< 1 Solunjanima 5 >

1 A o vremenima i trenucima nije, braćo, potrebno pisati vam.
बंधूनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही.
2 Ta i sami dobro znate da Dan Gospodnji dolazi baš kao kradljivac u noći.
कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.
3 Dok još budu govorili: “Mir i sigurnost”, zadesit će ih iznenadna propast kao trudovi trudnicu i neće umaći.
“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत.
4 Ali vi, braćo, niste u tami, da bi vas Dan mogao zaskočiti kao kradljivac:
बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.
5 ta svi ste vi sinovi svjetlosti i sinovi dana. Nismo doista od noći ni od tame.
कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही.
6 Onda i ne spavajmo kao ostali, nego bdijmo i trijezni budimo.
ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे.
7 Jer koji spavaju, noću spavaju; i koji se opijaju, noću se opijaju.
झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात.
8 A mi koji smo od dana, budimo trijezni, obucimo oklop vjere i ljubavi i stavimo kacigu, nadu spasenja!
परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे.
9 Ta Bog nas nije odredio za gnjev, nego da imamo spasenje po Gospodinu našem Isusu Kristu,
कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.
10 koji je za nas umro da - bdjeli ili spavali - zajedno s njime živimo.
१०प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
11 Zato, tješite se uzajamno i izgrađujte jedan drugoga, kako i činite.
११म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात.
12 Molimo vas, braćo: priznajte one koji se trude među vama, koji su vam predstojnici u Gospodinu i opominju vas;
१२आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;
13 s ljubavlju ih nadasve cijenite poradi njihova djela! Gajite mir među sobom!
१३आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकांशी शांतीने रहा.
14 Potičemo vas, braćo: opominjite neuredne, sokolite malodušne, podržavajte slabe, budite velikodušni prema svima!
१४आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा.
15 Pazite da tko komu zlo zlom ne uzvrati, nego uvijek promičite dobro jedni prema drugima i prema svima.
१५आणि तुम्ही हे पाहा की, कोणी कोणाला वाईटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा.
16 Uvijek se radujte!
१६सदोदित आनंद करा.
17 Bez prestanka se molite!
१७नित्य प्रार्थना करा.
18 U svemu zahvaljujte! Jer to je za vas volja Božja u Kristu Isusu.
१८प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
19 Duha ne trnite,
१९पवित्र आत्म्याला विझवू नका.
20 proroštava ne prezirite!
२०संदेशाचा उपहास करू नका.
21 Sve provjeravajte: dobro zadržite,
२१सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा.
22 svake se sjene zla klonite!
२२वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.
23 A sam Bog mira neka vas posvema posveti i cijelo vaše biće - duh vaš i duša i tijelo - neka se besprijekornim, savršenim sačuva za Dolazak Gospodina našega Isusa Krista.
२३आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.
24 Vjeran je Onaj tko vas poziva: on će to i učiniti.
२४तुम्हास जो बोलवत आहे तो विश्वासू आहे; तो हे करीलच.
25 Braćo, molite i za nas!
२५बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
26 Pozdravite svu braću cjelovom svetim.
२६सर्व बंधूंना पवित्र प्रीतीने नमस्कार सांगा.
27 Zaklinjem vas u Gospodinu: neka se ova poslanica pročita svoj braći.
२७मी तुम्हास प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा.
28 Milost Gospodina našega Isusa Krista s vama!
२८आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.

< 1 Solunjanima 5 >