< 2 Samuelova 23 >
1 Ovo su posljednje Davidove riječi: “Riječ Davida, sina Jišajeva, riječ čovjeka koji je bio visoko uzdignut, pomazanika Boga Jakovljeva, pjevača pjesama Izraelovih:
१दावीदाची ही अखेरची वचने; इशायपुत्र दावीदाचा हा संदेश देवामुळे ज्याला थोरवी प्राप्त झाली त्याचा हा संदेश. याकोबाच्या देवाचा हा अभिषिक्त राजा इस्राएलाचा मधुर स्तोत्रे गाणारा गायक.
2 Jahvin duh govori po meni, njegova je riječ na mom jeziku.
२परमेश्वराचा आत्मा माझ्या मार्फत बोलला. त्याचे शब्द माझ्या मुखी होते.
3 Reče mi Jakovljev Bog, reče mi Izraelova hrid: Tko vlada ljudima pravedno, i tko vlada u strahu Božjemu,
३इस्राएलचा देव हे बोलला, इस्राएलचा दुर्ग मला म्हणाला, “जो न्यायाने राज्य करतो, जो देवाविषयी आदर बाळगून राज्य करतो.
4 taj je kao jutarnja svjetlost kad ograne sunce, jutro bez oblaka, na kojem se svjetluca zemaljska trava poslije kiše.
४तो मनुष्य सकाळच्या प्रकाशासारखा असेल, निरभ्र सकाळ असावी तसा असेल, पावसानंतर येणाऱ्या उन्हासारखा असेल. पाऊस कसा तर ज्याच्यामुळे जमिनीतून कोवळे गवत तरारून येते असा.
5 Da, moja kuća stoji čvrsto pred Bogom: on je učinio vječan Savez sa mnom, u svemu dobro uređen i utvrđen. Da, on će dati da napreduje sve moje spasenje i svaka moja želja.
५देवाने माझे घराणे बळकट व सुरक्षित केले देवाने माझ्याबरोबर एक कायमचा करार केला. तो सर्व दृष्टींनी माझ्या भल्याकरताच आहे याची त्याने खातरजमा करून घेतली. त्याने असा मजबूत करार केला आणि आता तो त्याचा भंग करणार नाही. हा करार म्हणजे माझा उध्दारच होय. हा करार म्हणजेच मला हवे होते ते सर्व काही होय. परमेश्वर माझ्या घराण्याची भरभराट करील.
6 Belijalovi ljudi svi su kao trnje u pustinji, jer ih nitko ne hvata rukom.
६पण दुष्ट माणसे काट्यांसारखी असतात. लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात.
7 Nitko ih se ne dotiče, osim gvožđem i kopljačom, i potpuno se spaljuju u ognju.”
७त्याचा स्पर्श झाला तर लाकडी आणि पंचधातूचा भाला टोचावा तशा वेदना होतात. होय असा मनुष्य काट्यासारखा असतो. त्यांना आगीच्या भक्ष्य स्थानी टाकतील आणि ती जळून खाक होतील.”
8 Ovo su imena Davidovih junaka: Išbaal, Hakmonac, prvak među trojicom; on je zavitlao svojim kopljem protiv osam stotina i pobio ih najedanput.
८दावीदाच्या पदरी असलेल्या वीरांची नावे अशी: योशेब-बश्शेबेथ तखमोनी हा रथावरच्या सेवकांचा मुख्य होता. असनी आदीनो म्हणूनही त्यास ओळखतात. त्याने एका वेळी आठशे जणांना ठार केले.
9 Za njim dolazi Eleazar, sin Dodonov, Ahoašanin, jedan od trojice junaka; on je bio s Davidom kod Pas Damina kad su se ondje skupili Filistejci za boj, a Izraelci se povukli pred njima.
९त्याच्या खालोखाल अहोही येथील दोदय याचा मुलगा. एलाजाराने पलिष्ट्यांना आव्हान दिले त्यावेळी दावीदाबरोबर असलेल्या तीन वीरांपैकी हा एक. ते युध्दाच्या तयारीने आले, पण इस्राएल सैनिक पळून गेले होते.
10 Ali se on čvrsto držao i udarao Filistejce dok mu se ruka nije ukočila i ostala kao prirasla uz mač. Jahve je dao veliku pobjedu u onaj dan, pa se vojska vratila za Eleazarom, ali samo da pokupi plijen.
१०थकून अंगात त्राण राहिला नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवारीला हात चिकटेपर्यंत त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते लोक तिथे आले.
11 Za njim dolazi Šama, sin Elin, Hararac; kad su se Filistejci skupili u Lehiju, bijaše polje puno leće, a vojska je bila pobjegla ispred Filistejaca.
११हरार येथील आगे याचा मुलगा शम्मा हा ही होता. पलिष्टी चालून आले तेव्हा एका कडधान्याच्या शेतात हे युध्द झाले. लोकांनी पलिष्ट्यां समोरून पळ काढला.
12 Tada je on stao usred polja i obranio ga i potukao Filistejce. Tako je Jahve dao veliku pobjedu.
१२पण शम्मा शेताच्या ऐन मध्यावर उभा राहिला आणि त्याने एकट्याने त्यांना तोंड दिले. त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. परमेश्वराने इस्राएलाला त्यादिवशी मोठा विजय मिळवून दिला.
13 Trojica između tridesetorice jednom su krenula na put i o početku žetve došla k Davidu u Adulamsku pećinu kad jedna filistejska četa bijaše utaborena u Refaimskoj dolini.
१३दावीद एकदा अदुल्लामच्या गुहेत होता आणि पलिष्टी सैन्याचा तळ खाली रेफाईच्या खोऱ्यात होता. त्यावेळी तीस शूरांपैकी तिघेजण दावीदाकडे जायला म्हणून सरळ गुहेपर्यंत अक्षरश: सरपटत गेले.
14 David je tada bio u svojoj kuli, a filistejska je posada bila tada u Betlehemu.
१४नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती.
15 David uzdahnu: “O, kad bi me tko napojio vodom iz betlehemskoga studenca što je kod vrata?”
१५दावीद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला तो म्हणाला, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल.
16 Tada ta tri junaka prodriješe kroz filistejski tabor i, zahvativši vode iz betlehemskog studenca što je kod vrata, donesoše je i dadoše Davidu. Ali je David ne htjede piti, nego je proli kao ljevanicu Jahvi
१६पण या तीन शूरांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यातून धाडसाने तोंड देत मार्ग काढला आणि बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी काढून दावीदाला प्यायला आणून दिले. दावीदाने ते प्यायचे नाकारले. त्याने ते परमेश्वरास अर्पण म्हणून जमिनीवर ओतून दिले.
17 govoreći: “Ne dao mi Jahve da to učinim! Zar da pijem krv ovih ljudi? TÓa izlažući život pogibli, donijeli su vode!” I nije htio piti. To su, eto, učinila ta tri junaka.
१७दावीद म्हणाला, “परमेश्वरा, हे पाणी मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल.” म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली.
18 Abišaj, Joabov brat a sin Sarvijin, bio je vojvoda nad tridesetoricom. On je zavitlao kopljem na tri stotine, pobio ih i proslavio se među tridesetoricom.
१८सरुवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले.
19 On se odlikovao među tridesetoricom i postao njihov glavar, ali nije dostigao trojice.
१९त्या तिघांमध्ये तो सर्वाधिक प्रसिद्ध होता. त्यांचा तो नायकही होता. पण तो पहिल्या तिघांच्यापैकी नव्हता.
20 Jojadin sin Benaja, junak iz Kabseela, bogat junačkim djelima, ubio je dva sina Ariela iz Moaba; on je jednoga snježnog dana sišao i ubio lava usred jame.
२०यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी मनुष्याचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला.
21 Ubio je i nekog Egipćanina, čovjeka golema stasa. Egipćanin je imao koplje u ruci, a on izišao preda nj sa štapom: istrgavši Egipćaninu koplje iz ruke, ubi ga njegovim kopljem.
२१एका धिप्पाड मिसरी मनुष्यासही त्याने मारले. या मिसरी मनुष्याच्या हातात भाला होता तर बनायाच्या हातात फक्त काठी. बनायाने त्याचा भाला हिसकावून घेतला आणि त्याच्याच भाल्याने त्या मिसरी मनुष्याचा जीव घेतला.
22 To je učinio Jojadin sin Benaja i proslavio se među tridesetoricom junaka.
२२बनायाने अशी बरीच कृत्ये केली त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला.
23 Bio je najznamenitiji među tridesetoricom, ali one prve trojice nije dostigao; David ga postavi za zapovjednika svoje tjelesne straže.
२३तो तीस वीरांच्या तीस वीर-दावीदाच्या अतिशय शूर सैनिकांचा गट म्हणजे हे लोक होत. यापेक्षा तो अधिक प्रसिद्ध होता. पण तरी पहिल्या तिघांच्या पदाला तो पोचला नाही. दावीदाने त्यास आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले.
24 Asahel, brat Joabov, bio je među tridesetoricom. Zatim: Elhanan, sin Dodonov, iz Betlehema;
२४यवाबाचा भाऊ असाएल हा त्या तिसातला एक होता. बाकीच्या वीरांची नावे पुढीलप्रमाणे: बेथलहेममधील दोदो याचा मुलगा एलहानान,
25 Šama iz Haroda; Elika iz Haroda;
२५शम्मा हरोदी, अलीका हरोदी,
26 Heles iz Peleta; Ira, sin Ikešev, iz Tekoe;
२६हेलस पलती, इक्केश तकोई याचा मुलगा ईरा,
27 Abiezer iz Anatota; Sibekaj iz Huše;
२७अबीयेजर अनाथोथी, मबुन्नय हूशाथी,
28 Salmon iz Ahoha; Mahraj iz Netofe;
२८सलमोन अहोही, महरय नटोफाथी,
29 Heled, sin Baanin, iz Netofe; Itaj, sin Ribajev, iz Gibeje sinova Benjaminovih;
२९बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेब, बन्यामीनच्या वंशातील, गिबामधला रीबय याचा मुलगा इत्तय,
30 Benaja iz Pireatona; Hidaj od Gaaških potoka;
३०बनाया पिराथोनी, गाश झऱ्याजवळचा हिद्दय,
31 Abibaal iz Bet Haarabe; Azmavet iz Bahurima;
३१अबी-अलबोन अर्बाथी, अजमावेथ बरहूमी,
32 Eljahba iz Šaalbona; Jašen, sin Jonatanov;
३२अलीहाबा शालबोनी, याशेन घराण्यातला योनाथान,
33 Šama iz Harara; Ahiam, sin Šararov, iz Arara;
३३शम्मा हारारी, शारार अरारी याचा मुलगा अहीयाम,
34 Elifelet, sin Ahasbajev, iz Bet Maake; Eliam, sin Ahitofelov, iz Gilona;
३४माकाथीचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट, अहिथोफेल गिलोनी याचा मुलगा अलीयम,
35 Hesraj iz Karmela; Paaraj iz Araba;
३५हेस्री कर्मेली, पारय अर्बी
36 Jigeal, sin Natanov, iz Sobe; Bani iz Gada;
३६सोबा मधील नाथोन याचा मुलगा इगाल, बानी यादी,
37 Selek Amonac; Nahraj iz Beerota, štitonoša Sarvijina sina Joaba;
३७सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
38 Ira iz Jatira; Gareb iz Jatira;
३८ईरा इथ्री, गारेब इथ्री,
39 Urija Hetit. Svega trideset i sedam.
३९उरीया हित्ती, असे एकंदर सदतीस.