< Izaija 54 >
1 Kliči, nerotkinjo, koja nisi rađala; podvikuj od radosti, ti što ne znaš za trudove! Jer osamljena više djece ima negoli udata, kaže Jahve.
१“तू वांझ स्त्री, तू जन्म दिला नाहीस; ज्या तुला प्रसूतिवेदना नाहीत, ती तू आनंदाने आणि मोठ्याने आरोळी मारून जयघोष करून गायन कर. कारण परमेश्वर म्हणतो, ‘विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा एकाकी असणाऱ्याची मुले अधिक आहेत.’”
2 Raširi prostor svog šatora, razastri, ne štedi platna svog prebivališta, produži mu užeta, kolčiće učvrsti!
२तू आपला तंबू मोठा कर आणि तंबूचे पडदे अधिक दूर बाहेर पसरण्याचे थांबू नको; आपल्या दोऱ्या लांब कर आणि आपल्या मेखा मजबूत कर.
3 Jer proširit ćeš se desno i lijevo. Tvoje će potomstvo zavladat' narodima i napučit će opustjele gradove.
३कारण उजवीकडे आणि डावीकडे तुझा विस्तार होईल, आणि तुझे वंशज राष्ट्रांस जिंकून घेतील आणि उजाड झालेल्या नगरांना वसवतील.
4 Ne boj se, nećeš se postidjeti; na srami se, nećeš se crvenjeti. Zaboravit ćeš sramotu svoje mladosti i više se nećeš spominjati rugla udovištva svoga.
४घाबरू नकोस कारण तू लज्जित होणार नाहीस किंवा निराश होऊ नको कारण तू कलंकीत होणार नाहीस; तू आपल्या तरुणपणाची लाज आणि आपल्या त्यागण्याची बदनामी विसरशील.
5 Jer suprug ti je tvoj Stvoritelj, ime mu je Jahve nad Vojskama; tvoj je Otkupitelj Svetac Izraelov, Bog zemlje svekolike on se zove.
५कारण तुझा निर्माता तुझा पती आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे. इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारक आहे; त्यास सर्व पृथ्वीचा देव असे म्हटले जाईल.
6 Jest, k'o ženu ostavljenu, u duši ucviljenu, Jahve te pozvao. Zar se smije otpustiti žena svoje mladosti, pita Bog tvoj.
६कारण तुला त्यागलेली आणि आत्म्यात दुःखीत पत्नीप्रमाणे परमेश्वर तुला परत बोलावित आहे, तरुण विवाहीत स्त्रीप्रमाणे आणि नाकारलेली, असे तुझा देव म्हणत आहे.
7 “Za kratak trenutak ostavih tebe, al' u sućuti velikoj opet ću te prigrliti.
७मी तुला थोड्या वेळासाठी सोडले, परंतु मोठ्या करुणेने मी तुला एकत्र करीन.
8 U provali srdžbe sakrih načas od tebe lice svoje, al' u ljubavi vječnoj smilovah se tebi,” govori Jahve, tvoj Otkupitelj.
८मी रागाच्या भरात क्षणभर आपले तोंड तुजपासून लपवले; पण मी सर्वकाळच्या कराराच्या विश्वासाने मी तुझ्यावर दया करीन. असे परमेश्वर, तुझा तारणहार म्हणतो.
9 “Bit će mi k'o za Noinih dana, kad se zakleh da vode Noine neće više preplaviti zemlju; tako se zaklinjem da se više neću na tebe srditi nit' ću ti prijetiti.
९“कारण नोहाच्या जलाप्रमाणे हे मला आहेः जशी मी शपथ घेऊन म्हणालो नोहाचा जलप्रलय पुन्हा कधीही भूमीवर चालणार नाही, तशी मी शपथ घेतली मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुला धिक्कारणार नाही.
10 Nek' se pokrenu planine i potresu brijezi, al' se ljubav moja neće odmać' od tebe, nit' će se pokolebati moj Savez mira,” kaže Jahve koji ti se smilovao.
१०जरी पर्वत कोसळतील आणि टेकड्या ढळतील, तरी माझा कराराचा विश्वासूपणा तुझ्यापासून दूर होणार नाहीत किंवा माझ्या शांतीचा करार ढळणार नाही, असे तुझ्यावर दया करणारा परमेश्वर म्हणतो.
11 “O nevoljnice, vihorom vitlana, neutješna, gle, postavit ću na smaragd tvoje kamenje i na safir tvoje temelje.
११अगे जाचलेले, वादळाने मस्त झालेले आणि सांत्वन न पावलेले, पाहा, तुझे पाषाण सुरम्य रंगात बसवीन, आणि तुझा पाया नीलमण्यांनी घालीन.
12 Od rubina dići ću ti kruništa, vrata tvoja od prozirca, ograde ti od dragulja.
१२तुझा कळस माणकांचा आणि तुझ्या वेशी मी चकाकणारी रत्ने करीन, आणि बाहेरील भींत सुंदर खड्यांची करीन.
13 Svi će ti sinovi Jahvini biti učenici, i velika će biti sreća djece tvoje.
१३आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल.
14 Na pravdi ćeš biti zasnovana. Odbaci tjeskobu, nemaš se čega bojati, odbaci strah jer ti se neće primaći.
१४नीतिमत्तेत तू स्थापीत होशील. तुला येथून पुढे छळाचा अनुभव येणार नाही, कारण तू भिणार नाही, आणि तुला घाबरवण्यास कोणीही तुझ्याजवळ येणार नाही.
15 Ako li te napadnu, neće doći od mene; tko se na te digne, zbog tebe će pasti.
१५पाहा, जर कोणीएक अशांतता निर्माण करीत असेल, तर ती माझ्यापसून नाही; कोणीएक तुझ्याबरोबर अशांतता निर्माण करतो तो अपयशात पडेल.
16 Gle, ja sam stvorio kovača koji raspaljuje žeravu i vadi iz nje oružje da ga kuje. Ali stvorih i zatornika da uništava.
१६पाहा, मी लोहाराला निर्माण केले, जो तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो आणि आपल्या कामासाठी हत्यार घडवितो आणि विनाशासाठी मी विनाशक उत्पन्न करतो.
17 Neće uspjeti oružje protiv tebe skovano. Dokazat ćeš da je zao svaki jezik što na te udari na sudu. To je baština slugu Jahvinih, to im je pobjeda od mene” - riječ je Jahvina.
१७तुझ्याविरुध्द तयार केलेले कोणतेही हत्यार सफल होणार नाही; आणि तुजवर आरोप ठेवणाऱ्या प्रत्येकास दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आणि माझ्यापासून त्यांचे समर्थन आहे.” हे परमेश्वराचे म्हणणे आहे.