< 民數記 23 >
1 巴蘭對巴勒說:「你在這裏給我築七座壇,為我預備七隻公牛,七隻公羊。」
१बलाम बालाकाला म्हणाला, इथे सात वेद्या बांधा आणि माझ्यासाठी सात बैल आणि सात मेंढे तयार ठेवा.
2 巴勒照巴蘭的話行了。巴勒和巴蘭在每座壇上獻一隻公牛,一隻公羊。
२बलामाने सांगितले तसे बालाकाने एक मेंढा व एक बैल प्रत्येक वेदीवर मारला.
3 巴蘭對巴勒說:「你站在你的燔祭旁邊,我且往前去,或者耶和華來迎見我。他指示我甚麼,我必告訴你。」於是巴蘭上一淨光的高處。
३नंतर बलाम बालाकाला म्हणाला, तू या होमबली जवळ थांब. मी दुसरीकडे जातो. नंतर परमेश्वर माझ्याकडे येईल आणि मी काय बोलायचे ते मला सांगेल. नंतर बलाम उंच जागी गेला.
4 上帝迎見巴蘭;巴蘭說:「我預備了七座壇,在每座壇上獻了一隻公牛,一隻公羊。」
४देव त्या जागी बलामाकडे आला आणि बलाम म्हणाला, मी सात वेद्या तयार केल्या आहेत. आणि प्रत्येक वेदीवर मी एकेक मेंढा व बैल बली दिला आहे.
5 耶和華將話傳給巴蘭,又說:「你回到巴勒那裏,要如此如此說。」
५नंतर परमेश्वराने काय बोलायचे ते बलामास सांगितले. परमेश्वर म्हणाला, बालाकाकडे परत जा आणि मी सांगतो तेच त्यास जाऊन सांग.
6 他就回到巴勒那裏,見他同摩押的使臣都站在燔祭旁邊。
६तेव्हा बलाम बालाकाकडे परत आला आणि तो आपल्या होमार्पणाजवळ उभा होता आणि मवाबाचे सर्व पुढारी त्याच्याबरोबर होते.
7 巴蘭便題起詩歌說: 巴勒引我出亞蘭, 摩押王引我出東山,說: 來啊,為我咒詛雅各; 來啊,怒罵以色列。
७नंतर बलामाने आपला संदेश सांगण्यास सुरवात केली आणि म्हणाला, पूर्वेकडील अराम पर्वतावरुन मवाबाचा राजा बालाक याने मला येथे आणले. तो म्हणाला, ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे, ये, इस्राएलींना विरोध कर.
8 上帝沒有咒詛的,我焉能咒詛? 耶和華沒有怒罵的,我焉能怒罵?
८ज्याला देवाने शाप दिला नाही त्यास मी कसा शाप देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्यास मी कशी धमकी देऊ?
9 我從高峰看他,從小山望他; 這是獨居的民,不列在萬民中。
९मी त्या लोकांस पर्वतावरुन बघू शकतो; मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो. पहा, तेथे लोक एकटेच राहत आहे आणि ते स्वतःला सर्वसाधारण राष्ट्रामध्ये गणित नाहीत.
10 誰能數點雅各的塵土? 誰能計算以色列的四分之一? 我願如義人之死而死; 我願如義人之終而終。
१०इस्राएलाचा केवळ चौथा हिस्सा कोण मोजेल किंवा याकोबाच्या धुळीचे कण कोण मोजू शकेल? मला नीतिमान मनुष्याप्रमाणे मरण येऊ दे, आणि त्यांच्याप्रमाणेच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे!
11 巴勒對巴蘭說:「你向我做的是甚麼事呢?我領你來咒詛我的仇敵,不料,你竟為他們祝福。」
११बालाक बलामास म्हणाला, तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले. पण पहा, तू तर त्यांना आशीर्वाद दिलास.
12 他回答說:「耶和華傳給我的話,我能不謹慎傳說嗎?」
१२बलामाने उत्तर दिले व म्हणाला, परमेश्वराने माझ्या मुखात जे घातले, केवळ तेच मी बोलण्याची काळजी घेऊ नये काय?
13 巴勒說:「求你同我往別處去,在那裏可以看見他們;你不能全看見,只能看見他們邊界上的人。在那裏要為我咒詛他們。」
१३नंतर बालाक त्यास म्हणाला, म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगळ्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांना माझ्यासाठी शाप दे.
14 於是領巴蘭到了瑣腓田,上了毗斯迦山頂,築了七座壇;每座壇上獻一隻公牛,一隻公羊。
१४तेव्हा बालाक बलामास पिसगाच्या माथ्यावरील सोफीमाच्या माळ्यावर घेऊन गेला. तेथे बालाकाने सात वेद्या बांधल्या. नंतर बालाकाने प्रत्येक वेदीवर एक बैल आणि एक मेंढा बली दिला.
15 巴蘭對巴勒說:「你站在這燔祭旁邊,等我往那邊去迎見耶和華。」
१५तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, तू येथे आपल्या होमबलीजवळ या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो.
16 耶和華臨到巴蘭那裏,將話傳給他;又說:「你回到巴勒那裏,要如此如此說。」
१६परमेश्वर बलामाकडे आला आणि काय बोलायचे ते त्याने त्यास सांगितले. नंतर परमेश्वराने बलामास बालाकाकडे जायला सांगितले. आणि त्याने सांगितलेलेच बोलायला सांगितले.
17 他就回到巴勒那裏,見他站在燔祭旁邊;摩押的使臣也和他在一處。巴勒問他說:「耶和華說了甚麼話呢?」
१७म्हणून बलाम बलाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबाचे पुढारी होमबलीपाशी उभे होते. बालाकाने बलामास येताना पाहिले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने काय सांगितले?
18 巴蘭就題詩歌說: 巴勒,你起來聽; 西撥的兒子,你聽我言。
१८बलामाने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, बालाका, उठ आणि ऐक. तू सिप्पोरेच्या मुला, माझे ऐक,
19 上帝非人,必不致說謊, 也非人子,必不致後悔。 他說話豈不照着行呢? 他發言豈不要成就呢?
१९देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे, किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे. जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय? तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय?
20 我奉命祝福; 上帝也曾賜福,此事我不能翻轉。
२०पहा, मी आशीर्वाद द्यायला आज्ञा केली, देवाने आशीर्वाद दिला आणि मी तो उलटा फिरवू शकत नाही.
21 他未見雅各中有罪孽, 也未見以色列中有奸惡。 耶和華-他的上帝和他同在; 有歡呼王的聲音在他們中間。
२१त्यास याकोबात काही कष्ट किंवा इस्राएलात त्रास दिसला नाही. त्यांचा परमेश्वर देव त्यांच्याबरोबर आहे, राजाचा जयघोष त्यांच्यात आहे.
२२देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. ते रानबैला इतके शक्तीमान आहेत.
23 斷沒有法術可以害雅各, 也沒有占卜可以害以色列。 現在必有人論及雅各,就是論及以色列說: 上帝為他行了何等的大事!
२३याकोबाच्याविरूद्ध मंत्रतंत्र चालणार नाही आणि इस्राएलींना दैवप्रश्र सांगणारे हानी पोचवू शकत नाही, याकोबाविषयी व इस्राएलाविषयी म्हणतील की पहा, देवाने केवढे महान कार्य केले!
24 這民起來,彷彿母獅, 挺身,好像公獅, 未曾吃野食, 未曾喝被傷者之血,決不躺臥。
२४पहा, लोक सिंहिणीसारखे उठत आहेत, सिंहासारखा बाहेर येतो आणि हल्ला करतो. तो त्याची शिकार खाऊन आणि वधलेल्यांचे रक्त प्यायल्याखेरीज तो खाली बसणार नाही.
25 巴勒對巴蘭說:「你一點不要咒詛他們,也不要為他們祝福。」
२५नंतर बालाक बलामास म्हणाला, तू त्यांना शापहि देऊ नको आणि आशीर्वादहि देऊ नको.
26 巴蘭回答巴勒說:「我豈不是告訴你說『凡耶和華所說的,我必須遵行』嗎?」
२६बलामाने बालाकाला उत्तर दिले, मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगेल तेच मला बोलता येईल.
27 巴勒對巴蘭說:「來吧,我領你往別處去,或者上帝喜歡你在那裏為我咒詛他們。」
२७नंतर बालाक बलामास म्हणाला, तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुला त्या लोकांस शाप द्यायची परवानगी देईल.
२८म्हणून बालाक बलामास घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरुन वाळवंट दिसते.
29 巴蘭對巴勒說:「你在這裏為我築七座壇,又在這裏為我預備七隻公牛,七隻公羊。」
२९बलाम बालाकाला म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बली देण्यासाठी तयार कर.”
30 巴勒就照巴蘭的話行,在每座壇上獻一隻公牛,一隻公羊。
३०बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने साऱ्या गोष्टी केल्या. बालाकाने वेदीवर बैल आणि मेंढे बली दिले.