< Izaija 60 >

1 Ustani, zasini, jer svjetlost tvoja dolazi, nad tobom blista Slava Jahvina.
“उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.”
2 A zemlju, evo, tmina pokriva, i mrklina narode! A tebe obasjava Jahve, i Slava se njegova javlja nad tobom.
जरी अंधार पृथ्वीला आणि निबीड काळोख लोकांस झाकेल, तरी परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल आणि, त्याचे तेज तुझ्यावर येईल.
3 K tvojoj svjetlosti koračaju narodi, i kraljevi k istoku tvoga sjaja.
राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, आणि राजे तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
4 Podigni oči, obazri se: svi se sabiru, k tebi dolaze. Sinovi tvoji dolaze izdaleka, kćeri ti nose u naručju.
तुझ्या सभोवती पाहा! ते सर्व एकत्र जमतात आणि तुझ्याकडे येतात. तुझी मुले दूरुन येतील आणि तुझ्या मुलींना कडेवर बसून आणतील.
5 Gledat ćeš tad i sjati radošću, igrat će srce i širit' se, jer k tebi će poteći bogatstvo mora, blago naroda k tebi će pritjecati.
तेव्हा तू हे पाहशील आणि आनंदाने उल्हासीत होशील, आणि तुझे हृदय हर्षाने भरून वाहेल. कारण समुद्रातील भरपूर संपत्ती तुझ्यापुढे ओतली जाईल, राष्ट्रांचे सर्व धन तुझ्याकडे येईल.
6 Mnoštvo deva prekrit će te, jednogrbe deve iz Midjana i Efe. Svi će iz Šebe doći donoseći zlato i tamjan i hvale Jahvi pjevajući.
मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील, शेबातले सर्व येतील, ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
7 Sva stada kedarska u tebi će se sabrati, ovnovi nebajotski bit će ti na službu. Penjat će se k'o ugodna žrtva na moj žrtvenik, proslavit ću Dom Slave svoje!
केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोथचे मेंढे तुझी सेवा करतील. ते माझ्या वेदीवर स्विकार्य असे अर्पण होतील, आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवीत करीन.
8 Tko su oni što lebde poput oblaka, k'o golubovi prema golubinjacima svojim?
हे कोण आहेत जे मेघाप्रमाणे उडतात, आणि कबुतराप्रमाणे आपल्या आश्रयस्थानाकडे उडत येतात?
9 Da, to se zbog mene sabiru brodovi, lađe su taršiške pred njima da izdaleka dovezu tvoje sinove, a s njima srebro njihovo i zlato, zbog imena Jahve, Boga tvojega, zbog Sveca Izraelova koji te proslavi.
द्वीपे माझी वाट पाहतात, आणि परमेश्वर तुझा देव याच्या नावासाठी, आणि इस्राएलाच्या पवित्रासाठी तुझ्या मुलांना आपले सोने व रुपे यांसहीत दुरुन आणावे, म्हणून पहिल्याने तार्शीशाची जहाजे वाट पाहतील, कारण त्याने तुला शोभविले आहे.
10 Zidine će tvoje obnoviti stranci i kraljevi njihovi služit će ti. U svojoj srdžbi ja sam te udario, al' u svojoj naklonosti opet ti se smilovah.
१०विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. “जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.”
11 Vrata će tvoja biti otvorena svagda, ni danju ni noću neće se zatvarati, da propuste k tebi bogatstva naroda s kraljevima koji ih vode.
११तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. ह्यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे.
12 Jer propast će narod i kraljevstvo koje ti ne bude htjelo služiti, i ti će se narodi sasvim zatrti.
१२खचित, जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही त्याचा नाश होईल, ती राष्ट्रे पुर्णपणे विनाश पावतील.
13 K tebi će doći slava Libanona, čempresi, jele i brijestovi skupa, da ukrase prostor mojega Svetišta, podnožje će moje proslaviti!
१३माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानोनाचे वैभव म्हणजे सरू, देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील, आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील.
14 K tebi će, sagnuti, dolaziti sinovi tvojih tlačitelja, pred noge ti padat' koji te prezirahu. Nazivat će te Gradom Jahvinim, Sionom Sveca Izraelova.
१४ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील.
15 Zato što si bio ostavljen, omražen, izbjegavan, učinit ću te vječnim ponosom, radošću od koljena do koljena.
१५“तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे, मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.”
16 Ti ćeš sisati mlijeko naroda, sisat ćeš grudi kraljeva. I znat ćeš da sam ja, Jahve, Spasitelj tvoj, Silni Jakovljev, tvoj Otkupitelj.
१६तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार, मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे.
17 Mjesto mjedi, donijet ću zlato; mjesto željeza, donijet ću srebro; mjesto drva, mjed; mjesto kamena, željezo. Za glavara tvoga postavit ću Mir, Pravdu za vladara.
१७“मी पितळेच्या ऐवजी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी चांदी आणीन, आणि लाकडाच्या ऐवजी, पितळे व दगडांच्या ऐवजी लोखंड आणील. तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन.”
18 Više se neće slušat' o nasilju u tvojoj zemlji ni o pustošenju i razaranju na tvojem području. Zidine ćeš svoje nazivati Spasom, Slavom svoja vrata.
१८तुझ्या भूमीत पुन्हा कधीही हिंसेची वार्ता आणि नासधूस किंवा उजाडी ऐकू येणार नाही, परंतु तू तुझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती म्हणशील.
19 Neće ti više sunce biti svjetlost danju nit' će ti svijetlit' mjesečina, nego će Jahve biti tvoje vječno svjetlo i tvoj će Bog biti tvoj sjaj.
१९“दिवसा सुर्य तुझा प्रकाश असणार नाही, आणि चंद्राचा उजेडही तुझ्यावर चमकणार नाही. पण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश होईल, आणि तुझा देवच तुझे वैभव असणार.”
20 Sunce tvoje neće više zalaziti nit' će ti mjesec pomrčati, jer će Jahve biti tvoje vječno svjetlo, i okončat će se dani tvoje žalosti.
२०“तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही. कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल, आणि तुझ्या शोकाचे दिवस संपतील.”
21 Svi u tvom narodu bit će pravednici i posjedovat će zemlju dovijeka, mog nasada izdanci, mojih ruku djelo, da bih se u njima proslavio.
२१“तुझे सर्व लोक नितीमान असतील, आणि माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप, माझ्या हाताचे कृत्य असे ते सर्वकाळपर्यंत भूमी वतन करून घेतील.”
22 Od najmanjega postat će tisuća, od neznatnoga moćan narod. Ja, Jahve, govorio sam; u pravo ću vrijeme izvršiti.
२२“जो लहान तो हजार होईल, आणि जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. मी, परमेश्वर, त्या समयी हे लवकर घडवून आणणार.”

< Izaija 60 >