< Izlazak 24 >
1 Potom reče Mojsiju: “Uzađi k Jahvi - ti, Aron, Nadab i Abihu i sedamdeset izraelskih starješina. Poklonite se izdaljega!
१मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलापैकी सत्तरजण असे मिळून परमेश्वराकडे पर्वतावर चढून येऊन त्यास दुरूनच नमन करा;
2 Neka se sam Mojsije primakne k Jahvi! Oni neka se ne primiču, a puk neka se s njim ne penje.”
२मग मोशेने एकट्यानेच परमेश्वराजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.”
3 Dođe Mojsije i kaza narodu sve riječi Jahvine i sve odredbe. A sav puk odgovori u jedan glas: “Sve riječi što ih Jahve reče, vršit ćemo.”
३मोशेने लोकांस परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एका आवाजात म्हणाले, “परमेश्वराने जी वचने सांगितलेली त्या सर्वांप्रमाणे आम्ही करू.”
4 Tada Mojsije popiše sve riječi Jahvine. A ujutro podrani te podigne žrtvenik na podnožju brda i dvanaest stupova za dvanaest plemena Izraelovih.
४तेव्हा मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली, मोशेने पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा वंशाप्रमाणे बारा स्तंभ उभे केले.
5 Zatim naloži mladim Izraelcima da prinesu žrtve paljenice i da žrtvuju Jahvi junce kao žrtve pričesnice.
५मग मोशेने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना परमेश्वरास होमबली व बैलाची शांत्यर्पणे अर्पण करायला पाठवले.
6 Mojsije uhvati krv; polovinu krvi ulije u posude, a polovinu izlije po žrtveniku.
६मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे रक्त त्याने वेदीवर शिंपडले.
7 Prihvati zatim Knjigu Saveza pa je narodu glasno pročita, a narod uzvrati: “Sve što je Jahve rekao, izvršit ćemo i poslušat ćemo.”
७मग मोशेने कराराचे पुस्तक घेऊन लोकांस वाचून दाखविले आणि ते ऐकून लोक म्हणाले, “परमेश्वराने सांगितले आहे तसे आम्ही करू आणि त्याने दिलेल्या आज्ञा आम्ही पाळू.”
8 Mojsije potom uzme krvi te poškropi narod govoreći: “Ovo je krv Saveza koji je Jahve s vama uspostavio na temelju svih ovih riječi.”
८मग मोशेने रक्त घेऊन लोकांवर शिंपडले. तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी या वचनाप्रमाणे करार केला आहे असे हे त्या कराराचे रक्त आहे.”
9 Onda se uspne Mojsije s Aronom, Nadabom i Abihuom i sa sedamdeset starješina Izraelovih.
९नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले.
10 Oni vidješe Boga Izraelova: podnožje njegovim nogama kao da je bilo od dragoga kamena safira, sjajem nalik na samo nebo.
१०तेथे त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; इंद्रनीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ होते
11 Ni ruke svoje nije pružio na izabranike Izraelaca: slobodno su Boga motrili i jeli i pili.
११इस्राएलातील वडिलधाऱ्या मनुष्यांनी देवाला पाहिले, परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.
12 Onda Jahve reče Mojsiju: “Popni se k meni na brdo i pričekaj ondje. Dat ću ti kamene ploče sa zakonom i zapovijedima koje sam za njihovu pouku napisao.”
१२परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांच्या शिक्षणासाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.”
13 Ustane Mojsije i njegov pomoćnik Jošua te se Mojsije popne na brdo Božje.
१३तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर चढून गेला.
14 A starješinama reče: “Čekajte nas ovdje dok se ne vratimo. Eto je s vama Aron i Hur. Tko imadne kakvu razmiricu, neka se obrati na njih.”
१४मोशे इस्राएलांच्या वडिलांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच थांबा, मी परत येईपर्यंत अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.”
15 Zatim Mojsije uzađe na brdo, a onda oblak prekri brdo.
१५मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला;
16 Slava se Jahvina nastani na Sinajskom brdu i oblak ga obavijaše šest dana. Sedmoga dana zovne Jahve Mojsija isred oblaka.
१६परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वराने मोशेला हाक मारली.
17 Slava Jahvina na vrhuncu brda bijaše očima Izraelaca kao vatra koja sažiže. Mojsije zađe u oblak i uspne se na brdo.
१७इस्राएल लोकांस पर्वताच्या शिखरावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे दिसत होते.
18 Četrdeset dana i četrdeset noći boravio je Mojsije na brdu.
१८मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.