
३८जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”
39 To reče o Duhu kojega su imali primiti oni što vjeruju u njega. Tada doista ne bijaše još došao Duh jer Isus nije bio proslavljen.
३९ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.
40 Kad su neki iz naroda čuli te riječi, govorahu: “Ovo je uistinu Prorok.”
४०लोकसमुदायातील कित्येकजण हे शब्द ऐकून म्हणत होते, “खरोखर, हा तो संदेष्टा आहे.”
41 Drugi govorahu: “Ovo je Krist.” A bilo ih je i koji su pitali: “Pa zar Krist dolazi iz Galileje?
४१कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालील प्रांतातून येणार आहे काय?
42 Ne kaže li Pismo da Krist dolazi iz potomstva Davidova, i to iz Betlehema, mjesta gdje bijaše David?”
४२दाविदाच्या वंशाचा आणि ज्या गावात दावीद होता त्या बेथलेहेमातून ख्रिस्त येईल अस शास्त्रलेख म्हणत नाही काय?”
43 Tako je u narodu nastala podvojenost zbog njega.
४३यावरुन त्याच्यामुळे लोकात फूट झाली.
44 Neki ga čak htjedoše uhvatiti, ali nitko ne stavi na nj ruke.
४४त्यांच्यातील कित्येकजण त्यास धरायला पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकले नाहीत.
45 Dođoše dakle stražari glavarima svećeničkim i farizejima, a ovi im rekoše: “Zašto ga ne dovedoste?”
४५मग कामदार मुख्य याजकांकडे व परूश्यांकडे आले, तेव्हा ते त्यांना म्हणाले, “तुम्ही त्यास का आणले नाही?”
46 Stražari odgovore: “Nikada nitko nije ovako govorio.”
४६कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”
47 Nato će im farizeji: “Zar ste se i vi dali zavesti?
४७तेव्हा परूश्यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्हीपण फसलात काय?
48 Je li itko od glavara ili farizeja povjerovao u njega?
४८अधिकार्यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?
49 Ali ta svjetina koja ne pozna Zakona - to je prokleto!”
४९पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.”
50 Kaže im Nikodem - onaj koji ono prije dođe k Isusu, a bijaše jedan od njih:
५०पूर्वी त्याच्याकडे आलेला आणि त्यांच्यातला एक असलेला निकदेम त्यांना म्हणाला.
51 “Zar naš Zakon sudi čovjeku ako ga prije ne sasluša i ne dozna što čini?”
५१“एखाद्या मनुष्याचे ऐकण्याअगोदर आणि तो काय करतो याची माहीती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?”
52 Odgovoriše mu: “Da nisi i ti iz Galileje? Istraži pa ćeš vidjeti da iz Galileje ne ustaje prorok.”
५२त्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्हीपण गालील प्रांतातले आहात काय? शोधा आणि बघा, कारण गालील प्रांतातून संदेष्टा उद्भवत नाही.”
53 I otiđoše svaki svojoj kući.
५३मग ते सर्वजण आपआपल्या घरी गेले.