< Estera 3 >
1 Poslije tih događaja kralj Ahasver promaknu Hamana, Hamdatina sina, Agađanina: uzvisi ga i njegovo prijestolje postavi iznad svih ostalih dostojanstvenika koji su bili s njim.
१या सर्व घडामोडी झाल्यानंतर अहश्वेरोश राजाने हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामान ह्याला बढती देऊन गौरव केला. त्याच्याबरोबरच्या सर्व अधिकाऱ्यांपेक्षा वरचे आसन त्यास दिले.
2 Svi službenici kraljevi koji su se nalazili na kraljevim vratima prigibali bi koljena i padali ničice pred Hamanom, jer je tako zapovjedio kralj. Ali Mordokaj ne bi prignuo koljeno niti bi pao ničice.
२राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजाचे सर्व सेवक हामानाला नमन व मुजरा करून मान देऊ लागले. पण मर्दखय त्यास नमन किंवा मुजरा करीत नसे.
3 Službenici kraljevi koji su se nalazili na vratima kraljevim rekoše Mordokaju: "Zašto prestupaš kraljevu zapovijed?"
३तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयाला विचारले, “राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस?”
4 Iako su mu oni to ponavljali svaki dan, on ih ne posluša. Onda oni to dojaviše Hamanu, da vide vrijedi li Mordokajevo opravdanje. Jer im bijaše rekao da je Židov.
४राजाचे सेवक त्यास दररोज हेच विचारू लागले तरी त्याने मुजरा करायची राजाज्ञा पाळली नाहीच. तेव्हा असे झाले की, मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहावे म्हणून त्यांनी हामानाला सांगितले; आपण यहूदी असल्याचे त्याने या सेवकांना सांगितले होते.
5 Kad Haman utvrdi da Mordokaj niti prigiba koljeno niti pada ničice pred njim, jako se razljuti.
५जेव्हा मग मर्दखय आपल्याला नमन व मुजरा करत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा तो संतापला.
6 A kad dozna kojemu narodu pripada, učini mu se premalo podići ruke na samog Mordokaja nego naumi s njim pobiti i sve Židove koji su živjeli u svem kraljevstvu Ahasverovu.
६पण फक्त मर्दखयाला जिवे मारणे त्यास अपमानकारक वाटले. कारण मर्दखयाचे लोक कोण होते, ते त्यांनी हामानाला सांगितले होते, म्हणून अहश्वेरोशाच्या राज्यातल्या सर्वच्या सर्व यहूदी लोकांस कसे मारता येईल याचा विचार तो करु लागला.
7 U prvom mjesecu, to jest u mjesecu Nisanu, dvanaeste godine Ahasverova kraljevanja u nazočnosti Hamana baciše "Pur", to jest ždrijeb, da utvrde dan i mjesec. Ždrijeb pade na trinaesti dan dvanaestoga mjeseca, to jest na mjeseca Adara.
७अहश्वेरोश राजाच्या कारकीर्दीच्या बाराव्या वर्षीच्या पहिल्या महिन्यामध्ये, हामानाने विशेष दिवस आणि महिना निवडण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या, त्या चिठ्ठ्या ते रोज व प्रत्येक महिन्यांमध्ये टाकत होते त्यानुसार अदार हा बारावा महिना त्यांनी निवडला.
8 I Haman kaza kralju Ahasveru: "U svim pokrajinama tvoga kraljevstva ima jedan narod razasut među drugim narodima i od njih odvojen. Njegovi su zakoni drugačiji od zakona u svih ostalih naroda. Oni se ne drže kraljevskih odredaba. Kralj ih zato ne smije pustiti na miru.
८मग हामान राजा अहश्वेरोशकडे येऊन म्हणाला, राजा अहश्वेरोश, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखरलेले व पांगलेले आहेत. इतरांपेक्षा त्यांचे कायदे वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. म्हणून त्यांना राज्यात राहू देणे राजाच्या हिताचे नाही.
9 Ako je kralju po volji, neka se raspiše da se oni zatru; a ja ću izbrojiti deset tisuća srebrnih talenata na ruke povjerenika da ih pohrane u kraljevsku riznicu."
९“जर राजाची मर्जी असल्यास, या लोकांचा संहार करण्याची आज्ञा द्यावी आणि दहा हजार किक्कार रुपे राजाच्या खजिन्यात आणावे, म्हणून मी ते तोलून राजाचे काम पाहणाऱ्यांच्या हातांत देतो.”
10 Nakon toga kralj skinu pečatni prsten s ruke i preda ga Hamanu, sinu Hamdatinu, Agađaninu, neprijatelju Židova,
१०तेव्हा राजाने आपली राजमुद्रा बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामानाला दिली.
11 i kaza mu: "Neka ti bude novac i narod, pa učini s njim što bude dobro u tvojim očima."
११राजाने हामानास म्हटले, “तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत; तुला बरे वाटेल तसे त्यांचे करावे.”
12 Trinaestoga dana prvoga mjeseca bijahu sazvani kraljevi pisari, pa o onome što je naložio Haman sastaviše pisma i upraviše ih kraljevskim namjesnicima, upraviteljima što stajahu na čelu pojedinih pokrajina, knezovima svakoga pojedinog naroda, svakoj pokrajini njezinim pismom i svakom narodu njegovim jezikom. Pisma su napisana u kraljevo ime i na njima je udaren kraljev pečat.
१२त्यानंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले. राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यांस त्यांनी हामानाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत लिहून पाठविण्यात आली. राजा अहश्वेरोशच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि त्यावर राजाची मोहर केली.
13 Po skorotečama razaslane su svim kraljevim pokrajinama poslanice da se svi Židovi, od dječaka do staraca, djeca i žene unište, pobiju, zatru, a njihova dobra da se zaplijene u jednom jedinom danu, i to trinaestog dana dvanaestog mjeseca, mjeseca Adara.
१३जासुदांनी ही पत्रे राजाच्या सर्व प्रांतात नेऊन दिली. एकाच दिवशी म्हणजे अदार महिन्याच्या, बाराव्या महिन्याच्या तेराव्या दिवशी तरुण व वृध्द माणसे, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूद्यांचा नाश करावा, त्यांना ठार करावे व त्यांचा नायनाट करावा. त्यांची सर्व मालमत्ता लुटून घ्यावी म्हणून लिहून पाठवले.
14 Sadržaj ove naredbe, koja je imala postati zakonom u svakoj pokrajini, bio je objavljen svim narodima da bi bili spremni za taj dan.
१४हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून प्रत्येक प्रांतातून हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकांस तो कळवण्यात आला, जेणेकरून त्या दिवशी सर्व लोकांनी तयार असावे.
15 Skoroteče žurno potekoše s kraljevskom naredbom. Zakon bi objavljen i u tvrđavi Suze, pa dok su kralj i Haman sjedili i častili se, grad je Suza bio uznemiren.
१५राजाच्या हुकूमानुसार सर्व जासूद तातडीने निघाले. शूशन राजावाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले पण शूशन नगर मात्र गोंधळून गेले.