< Ezekiel 43 >
1 Zatim me povede k vratima što gledaju na istok.
१नंतर त्या मनुष्याने जे दार पूर्वेकडे उघडते त्याकडे मला नेले.
2 I gle, Slava Boga Izraelova dolazi od istoka; šum joj kao šum velikih voda: i zemlja se sjala od slave njegove.
२तेव्हा पाहा! पूर्वेकडून इस्राएलाच्या देवाचे तेज आले. त्याचा शब्द पुष्कळ जलांच्या ध्वनीप्रमाणे होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.
3 To viđenje koje gledah bijaše kao viđenje što ga vidjeh kad dođoh da uništim grad i kao viđenje koje vidjeh na rijeci Kebaru. Padoh ničice.
३आणि जेव्हा तो नगराचा नाश करायला आला होता तेव्हा जो दृष्टांत मी पाहिला होता त्याच्यासारखे ते दृष्टांत होते, खबार नदीतीरी पाहिलेल्या दृष्टांतासारखाच हा दृष्टांत होता आणि तेव्हा मी उपडा पडलो.
4 A Slava Jahvina uđe u Dom na vrata koja gledaju na istok.
४जे दार पूर्वेकडे उघडे होते त्यातून परमेश्वराचे तेज मंदिरात आले.
5 Tada me duh podiže i odvede u unutrašnje predvorje. I gle: Dom bijaše pun Slave Jahvine.
५मग आत्म्याने मला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. पाहा! परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले.
6 I čuh glas koji mi iz Doma govori, a kraj mene netko stajaše.
६मंदिराच्या आतून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याचे मी ऐकले आणि तो मनुष्य माझ्या शेजारीच उभा होता.
7 I reče mi: “Sine čovječji, ovo je mjesto mojega prijestolja, ovo je mjesto stopa mojih nogu: ovdje ću, posred sinova Izraelovih, prebivati zauvijek. Izraelov dom neće više oskvrnjivati moje sveto ime - ni oni ni njihovi kraljevi - svojim bludništvom i truplima svojih kraljeva:
७तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही माझ्या सिंहासनाची व पादसनाची जागा आहे, येथे मी इस्राएलाच्या लोकांमध्ये सर्वकाळ राहीन. इस्राएल घराणे व त्याचे राजे आपल्या व्यभिचाराने व त्यांच्या राजांनी स्थापिलेल्या प्रेतवत मूर्तींनी आपल्या उंचस्थानात माझ्या नावाला बट्टा लावणार नाहीत.
8 stavili su svoj prag do moga, svoje dovratnike do mojih, tako da je bio samo zid između mene i njih, i oskvrnjivali su moje sveto ime gnusobama koje počiniše. I zato ih zatrijeh u svojem gnjevu.
८त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्याशेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभाशेजारी उभारीले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती. अमंगळ कृत्ये करून त्यांनी माझ्या नावास बट्टा लाविला आहे. म्हणून मी आपल्या रागाने त्यांना नष्ट केले आहे.
9 Sada će oni ukloniti daleko od mene svoje bludništvo i trupla svojih kraljeva, a ja ću zauvijek prebivati posred njih.
९आता त्यांनी आपला व्यभिचार आणि व राजांची प्रेते माझ्यापासून दूर करावी. म्हणजे मी सर्वकाळ त्यांच्यात राहीन.
10 Sine čovječji, pokaži domu Izraelovu ovaj Dom da se posrame sa svojih bezakonja. Neka mu izmjere razmjere.
१०मानवाच्या मुला, तू इस्राएलाच्या घराण्याला हे घर दाखीव, अशासाठी की, त्यांनी आपल्या अन्यायामुळे लज्जित व्हावे; त्यांनी त्यांच्या वर्णनाविषयी विचार करावा.
11 Ako se posrame zbog svega što učiniše, opiši im Dom i njegove razmjere, njegove izlaze i ulaze, sve njegovo obličje, sve propise i sve zakone; upoznaj ih i nacrtaj im da vide i da čuvaju i provedu sve njegovo obličje i sve propise o njemu.
११कारण जे त्यांनी केले आहे त्या सर्वामुळे जर ते लज्जित होतील तर त्यांना घराचे रूप, त्याची रचना, व त्याची बाहेर निघण्याची ठिकाणे, व त्याचे प्रवेश, त्याचे सर्व आकार व त्याचे सर्व नियम व त्याचे सर्व प्रकार व त्याचे सर्व विधी दाखीव आणि हे त्याच्यासमक्ष लिही. अशासाठी की, त्यांनी त्याचा सर्व आकार व त्याचे सर्व नियम पाळावे व ते आचरावे.
12 A ovo je zakon za Dom: navrh gore, sav prostor uokolo, bit će najsvetija svetinja.
१२हा मंदिरासाठीचा नियम आहे, पर्वतमाथ्यावरची सर्व जागा अति पवित्र आहे. पाहा, हा मंदिराचा नियम आहे.
13 Ovo su mjere žrtvenika, na laktove - a lakat je ovdje jedan lakat i pedalj: podnožje žrtvenika lakat dugo, lakat široko; obrub kojim je obrubljen uokolo - jedan pedalj. Visina žrtvenika:
१३हातांनी वेदीची मापे ही आहेत. तिचा तळभाग एक हात व रुंदी एक हात होईल. आणि तिची कड तिच्याकाठापाशी सभोवती एक वीत होईल आणि हा वेदीचा पाया होय.
14 od podnožja na zemlji do donjega pojasa žrtvenika - dva lakta, a u širinu jedan lakat; od manjeg pojasa do većega četiri lakta, a u širinu jedan lakat.
१४तिच्या तळभागापासून खालच्या बैठकीपर्यंत उंची दोन हात व रुंदी एक हात होती. वेदी लहान बैठकीपासून मोठ्या बैठकीपर्यंत चार हात व दोन हात रुंद होती.
15 A samo žrtvište: četiri lakta visoko. A sa žrtvišta dižu se uvis četiri roga.
१५वेदीच्या वरच्या भागाची उंची चार हात होती. वेदीच्या अग्नीकुंडाला लागून वर गेलेली चार शिंगे होती.
16 Žrtvište: dvanaest lakata dugo, dvanaest lakata široko, četvorina, na sve četiri strane.
१६वेदीवरील अग्नीकुंडाची लांबी बारा हात व रुंदी बारा हात अशी चौरस होती.
17 A pojas: četrnaest lakata dug i četrnaest lakata širok, na četiri strane; njegov rub uokolo pol lakta, a podnožje oko njega uokolo jedan lakat; stepenice mu gledaju na istok.”
१७तिची बैठक चौदा हात लांब व चौदा हात रुंद होती. त्याची कड दीड हात रुंद होती. तिच्यासभोवती कड अर्धा हात रुंद होता. तिचा तळभाग सभोवार एक हात उंच होता. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या.”
18 I reče mi: “Sine čovječji, ovako govori Jahve Gospod: 'Ovo su propisi žrtveni po kojima se u svoje vrijeme mora podići žrtvenik da se na njemu prinose paljenice i da se po njemu škropi krvlju.
१८पुढे तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, प्रभू परमेश्वर म्हणतो, या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे म्हणून ते ती तयार करतील त्या दिवशी तिचे नियम हेच आहेत.
19 Svećenicima levitima, potomcima Sadokovim, koji pristupaju k meni da mi služe - riječ je Jahve Gospoda - dat ćeš june za žrtvu okajnicu.
१९प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझी सेवा करावयला माझ्याजवळ येणाऱ्या लेवी वंशातला सादोक कुळातील याजक यास पापार्पणासाठी एक गोऱ्हा दे.
20 Uzet ćeš njegove krvi i njome pomazati četiri roga žrtvišta i četiri ugla pojasa i obrub sve uokolo da okajnicom pomiriš žrtvenik.
२०तू त्याच्या रक्तातले थोडेसे घेऊन वेदीच्या चारी शिंगावर, बैठकीच्या चारी कोपऱ्यावर आणि सर्व बाजूंच्या कडेवर शिंपड. अशा रीतीने तू प्रायश्चित करून शुद्ध कर.
21 Zatim uzmi june i spali ga na odijeljenom mjestu Doma, izvan Svetišta.
२१मग पापार्पण करण्यासाठी बैल घे आणि त्याने पवित्रस्थानाच्या बाहेर मंदिराच्या नेमलेल्या जागी होम करावे.
22 Sutradan prinesi jarca bez mane kao okajnicu, neka se njime okaje žrtvenik kao što je okajan junetom.
२२नंतर दुसऱ्या दिवशी तू पापार्पणासाठी निर्दोष बोकड घे. जसे त्यांनी बैलाच्या होमाने वेदी शुद्ध केली तसे याजकांनी ती शुद्ध करावी.
23 A kad ga okaješ, prinesi junca bez mane i ovna bez mane iz stada:
२३जेव्हा तू तिचे शुद्धीकरण समाप्त करशील तेव्हा कळपातून एक निर्दोष गोऱ्हा व निर्दोष मेंढा अर्पण करशील.
24 prikaži ih pred Jahvom, a svećenici neka ih pospu solju i neka ih prinesu kao paljenicu Jahvi.
२४तू हे परमेश्वरापुढे अर्पण कर. याजक त्यावर मीठ टाकील आणि ते होमार्पण करून परमेश्वरास अर्पण करतील.
25 Sedam dana svaki dan prinesi jednog jarca za grijeh; i neka se prinese june i ovan iz stada, oba bez mane.
२५तू सात दिवस, रोज एकएका निर्दोष बकऱ्याचे पापार्पण कर; एक गोऱ्हा व कळपातील एक निर्दोष मेंढा हेही अर्पण करावे.
26 Sedam dana neka se pomiruje žrtvenik i neka se čisti i posvećuje.
२६सात दिवस ते वेदीचे प्रायश्चित करतील व तिला शुद्ध करतील. अशा रीतीने त्यांनी ते पवित्रीकरण विधी करावे.
27 Pošto se navrše ti dani, od osmoga dana unapredak neka svećenici žrtvuju na žrtveniku vaše paljenice i pričesnice; i omiljet ćete mi' - riječ je Jahve Gospoda.”
२७आणि त्यांनी ते दिवस समाप्त केल्यावर असे होईल की, आठव्या दिवशी व त्यापुढे याजक तुमची शांत्यर्पणे वेदीवर अर्पितील आणि मी तुमचा स्विकार करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”