< 約伯記 24 >
1 全能者既定期罰惡, 為何不使認識他的人看見那日子呢?
१“त्या सर्वशक्तिमानाने न्यायवेळ का नेमून ठेवली नाही? त्यास ओळखणाऱ्यांना त्या न्याय दिवसाची का प्रतिती येत नाही?
२आणि काही जण हद्द दर्शविणाऱ्या खुणा सरकवतात. लोक पशूंचे कळप चोरुन स्वच: च्या रानात चरायला नेतात.
३ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात. ते विधवेचा बैल गहाण म्हणून ठेवतात.
४ते गरजंवताना त्यांच्या मार्गापासून बहकवतात. सगळ्या पृथ्वीवरील गरीबांना या दुष्टांपासून लपून रहावे लागते.
5 這些貧窮人如同野驢出到曠野,殷勤尋找食物; 他們靠着野地給兒女糊口,
५गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते काळजीपूर्वक अन्नाचा शोध घेतात. त्यांच्या मुलाबाळांना जंगल अन्न पुरवते.
६गरीब लोक रात्रीपर्यंत इतरांच्या शेतात कापणी करतात, आणि ते दुष्टांच्या पिकातील द्राक्षे वेचतात.
७त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते.
8 在山上被大雨淋濕, 因沒有避身之處就挨近磐石。
८ते डोंगरावरील पावसाने भिजतात, आश्रय नसल्याकारणाने ते खडकांना कवटाळून बसतात.
9 又有人從母懷中搶奪孤兒, 強取窮人的衣服為當頭,
९दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आई जवळून घेतात. ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून त्यांची मुले ठेवून घेतात.
10 使人赤身無衣,到處流行, 且因飢餓扛抬禾捆,
१०ते कपडे नसल्यामुळे उघडेच असतात, ते दुसऱ्यांच्या धान्यांच्या पेंढ्या वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात.
११ते आवाराच्या आत तेल काढतात, ते दुष्टांच्या द्राक्षकुंडात द्राक्ष तुडवतात तरी ते तान्हाले राहतात.
12 在多民的城內有人唉哼, 受傷的人哀號; 上帝卻不理會那惡人的愚妄。
१२शहरात मरणास टेकलेल्या मनुष्यांचे दु: खद रडणे ऐकू येते, घायाळाचा आत्मा आरोळी मारतो, परंतु देव त्यांच्या प्रारर्थनेकडे लक्ष देत नाही.
13 又有人背棄光明, 不認識光明的道, 不住在光明的路上。
१३काही लोक प्रकाशा विरूद्ध बंड करतात. देवाला काय हवे आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा नसते. देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही.
14 殺人的黎明起來, 殺害困苦窮乏人, 夜間又作盜賊。
१४खुनी सकाळी लवकर उठतो आणि गरीब व असहाय्य लोकांस ठार मारतो तो रात्रीच्या वेळी चोरासारखा असतो.
15 姦夫等候黃昏, 說:必無眼能見我, 就把臉蒙蔽。
१५ज्या मनुष्यास व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो. तो म्हणतो, ‘मला कोणीही बघणार नाही’ पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो.
16 盜賊黑夜挖窟窿; 白日躲藏, 並不認識光明。
१६रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात. पण दिवसा ते स्वत: ला त्यांच्या घरांत कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात.
17 他們看早晨如幽暗, 因為他們曉得幽暗的驚駭。
१७त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते. त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते.
18 這些惡人猶如浮萍快快飄去。 他們所得的分在世上被咒詛; 他們不得再走葡萄園的路。
१८पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात, त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो, त्यांच्या शेतात काम करण्यास कोणीही जात नाहीत.
19 乾旱炎熱消沒雪水; 陰間也如此消沒犯罪之輩。 (Sheol )
१९हिवाळ्यातल्या बर्फापासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते. त्याप्रमाणे त्या पापी लोकांस थडग्यात नेले जाते. (Sheol )
20 懷他的母要忘記他; 蟲子要吃他,覺得甘甜; 他不再被人記念。 不義的人必如樹折斷。
२०ज्या उदराने त्यास जन्म दिला ती विसरून जाईल, त्याची आठवण राहणार नाही, त्याप्रमाणे दुष्टपणा झाडासारखा मोडून पडेल.
२१दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात ज्यांना मुले झालेली नाहीत, ते विधवांसाठी काही चांगले करीत नाहीत.
22 然而上帝用能力保全有勢力的人; 那性命難保的人仍然興起。
२२तरी देव आपल्या सामर्थ्याने बलवानास राखतो, ज्याला जगण्याचा भरवसा नाही तो उठतो,
23 上帝使他們安穩,他們就有所倚靠; 上帝的眼目也看顧他們的道路。
२३देव दुष्टांना आपण सुरक्षित आहेत असा विचार करण्यास भाग पाडतो आणि त्याविषयी ते आनंदी होतात.
24 他們被高舉,不過片時就沒有了; 他們降為卑,被除滅,與眾人一樣, 又如穀穗被割。
२४ते उंचावले जातात परंतू थोड्या काळापुरते नंतर ते जातात. खरोखर, ते खचून जातात, ते इतर सर्वांप्रमाणे काढून टाकले जातात. आणि ते कणसाच्या शेड्यांप्रमाणे कापून टाकले जातात.
25 若不是這樣,誰能證實我是說謊的, 將我的言語駁為虛空呢?
२५या गोष्टी खऱ्या नाहीत असे कोण म्हणतो, मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल? माझे बोलने निरर्थक आहे हे कोण दाखवून देईल?”