< 2 Korinčanima 13 >

1 Evo treći put idem k vama. Svaka presuda neka počiva na iskazu dvojice ili trojice svjedoka.
मी आता तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येत आहे. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध होईल.
2 Onima koji su prije sagriješili i svima drugima rekoh već i opet - kao onda drugi put nazočan, tako i sada nenazočan - unaprijed velim: ako opet dođem, neću štedjeti.
ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्यांना आणि दुसर्‍या सगळ्यांना मी अगोदर सांगितले होते आणि दुसर्‍या वेळी स्वतः आलो होतो तेव्हाप्रमाणे आता दूर असताना मी आधी सांगतो की, मी जर पुन्हा आलो तर गय करणार नाही.
3 Jer vi tražite dokaz da u meni govori Krist koji prema vama nije nemoćan, nego je snažan među vama.
कारण माझ्याद्वारे ख्रिस्त बोलतो ह्याचे प्रमाण तुम्हास पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने दुर्बळ नाही पण तुमच्यात समर्थ आहे.
4 I raspet bi, istina, po slabosti, ali živi po snazi Božjoj. I mi smo, istina, slabi u njemu, ali ćemo po snazi Božjoj živjeti s njime za vas.
कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.
5 Same sebe ispitujte, jeste li u vjeri! Same sebe provjeravajte! Zar ne spoznajete sami sebe: da je Isus Krist u vama? Inače niste pravi.
तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हास आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.
6 A spoznat ćete, nadam se, da smo mi pravi.
मी आशा करतो की, आम्ही पसंतीस न उतरलेले नाही हे तुम्ही ओळखाल.
7 Molimo se Bogu da ne činite nikakva zla; ne da se mi pokažemo pravi, nego da vi dobro činite, pa izašli mi i kao nepravi.
आता देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये; म्हणजे आम्ही स्वीकृत दिसावे म्हणून नाही, पण आम्ही स्वीकृत नसलो तरी तुम्ही चांगले ते करावे.
8 Ta ništa ne možemo protiv istine, nego samo za istinu.
कारण आम्ही सत्याविरुद्ध काही करत नाही, तर सत्यासाठी करतो.
9 Da, radujemo se kad smo mi slabi, a vi jaki. Za to se i molimo, za vaše usavršavanje.
जेव्हा आम्ही दुर्बळ आहोत व तुम्ही बलवान आहात तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.
10 To vam nenazočan pišem zato da nazočan ne bih morao oštro nastupiti vlašću koju mi Gospodin dade za izgrađivanje, a ne za rušenje.
१०एवढ्याकरता दूर असताना मी या गोष्टी लिहीत आहे, म्हणजे प्रभूने मला जो अधिकार उभारणी करण्यास दिलेला आहे, नाश करण्यास नाही, त्याचा उपयोग करून, मी तेथे असताना कडकपणाने वागू नये.
11 Uostalom, braćo, radujte se, usavršujte se, tješite se, složni budite, mir njegujte i Bog ljubavi i mira bit će s vama.
११शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.
12 Pozdravite jedni druge svetim cjelovom.
१२पवित्र अभिवादनाने एकमेकांना सलाम करा.
13 Pozdravljaju vas svi sveti.
१३तुम्हास सर्व पवित्रजन सलाम सांगतात.
14 Milost Gospodina Isusa Krista, ljubav Boga i zajedništvo Duha Svetoga sa svima vama!
१४प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

< 2 Korinčanima 13 >