< Ponovljeni zakon 19 >

1 Kad Jahve, Bog tvoj, istrijebi narode čiju zemlju tebi daje te kad ih istjeraš i nastaniš se u njihovim gradovima i domovima,
तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांची भूमी तुला देत आहे, त्या राष्ट्रांना नष्ट केल्यावर त्यांच्या प्रदेशाचा तू ताबा घेतल्यानंतर, त्यांच्या जागी त्यांची नगरे आणि घरे तुम्ही ताब्यात घ्याल,
2 u zemlji koju ti Jahve, Bog tvoj, daje u baštinu, odvoji tri grada.
तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यामध्ये तीन नगरे तुम्ही राखून ठेवा.
3 Načini put onamo, a onda područje zemlje koju ti Jahve, Bog tvoj, daje u baštinu podijeli natroje, tako da svaki ubojica može onamo uteći.
म्हणजे कोणाच्या हातून मनुष्यवध झाल्यास त्यास तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर, आणि जो प्रदेश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्या देशाचे तू तीन भाग कर.
4 Ovo je slučaj u kojemu ubojica može onamo pobjeći i spasiti svoj život: kad tko ubije svoga bližnjega nehotice, a da ga prije nije mrzio;
मनुष्यवध करून या तीनपैकी एका नगरात आश्रयाला येणाऱ्याबद्दल नियम असा: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठार मारले तर त्याने येथे जावे.
5 primjerice, kad ode sa svojim bližnjim u šumu da siječe drva, zamahne sjekirom u ruci da obori drvo, gvožđe odleti s držalice i pogodi njegova druga te on pogine: takav ubojica neka uteče u jedan od tih gradova i spasit će život.
उदाहरणार्थ, एखादा मनुष्य लाकडे तोडायला त्याच्या शेजाऱ्याबरोबर जंगलात गेला. तेथे झाडावर कुऱ्हाड चालवत असताना चूकून कुऱ्हाडीचे पाते दांड्यापासून निसटले आणि ते नक्की दुसऱ्यावर पडून तो मेला. अशावेळी कुऱ्हाड चालवणाऱ्याने यापैकी एखाद्या नगराच्या आश्रयाला जाऊन आपले प्राण वाचवावे.
6 Inače bi krvni osvetnik, progoneći u svom bijesu ubojicu - kad bi put bio predug - mogao gonjenoga stići i pogubiti ga, iako taj nije zaslužio smrt budući da ubijenoga nije otprije mrzio.
हे नगर फार दूर असेल तर त्यास तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक त्याचा पाठलाग करील व त्यास त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. खरे पाहता त्या मनुष्याच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता.
7 Stoga ti nalažem: tri grada odvoji!
म्हणून मी तुला ही आज्ञा करतो अशी तीन नगरे स्वत: साठी राखून ठेव.
8 A kad Jahve, Bog tvoj, proširi tvoje područje, kao što se zakleo ocima tvojim, i dadne ti svu zemlju koju je obećao tvojim ocima,
तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वशंजाना शपथ दिल्याप्रमाणे, त्यांना वचन दिलेला सर्व प्रदेश तो तुम्हास देईल.
9 budeš li držao i vršio sve ove zapovijedi što ti ih danas nalažem i ljubio Jahvu, Boga svoga, te hodio njegovim putovima sve vrijeme - onda ovim gradovima dodaj još tri grada:
तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रीती करा व त्याने दाखवलेल्या मार्गात नियमीत चालत जा. मी दिलेल्या या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा.
10 tako se neće prolijevati nedužna krv u tvojoj zemlji koju ti Jahve daje u baštinu i nećeš se krvlju okaljati.
१०म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या भूमीवर निर्दोष मनुष्यांचा रक्तपात होणार नाही आणि अशा हत्येचे दोष तुम्हास लागणार नाही.
11 Ali ako tko mrzi svoga bližnjega i vreba ga, skoči na nj i ubije ga, a zatim pobjegne u jedan od tih gradova,
११पण द्वेषापोटीही एखादा मनुष्य संधीची वाट पाहत लपूनछपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून या नगरात पळून गेला.
12 onda neka starješine onoga grada izvedu ubojicu i predaju ga u ruke krvnom osvetniku da ga pogubi.
१२अशावेळी त्याच्या नगरातील वडिलधाऱ्यांनी माणसे पाठवून त्यास तेथून बाहेर काढावे व मृताच्या नातेवाईकांच्या हवाली करावे. म्हणजे त्यास मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे.
13 Neka ga oko tvoje ne sažaljuje! Tako ćeš u Izraelu iskorijeniti prolijevanje nedužne krvi i bit ćeš sretan.
१३त्या मनुष्यावर दया दाखवू नका परंतु निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष इस्राएलातून पुसून टाक म्हणजे तुझे कल्याण होईल.
14 Nemoj pomicati susjedova međaša kojim su stari razmeđašili tvoj posjed što ćeš ga naslijediti u zemlji koju ti Jahve, Bog tvoj, daje u baštinu.
१४शेजाऱ्याच्या जमिनीची सीमा खूण काढू नको. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढे वतन दिले त्याच्या या खूणा आहेत.
15 Neka ne ustaje jedan jedini svjedok protiv čovjeka ni za koju krivnju i ni za kakav zločin. Kakav god bio prekršaj, neka presuda počiva na iskazu dvojice ili trojice svjedoka.
१५एखाद्याने काही गुन्हा किंवा अपराध केला तर, अपराधाचा आरोप कोणावर असेल तर त्यास दोषी ठरवायला एक साक्षीदार पुरेसा नाही. त्याने खरेच गुन्हा केला आहे हे ठरवायला दोन किंवा तीन साक्षीदार तरी हवेतच.
16 Ako kakav krivi svjedok ustane protiv koga optužujući ga za pobunu,
१६अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो.
17 onda obojica koja se parbe neka stupe pred Jahvu, pred svećenika i suce koji budu vršili službu u to vrijeme.
१७अशावेळी त्या दोघांना परमेश्वरासमोर म्हणजे तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांच्यापुढे उभे करावे.
18 Neka suci provedu temeljitu istragu. Bude li se pokazalo da je svjedok lažan i da je lažno svjedočio protiv svoga brata,
१८मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा आपल्या बंधुविरोधात खोटारडेपणा उघडकीला आला,
19 učinite mu onako kako je on kanio svome bratu. Iskorijeni zlo iz svoje sredine!
१९तर मग तुम्ही त्यास तीच शिक्षा करावी जी त्यास आपल्या बंधूला जे शासन व्हावे असे वाटत होते. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा
20 Drugi će, kad o tome čuju, pobojati se te više neće činiti takva zla u tvojoj sredini.
२०हे ऐकून इतरांना भीती वाटेल आणि तेथून पुढे तुमच्यामध्ये असे वाईट घडणार नाही.
21 Neka ti se oko ne sažaljuje! Život za život; oko za oko; zub za zub; ruka za ruku; noga za nogu.
२१तू दया दाखवू नये. कोणी कोणाचा जीव घेतल्यास त्यालाही देहान्ताचे शासन द्यावे. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताच्या बदल्यात हात आणि पायाच्या बदल्यात पाय असा दंड करावा.

< Ponovljeni zakon 19 >