< 約伯記 15 >

1 提幔人以利法回答說:
नंतर अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 智慧人豈可用虛空的知識回答, 用東風充滿肚腹呢?
“शहाणा मनुष्य, वायफळ शहाणपणाचे उत्तर देणार काय, आणि पूर्वे कडील वाऱ्याने स्वतःला भरेल का?
3 他豈可用無益的話 和無濟於事的言語理論呢?
तो ज्यात काही लाभ नाही अशा निरुपयोगी कारणास्तव बोलेल काय किंवा जे सांगण्यास योग्य नाही असा उपदेश करेल काय?
4 你是廢棄敬畏的意, 在上帝面前阻止敬虔的心。
खरोखर, तू देवाचा आदर करणे सोडले आहेस, त्याच्या भक्तीत तू खीळ घालत आहेस.
5 你的罪孽指教你的口; 你選用詭詐人的舌頭。
तुझे पाप तुझ्या मुखाला बोलण्यास शिकविते, तू तुझ्यासाठी अधर्माची जीभ निवडली आहे.
6 你自己的口定你有罪,並非是我; 你自己的嘴見證你的不是。
मी नव्हे, तुझेच स्वमुख तुला दोषी मानत आहे. खरोखर, तुझे स्वत: चेच ओठ तुझ्याविरुध्द साक्ष देतात
7 你豈是頭一個被生的人嗎? 你受造在諸山之先嗎?
तूच प्रथम मनुष्य असा जन्माला आलास काय? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?
8 你曾聽見上帝的密旨嗎? 你還將智慧獨自得盡嗎?
तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का? केवळ तूच एक शहाणा मनुष्य आहेस असे तुला वाटते का?
9 你知道甚麼是我們不知道的呢? 你明白甚麼是我們不明白的呢?
आम्हास समजत नाही असे तुला काय माहीती आहे? आम्हास अवगत नाही असे काय तुला माहीत आहे?
10 我們這裏有白髮的和年紀老邁的, 比你父親還老。
१०केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत. होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्यात आहेत.
11 上帝用溫和的話安慰你, 你以為太小嗎?
११देवाने केलेले सांत्वन आणि तुजशी केलेली सौम्य भाषण तुला तुच्छ वाटतात काय?
12 你的心為何將你逼去? 你的眼為何冒出火星,
१२तुझे मन तुला का मार्ग भ्रष्ट करीत आहे? तू डोळे का फिरवितोस,
13 使你的靈反對上帝, 也任你的口發這言語?
१३तू असा तुझा आत्त्मा देवाच्या विरुध्द का फिरवतोस आणि तुझ्या तोंडा वाटे असे शब्द का येतात.
14 人是甚麼,竟算為潔淨呢? 婦人所生的是甚麼,竟算為義呢?
१४मनुष्य तो काय, जो निष्कलंक असेल? स्त्री पासून जन्मलेला मनुष्य तो निष्पाप कसा असणार?
15 上帝不信靠他的眾聖者; 在他眼前,天也不潔淨,
१५पहा, देवाच्या नजरेत आकाशही स्वच्छ नाही, खरोखर, देव त्याच्या पवित्र जनांचाही विश्वास करत नाही.
16 何況那污穢可憎、 喝罪孽如水的世人呢!
१६असा मनुष्य जो अधर्म पाण्यासारख्या पितो, अशुद्ध आणि अप्रामाणिक असा मनुष्य तो काय?
17 我指示你,你要聽; 我要述說所看見的,
१७माझे ऐक, मी तुला समजावून सांगतो, मी पाहिलेल्या गोष्टी तुम्हास सांगतो.
18 就是智慧人從列祖所受, 傳說而不隱瞞的。 (
१८विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानाच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगितल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
19 這地惟獨賜給他們, 並沒有外人從他們中間經過。)
१९ती भूमी त्याच्या पूर्वजांना दिलेली होती, ज्यात एकटेच राहत होते, आणि त्या मधून कोणी परदेशी कधीही जाऊ शकत नव्हते.
20 惡人一生之日劬勞痛苦; 強暴人一生的年數也是如此。
२०दुष्ट मनुष्याचे सर्व दिवस वेदनात फिरवले जातात, जुलम्याचे जीवनाची वर्ष यातना भोगण्यासाठीच असतात.
21 驚嚇的聲音常在他耳中; 在平安時,搶奪的必臨到他那裏。
२१भीतीचा आवाज त्याच्या कानात आहे, जेव्हा तो समृद्धीत असेल, नाश करणारा त्याच्यावर येईल.
22 他不信自己能從黑暗中轉回; 他被刀劍等候。
२२अंधारातून बाहेर येण्याची तो खात्री करत नाही, त्याच्याकरिता तलवार वाट पाहत आहे.
23 他漂流在外求食,說:哪裏有食物呢? 他知道黑暗的日子在他手邊預備好了。
२३ते कुठे आहे? असे म्हणत तो भाकरीसाठी इकडे तिकडे भटकतो, अंधकाराचा दिवस हाताशी आहे हे तो जाणतो.
24 急難困苦叫他害怕, 而且勝了他,好像君王預備上陣一樣。
२४संकटे आणि दु: ख त्यास भित्रा बनवतात, हाल करण्यासाठी तयार असलेल्या राजा प्रमाणे ते त्याच्या विरूद्ध यश पावतात.
25 他伸手攻擊上帝, 以驕傲攻擊全能者,
२५कारण त्याने देवाच्या विरूद्ध त्याचा हात उगारला आहे, आणि सर्वशक्तिमान देवाच्या विरूद्ध तो गर्वाने वागत आहे.
26 挺着頸項, 用盾牌的厚凸面向全能者直闖;
२६हा दुष्ट मनुष्य ताठ मानेन, जड उंच वाटे असलेली ढाल घेऊन देवाकडे धावतो,
27 是因他的臉蒙上脂油, 腰積成肥肉。
२७त्याचा चेहरा त्याने आपल्या चारबीने जरी झाकून घेतला आणि आपली चरबी त्याने कंबरेत साठवली,
28 他曾住在荒涼城邑, 無人居住、將成亂堆的房屋。
२८आणि उद्वस्त शहरात राहतो, ज्या घरात माणसे राहतात, आणि आत्ता ते मातीचे ढीग होण्यास तयार आहे.
29 他不得富足,財物不得常存, 產業在地上也不加增。
२९तरी तो श्रीमंत होणार नाही, त्याची संपती पण टिकणार नाही, त्याची सावली पण त्यास सोडून जाईल.
30 他不得出離黑暗。 火焰要將他的枝子燒乾; 因上帝口中的氣,他要滅亡。
३०त्याची काळोखापासून सुटका नाही, आग्नीने त्याच्या फांद्या सुकतील, देवाच्या मुख श्वासाने तो दूर जाईल.
31 他不用倚靠虛假欺哄自己, 因虛假必成為他的報應。
३१निरुपयोगी गोष्टींवर त्याने विश्वास ठेवून स्वत: चीच फसवणूक करून घेऊ नये. निरउपयोगीता त्याचे बक्षीस होईल.
32 他的日期未到之先,這事必成就; 他的枝子不得青綠。
३२आयुष्य संपण्याच्या आधीच दुष्ट मनुष्य म्हातारा आणि शुष्क झालेला असेल. तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फांदीसारखा असेल.
33 他必像葡萄樹的葡萄,未熟而落; 又像橄欖樹的花,一開而謝。
३३न पिकलेले द्राक्ष जसे अकाली गळून पडतात त्या वेलीसारखा तो होईल, जैतून झाडाच्या फुला प्रमाणे त्याची फुले गळतील.
34 原來不敬虔之輩必無生育; 受賄賂之人的帳棚必被火燒。
३४अधर्म्याचे घराणे फळ द्रूप होणार नाही लाचलुचूपताचे तंबू आगीत भस्मसात होतात.
35 他們所懷的是毒害,所生的是罪孽; 心裏所預備的是詭詐。
३५ते अपकाराची गर्भधारणा करतात आणि अधर्मास जन्म देतात, त्यांच्या उदरात लबाडीचा गर्भ आहे.”

< 約伯記 15 >