< 箴言 12 >

1 喜愛管教的,就是喜愛知識; 恨惡責備的,卻是畜類。
ज्याला शिक्षण प्रिय त्यास ज्ञान प्रिय, परंतु जो कोणी शासनाचा द्वेष करतो तो मूर्ख आहे.
2 善人必蒙耶和華的恩惠; 設詭計的人,耶和華必定他的罪。
परमेश्वर चांगल्या मनुष्यास कृपा देतो, पण वाईट योजना करणाऱ्याला तो दोषी ठरवतो.
3 人靠惡行不能堅立; 義人的根必不動搖。
दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही, पण नीतिमानाचे उच्चाटण होणार नाही.
4 才德的婦人是丈夫的冠冕; 貽羞的婦人如同朽爛在她丈夫的骨中。
सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे, परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे.
5 義人的思念是公平; 惡人的計謀是詭詐。
नीतिमानाच्या योजना यथान्याय असतात, पण दुष्टांचा सल्ला कपटाचा असतो.
6 惡人的言論是埋伏流人的血; 正直人的口必拯救人。
दुष्टांचे शब्द रक्तपात घडून आणण्यासाठी दबा धरून थांबतात, परंतु न्यायीचे शब्द त्यास सुरक्षित ठेवतात.
7 惡人傾覆,歸於無有; 義人的家必站得住。
दुर्जन उलथून टाकले जातात आणि नाहीसे होतात, पण नीतिमानाचे घर टिकते.
8 人必按自己的智慧被稱讚; 心中乖謬的,必被藐視。
मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण जो विकृत निवड करतो त्याचा तिरस्कार होतो.
9 被人輕賤,卻有僕人, 強如自尊,缺少食物。
जो आपणास प्रतिष्ठित दाखवतो पण त्याच्याकडे अन्न नसते; त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून फक्त सेवक असतो तो चांगला समजायचा.
10 義人顧惜他牲畜的命; 惡人的憐憫也是殘忍。
१०नीतिमान आपल्या प्राण्यांविषयीच्या गरजांची काळजी घेतो, पण दुष्टाचे दयाळूपणही क्रूर असते.
11 耕種自己田地的,必得飽食; 追隨虛浮的,卻是無知。
११जो कोणी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे विपुल अन्न असते, पण जो निरर्थक योजनेमागे धावतो तो बुद्धिहीन आहे.
12 惡人想得壞人的網羅; 義人的根得以結實。
१२दुसऱ्यापासून चोरल्याची इच्छा दुर्जन करतो, पण नितीमानाचे फळ ते स्वतःपासून येते.
13 惡人嘴中的過錯是自己的網羅; 但義人必脫離患難。
१३दुष्ट मनुष्य आपल्या पापी बोलल्याने पाशात पडतो, पण नीतिमान संकटातून निसटतो.
14 人因口所結的果子,必飽得美福; 人手所做的,必為自己的報應。
१४मनुष्य आपल्या मुखाच्या फळाकडून चांगल्या गोष्टींच्या योगे तृप्त होतो, त्यास आपल्या हातांच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.
15 愚妄人所行的,在自己眼中看為正直; 惟智慧人肯聽人的勸教。
१५मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट असतो, परंतु सुज्ञ मनुष्य सल्ला ऐकून घेतो.
16 愚妄人的惱怒立時顯露; 通達人能忍辱藏羞。
१६मूर्ख त्याचा राग लागलाच दाखवतो, पण जो दूरदर्शी आहे तो अपमानाकडे दुर्लक्ष करतो.
17 說出真話的,顯明公義; 作假見證的,顯出詭詐。
१७जो कोणी खरे बोलतो तो जे काय योग्य आहे ते सांगतो, पण खोटा साक्षीदार लबाड सांगतो.
18 說話浮躁的,如刀刺人; 智慧人的舌頭卻為醫人的良藥。
१८कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, पण सुज्ञाची जिव्हा आरोग्य आणते.
19 口吐真言,永遠堅立; 舌說謊話,只存片時。
१९सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल, पण लबाड बोलणारी जिव्हा क्षणिक आहे.
20 圖謀惡事的,心存詭詐; 勸人和睦的,便得喜樂。
२०वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीचा सल्ला देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो.
21 義人不遭災害;惡人滿受禍患。
२१नीतिमानावर संकटे येत नाहीत, परंतु दुर्जनावर अडचणी येतात.
22 說謊言的嘴為耶和華所憎惡; 行事誠實的,為他所喜悅。
२२खोटे बोलणाऱ्या वाणीचा परमेश्वरास वीट आहे, पण जे कोणी प्रामाणिकपणे राहणारे त्यास आनंद देतात.
23 通達人隱藏知識; 愚昧人的心彰顯愚昧。
२३शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो, पण मूर्खाचे हृदय मूर्खपणा ओरडून सांगते.
24 殷勤人的手必掌權; 懶惰的人必服苦。
२४उद्योग्याचे हात अधिकार चालवतील, पण आळशाला गुलामासारखे राबावे लागेल.
25 人心憂慮,屈而不伸; 一句良言,使心歡樂。
२५मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते, पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो.
26 義人引導他的鄰舍; 惡人的道叫人失迷。
२६नीतिमान आपल्या मित्राला मार्ग दाखवतो, पण दुष्टाचे मार्ग त्यांना बहकावतो.
27 懶惰的人不烤打獵所得的; 殷勤的人卻得寶貴的財物。
२७आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही, पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो.
28 在公義的道上有生命; 其路之中並無死亡。
२८न्यायीपणाच्या मार्गात जीवन सापडते, आणि त्यांच्या वाटेत मरण नाही.

< 箴言 12 >