< 1 Samuelova 8 >
1 Kad je Samuel ostario, postavio je svoje sinove za suce u Izraelu.
१जेव्हा शमुवेल म्हातारा झाला तेव्हा त्याने आपले पुत्र इस्राएलावर न्यायाधीश नेमले.
2 Njegov prvorođenac zvao se Joel, a drugi sin Abija; oni su bili suci u Beer Šebi.
२त्याच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव योएल व दुसऱ्याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायाधीश होते.
3 Ali sinovi nisu išli stopama očevim: gledali su na svoj dobitak, primali mito i izvrtali pravicu.
३परंतु त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालत नसत, तर ते अप्रामाणिक लाभांच्या पाठीमागे लागले होते. ते लाच घेऊन विपरीत न्याय करीत असत.
4 Tada se skupiše sve starješine izraelske i dođoše k Samuelu u Ramu.
४मग इस्राएलाचे सर्व वडील जमून रामा येथे शमुवेलाकडे आले.
5 I rekoše mu: “Eto, ti si ostario, a tvoji sinovi ne idu tvojim stopama. Postavi nam, dakle, kralja da nam vlada, kao što je to kod svih naroda.”
५आणि ते त्यास म्हणाले, “पाहा तुम्ही वयोवृद्ध झाले आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत. आता सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय करायला आम्हावर राजा नेमा.”
6 Ali Samuelu nije bilo drago što su rekli: “Daj nam kralja da nam vlada!” Zato se Samuel pomoli Jahvi.
६परंतु, “आमचा न्याय करायला आम्हांला राजा द्या,” असे जे त्यांनी म्हटले, त्याबद्दल शमुवेलाला वाईट वाटले. म्हणून शमुवेलाने परमेश्वराकडे प्रार्थना केली.
7 A Jahve reče Samuelu: “Poslušaj glas naroda u svemu što od tebe traži, jer nisu odbacili tebe, nego su odbacili mene, ne želeći da ja kraljujem nad njima.
७तेव्हा परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “लोक सांगतात त्या सर्वबाबतीत तू त्यांचा शब्द ऐक; कारण त्यांनी तुला नाकारले नाही, तर मला नाकारले आहे.
8 Sve što su činili meni od onoga dana kad sam ih izveo iz Egipta pa do današnjega dana - ostavili su mene i služili tuđim bogovima - tako oni čine i tebi.
८मी त्यांना मिसरातून वर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे, मला सोडून अन्य देवाची सेवा त्यांनी केली, आणि तसेच त्यांनी तुझ्याशी केले आहे.”
9 Sada, dakle, poslušaj njihov zahtjev, ali ih svečano opomeni i pouči o pravima kralja koji će vladati nad njima.”
९तर आता त्यांचे ऐक; तथापि तू त्याच्याशी खडसावून बोल आणि जो राजा त्याच्यावर राज्य करील त्याची रीत त्यांना समजावून सांग.
10 Samuel ponovi sve Jahvine riječi narodu koji je od njega tražio kralja.
१०मग शमुवेलाने, ज्या लोकांनी राजा मागितला होता त्यांना, परमेश्वराची सर्व वचने सांगितली.
11 I reče: “Ovo će biti pravo kralja koji će kraljevati nad vama: uzimat će vaše sinove da mu služe kod bojnih kola i kod konja i oni će trčati pred njegovim bojnim kolima.
११तो त्यांना म्हणाला, “जो राजा तुम्हावर राज्य करील त्याची रीत अशी होईल; तो तुमचे पुत्र घेऊन आपल्या रथांसाठी व आपले घोडेस्वार होण्यासाठी ठेवील आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील.
12 Postavljat će ih za tisućnike i pedesetnike; orat će oni njegovu zemlju, žeti njegovu žetvu, izrađivati mu bojno oružje i opremu za njegova bojna kola.
१२तो त्यांना आपले हजारांचे सरदार नेमून ठेवील. जमीन नांगरायला, आपली पिके कापायला, आणि आपली लढाईची शस्त्रे व आपली रथांची शस्त्रे करायला ठेवील.
13 Uzimat će kralj vaše kćeri da mu priređuju mirisne pomasti, da mu kuhaju i peku.
१३तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या, स्वयंपाकिणी, आणि भटारखान्यात काम करणाऱ्या होण्यास घेईल.
14 Uzimat će najbolja vaša polja, vaše vinograde i vaše maslinike i poklanjat će ih svojim dvoranima.
१४तुमची जी उत्तम ती शेते, तुमचे द्राक्षमळे, आणि तुमचे जैतूनाचे मळे घेऊन, ते तो त्याच्या चाकरांना देईल.
15 Uzimat će desetinu od vaših usjeva i vaših vinograda i davat će je svojim dvoranima i svojim službenicima.
१५तो तुमची पीके व तुमचे द्राक्षमळे यांचा दशमांश घेऊन, तो आपल्या कारभाऱ्यांना देईल.
16 Uzimat će vaše sluge i vaše sluškinje, vaše najljepše volove i magarce i upotrebljavat će ih za svoj posao.
१६तुमचे दास आणि तुमच्या दासी व तुमचे उत्तम तरुण व तुमची गाढवे घेऊन, ते तो आपल्या कामाला लावील.
17 Uzimat će desetinu od vaše sitne stoke, a vi sami postat ćete mu robovi.
१७तुमच्या मेंढरांचा दशमांश तो घेईल व तुम्ही त्याचे दास व्हाल.
18 I kad jednoga dana budete vapili za pomoć zbog kralja koga ste sami izabrali, Jahve vas neće uslišati u onaj dan!”
१८त्यानंतर तुम्ही आपणासाठी निवडलेल्या राजामुळे ओरडाल; परंतु परमेश्वर त्या दिवसात तुम्हास उत्तर देणार नाही.”
19 Narod nije htio poslušati Samuelova glasa nego reče: “Ne! Hoćemo da kralj vlada nad nama!
१९पण लोक शमुवेलाचा शब्द ऐकायला नाकारून म्हणाले, “असे नाही! आम्हांवर राजा पाहिजेच
20 Tako ćemo i mi biti kao svi narodi: sudit će nam naš kralj, bit će nam vođa i vodit će naše ratove.”
२०म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आणि आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हापुढे चालून आमच्या लढाया लढेल.”
21 Kad je Samuel čuo što narod govori, kaza sve Jahvi.
२१शमुवेलाने जेव्हा लोकांनी दिलेल्या उत्तराचे सर्व शब्द ऐकून परमेश्वरास ऐकवले;
22 A Jahve reče Samuelu: “Poslušaj njihovu želju i postavi im kralja!” Tada Samuel reče Izraelcima: “Vratite se svaki u svoj grad!”
२२मग तेव्हा परमेश्वर शमुवेलाशी बोलला, “तू त्यांचा शब्द ऐकून त्याच्यांवर राज्य करायला राजा नेमून ठेव.” तेव्हा शमुवेल इस्राएलाच्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकजण आपापल्या नगरास परत जा.”