< Jeremija 11 >

1 Riječ koju je Jahve uputio Jeremiji:
यिर्मयाला परमेश्वराकडून मिळालेले वचन, ते म्हणाले:
2 “Govori Judejcima i Jeruzalemcima.
“यिर्मया, या कराराची वचने ऐक, आणि यहूदाच्या प्रत्येक मनुष्यास आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या हे घोषीत कर.
3 Reci im: Ovako veli Jahve, Bog Izraelov: 'Proklet bio čovjek koji ne posluša riječi Saveza ovoga,
त्यांना असे सांग की, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘जो कोणी या कराराची वचने ऐकत नाही, तो शापित असो.’
4 riječi koje sam zapovjedio ocima vašim kad sam ih izveo iz zemlje egipatske, iz one peći ražarene, govoreći: Poslušajte glas moj i činite sve što vam zapovjedim: tada ćete biti narod moj, a ja vaš Bog,
तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढून आणले, त्यावेळी मी त्यांना हा करार आज्ञापिला आणि ही वचने आचरनात आणा, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन.
5 da bih ispunio zakletvu kojom sam se zakleo ocima vašim da ću im dati zemlju u kojoj teče mlijeko i med - kao što je danas.'” A ja odgovorih i rekoh: “Tako je, Jahve.”
तुमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाकरिता मी हे करीन, दूध व मध यांची रेलचेल असलेली सुपीक भूमी द्यायचे मी त्यांना कबूल केले होते. त्याच भूमीवर तुम्ही आता राहत आहात.” तेव्हा मी म्हणालो होय, परमेश्वरा!
6 I dalje mi reče Jahve: “Objavi riječi ove po gradovima judejskim i po ulicama jeruzalemskim: 'Poslušajte riječi Saveza ovoga, te ih izvršavajte.
परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या शहरांतून व यरूशलेमेच्या रस्त्यांतून हे वचन घोषीत कर, कराराची वचने ऐका आणि त्यांचे पालन करा.
7 Jer sam ozbiljno opominjao očeve vaše kad sam ih izvodio iz zemlje egipatske i do danas ih neumorno opominjem: Poslušajte glas moj!
कारण मी त्यांना मिसरच्या बाहेर काढले त्या दिवसापासून या दिवसापर्यंत मी तुमच्या पूर्वजांना इशारा देत आलो आहे की माझा शब्द ऐका.
8 Ali oni ne slušahu i ne prignuše uha svojega, nego se povedoše za okorjelošću zloga srca svoga. Zato dopustih da se na njima ispune sve riječi Saveza ovoga za koji im zapovjedih da ga se pridržavaju, ali ga se oni ne pridržavahu.'”
पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही. ते दुराग्रही हृदयाचे बनले आणि आवडेल तेच त्यांनी केले. म्हणून मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व शापित गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.”
9 I reče mi Jahve: “Zavjera je među Judejcima i Jeruzalemcima.
नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील आणि यरूशलेममधील लोकांमध्ये कट सापडला आहे.
10 Vratiše se bezakonjima svojih otaca koji se oglušiše na moje riječi, pa trčahu za tuđim bogovima da im služe. Dom Izraelov i dom Judin prekršiše Savez moj koji sam sklopio s ocima njihovim.”
१०ते त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पापांकडे वळले आहेत. त्यांच्या पूर्वजांनी माझे ऐकण्याचे नाकारले. त्यांनी दुसऱ्या देवांचे अनुसरण केले. त्यांची पूजा केली. इस्राएल व यहूदाच्या वंशजांनी, त्यांच्या पूर्वजांनी माझ्याशी केलेल्या, कराराचा भंग केला आहे.”
11 Zato ovako govori Jahve: “Evo, dovest ću na njih zlo kojemu neće umaći; vapit će k meni, ali ih ja neću slušati.
११म्हणून परमेश्वर म्हणतो, मी त्यांना भयंकर संकटात टाकीन, ज्यातून त्यांना सुटका करून घेता येणार नाही. तेव्हा ते मदतीसाठी माझा धावा करतील, पण मी त्यांचे ऐकणार नाही.
12 Onda neka gradovi judejski i žitelji jeruzalemski vapiju k bogovima kojima kade, ali im oni neće pomoći u vrijeme nevolje!
१२यहूदातील शहरे व यरूशलेममधील रहिवासी ज्यांना ते अर्पणे देत असत, आणि धूप जाळीत असत, असे ते त्यांच्या देवांकडे आरोळी करतील, पण त्या भयंकर संकटकाळी लोकांस मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.
13 Jer imaš, o Judejo, bogova koliko i gradova! I koliko ima ulica u Jeruzalemu, toliko žrtvenika podigoste da kadite Baalu.
१३कारण यहूदा तुझ्या नगरा इतकेच तुझे देव झाले आहेत, आणि तू लज्जास्पद बाल देवाच्या वेद्या, बाल देवाच्या धूप वेद्या, यरूशलेमामधल्या रस्त्यांच्या संख्येइतक्याच केल्या आहेत.
14 Ti, dakle, ne moli milosti za taj narod, ne diži glasa za njih i ne moli, jer ih neću uslišiti kad me zazovu u nevolji svojoj.”
१४यिर्मया, तू या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस आणि त्यांच्यासाठी विनंती करु नकोस. कारण जेव्हा ते दु: खात माझा धावा करतील, तेव्हा मी त्यांचे ऐकणार नाही.
15 Što li će draga moja u Domu mome? Kuje zle osnove. Hoće li pretilina i meso posvećeno ukloniti zlo od tebe? Mogu li te stoga proglasiti čistom?
१५“माझ्या प्रिय लोकांनी, ज्यांनी इतके दुष्ट हेतू धरले आहेत, ते माझ्या घरात का आहेत? कारण तुझ्या अर्पणाचे मांस तुझा बचाव करु शकणार नाही, कारण तू वाईट केले आणि नंतर आनंद केला.”
16 “Zelena maslina lijepa uzrasta”, tako te Jahve nazva. A sada uz prasak veliki plamenom sažiže njeno lišće; spaljene su grane njene.
१६“दिसावयास देखणे असणाऱ्या हिरव्यागार फळाचे जैतूनाचे झाड असे नाव परमेश्वराने तुला दिले होते. पण आता मोठ्या गर्जनेच्या आवाजासहित त्याने त्यावर अग्नी पेटवला आहे. आणि त्याच्या फांद्या तोडल्या आहेत.
17 Jahve nad Vojskama, koji te bijaše posadio, nesreću ti namijeni zbog zločina što ga učini dom Izraelov i dom Judin kadeći Baalu da bi mene razgnjevili.
१७कारण सेनाधीश परमेश्वर, ज्याने तुला लावले आहे, तो तुझ्या विरूद्ध अरिष्ट बोलला आहे. कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बाल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.”
18 Jahve mi objavi te znam! Tada mi ti, Jahve, razotkri njihove spletke.
१८परमेश्वराने मला या गोष्टींचे ज्ञान दिले. म्हणून मला त्या समजल्या. परमेश्वरा, तू मला त्यांची कृत्ये दाखवली.
19 A ja bijah kao jagnje krotko što ga vode na klanje i ne slutih da protiv mene snuju pakosne naume. “Uništimo drvo još snažno, iskorijenimo ga iz zemlje živih, da mu se ime nikad više ne spominje!”
१९ते माझ्याविरूद्ध योजना आखत आहेत हे मला माहीत नव्हते. मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्यास जीवंताच्या देशातून तोडून टाकू म्हणजे त्याचे नाव आठवणीत राहणार नाही.”
20 Ali ti, Jahve nad Vojskama, koji pravedno sudiš, koji ispituješ srca i bubrege, daj da vidim kako se njima osvećuješ, jer tebi povjerih parnicu svoju.
२०पण सेनाधीश परमेश्वर, जो तू सत्याने न्याय करतोस, जो तू हृदय व मन पारखतोस. तू त्यांच्यावर केलेला प्रतिकार मी साक्ष देईन, कारण मी आपला वाद तुझ्याजवळ उघड केला आहे.
21 Zato Jahve nad Vojskama govori protiv ljudi u Anatotu koji mi rade o glavi i govore: “Ne prorokuj više u ime Jahvino, da ne pogineš od ruke naše!”
२१अनाथोथच्या लोकांबद्दल परमेश्वर या गोष्टी म्हणतो, जे तुझा जीव घेण्यास पाहत आहेत. ते म्हणातात, “परमेश्वराच्या नावावर भविष्यकथन करु नकोस, नाहीतर आम्ही तुला आमच्या हाताने ठार करु.”
22 Ovako govori Jahve nad Vojskama: “Evo, ja ću ih kazniti. Njihovi će mladići od mača poginuti, sinovi i kćeri pomrijet će od gladi.
२२यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “त्यांना मी शिक्षा करीन. त्यांचे तरुण तलवारीने मरण पावतील. त्यांची मुले आणि त्यांच्या मुली दुष्काळाने मरतील.
23 Ni ostatka neće ostati kad donesem nesreću ljudima u Anatotu u godini kazne njihove.”
२३त्यांच्यातील एकही मनुष्य शिल्लक राहणार नाही. कारण मी अनाथोथच्या लोकांवर वाईट, म्हणजे त्यांच्या शासनाचे वर्ष आणतो.”

< Jeremija 11 >