< 耶利米書 33 >

1 耶利米還囚在護衛兵的院內,耶和華的話第二次臨到他說:
नंतर यिर्मया पहारेकऱ्यांच्या अंगणात अजूनही बंदीस्त असता त्याच्याकडे दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,
2 「成就的是耶和華,造作、為要建立的也是耶和華;耶和華是他的名。他如此說:
परमेश्वर जो हे करतो, परमेश्वर जो हे स्थापित करण्यासाठी योजितो, परमेश्वर हे त्याचे नाव आहे, तो असे म्हणतो,
3 你求告我,我就應允你,並將你所不知道、又大又難的事指示你。
मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन.
4 論到這城中的房屋和猶大王的宮室,就是拆毀為擋敵人高壘和刀劍的,耶和華-以色列的上帝如此說:
कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, नगराची घरे व यहूदाच्या राजाची घरे वेढ्याच्या उतरंडीमुळे व तलवारीमुळे पडले आहे याविषयी म्हणत आहे.
5 人要與迦勒底人爭戰,正是拿死屍充滿這房屋,就是我在怒氣和忿怒中所殺的人,因他們的一切惡,我就掩面不顧這城。
खास्दी लढाईस येत असताना ज्या लोकांस मी आपल्या क्रोधाने आणि कोपाने ठार केले तेव्हा त्यांच्या सर्व दुष्टतेमुळे मी आपले मुख या नगरापासून लपविले आहे त्यांच्या मृतदेहाने जी घरे भरली.
6 看哪,我要使這城得以痊癒安舒,使城中的人得醫治,又將豐盛的平安和誠實顯明與他們。
पण पाहा, मी या नगराला आरोग्य आणि उपचार आणून देईन. कारण मी त्यांना बरे करीन आणि शांतीची व सत्यतेची विपुलता त्यांना देईन.
7 我也要使猶大被擄的和以色列被擄的歸回,並建立他們和起初一樣。
कारण मी यहूदी आणि इस्राएल यांचे भाकीत परत आणीन; मी पूर्वीप्रमाणेच त्यांना बांधीन.
8 我要除淨他們的一切罪,就是向我所犯的罪;又要赦免他們的一切罪,就是干犯我、違背我的罪。
मग त्यांनी ज्या अन्यायाने माझ्याविरूद्ध पाप केले त्या सर्वापासून मी त्यांना धुवून स्वच्छ करीन. मी त्यांनी ज्या आपल्या सर्व अन्यायाने माझ्याविरूद्ध पाप केले व ज्या सर्व मार्गाने त्यांनी माझ्याविरूद्ध बंड केले त्या सर्वांची मी त्यांना क्षमा करीन.
9 這城要在地上萬國人面前使我得頌讚,得榮耀,名為可喜可樂之城。萬國人因聽見我向這城所賜的福樂、所施的恩惠平安,就懼怕戰兢。」
कारण हे नगर पृथ्वीतल्या सर्व राष्ट्रांसमोर मला आंनदाचे नाव, स्तुतीचे गीत, सन्मानास कारण असे होईल. त्यांचे सर्व हित मी करीन ते ती ऐकतील आणि जे सर्व हित व जे सर्व कुशल मी त्यांना प्राप्त करून देईन त्यावरून ती भयभीत होतील व थरथर कापतील.
10 耶和華如此說:「你們論這地方,說是荒廢無人民無牲畜之地,但在這荒涼無人民無牲畜的猶大城邑和耶路撒冷的街上,
१०परमेश्वर असे म्हणतो, या स्थानाविषयी तुम्ही आता म्हणता की हे ओसाड आहे. तेथे यहूद्याच्या नगरात कोणी माणसे व प्राणी नाहीत आणि यरूशलेमेचे रस्ते निर्जन झाले आहेत, माणसे व पशू नाहीत.
11 必再聽見有歡喜和快樂的聲音、新郎和新婦的聲音,並聽見有人說: 要稱謝萬軍之耶和華, 因耶和華本為善; 他的慈愛永遠長存! 又有奉感謝祭到耶和華殿中之人的聲音;因為我必使這地被擄的人歸回,和起初一樣。這是耶和華說的。」
११तेथे पुन्हा आनंद व हर्षाचा शब्द ऐकू येईल. नवऱ्याची व नवरीची वाणी ऐकू येईल, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सर्वकाळची आहे. असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात उपकारस्तुतीचे अर्पण आणतील त्यांचा आवाज पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास परत उलटवून सुरुवातीला जसे होते तसे करीन, असे परमेश्वर म्हणतो.
12 萬軍之耶和華如此說:「在這荒廢無人民無牲畜之地,並其中所有的城邑,必再有牧人的住處;他們要使羊群躺臥在那裏。
१२सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, या निर्जन स्थानात, जेथे आता मनुष्य व प्राणी कोणीही नाही. त्यातल्या सर्व नगरात कळप बसविणाऱ्या मेंढपाळांची वस्ती पुन्हा होईल.
13 在山地的城邑、高原的城邑、南地的城邑、便雅憫地、耶路撒冷四圍的各處,和猶大的城邑必再有羊群從數點的人手下經過。這是耶和華說的。」
१३डोंगराळ प्रदेशातील नगरात, मैदानातील नगरात, आणि दक्षिणप्रदेशातील नगरात, बन्यामिनाच्या देशात, यरूशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशात व यहूदाच्या नगरात, व नेगेबातील प्रदेशात मोजदाद करणाऱ्याच्या हाती पुन्हा कळप जातील, असे परमेश्वर म्हणतो.
14 耶和華說:「日子將到,我應許以色列家和猶大家的恩言必然成就。
१४परमेश्वराचे असे म्हणणे आहे, पाहा! असे दिवस येत आहेत जे मी इस्राएल आणि यहूदाच्या घराण्यासाठी जे वचन दिले आहे ते मी करीन.
15 當那日子,那時候,我必使大衛公義的苗裔長起來;他必在地上施行公平和公義。
१५त्या दिवसात आणि त्यावेळी मी दावीदासाठी धार्मिकतेची शाखा वाढवीन आणि ती देशात न्याय आणि धार्मिकता चालवील.
16 在那日子猶大必得救,耶路撒冷必安然居住,他的名必稱為『耶和華-我們的義』。
१६त्या दिवसात यहूदाचे तारण होईल आणि यरूशलेम सुरक्षित राहील. कारण तिला परमेश्वर आमची धार्मिकता आहे या नावाने बोलवतील.
17 「因為耶和華如此說:大衛必永不斷人坐在以色列家的寶座上;
१७कारण परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलाच्या घराण्याच्या सिंहासनावर बसणाऱ्यांची उणीव दावीदाला कधीच पडणार नाही.
18 祭司、利未人在我面前也不斷人獻燔祭、燒素祭,時常辦理獻祭的事。」
१८तसेच माझ्यासमोर होमार्पणे अर्पिणारा, अन्नार्पणाचा यज्ञ करणारा व नित्य यज्ञ करणारा यांची लेवीय याजकास उणीव पडणार नाही.”
19 耶和華的話臨到耶利米說:
१९यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
20 「耶和華如此說:你們若能廢棄我所立白日黑夜的約,使白日黑夜不按時輪轉,
२०परमेश्वर असे म्हणतो, “जर तू दिवस आणि रात्र या विषयीचा जो माझा करार तुमच्याने मोडवेल यासाठी की, दिवस आणि रात्र आपापल्या योग्यवेळी होऊ नयेत म्हणून,
21 就能廢棄我與我僕人大衛所立的約,使他沒有兒子在他的寶座上為王,並能廢棄我與事奉我的祭司、利未人所立的約。
२१तर माझा सेवक दावीद याच्याशी जो करार आहे तोही मोडून जाईल यासाठी की त्यास त्याच्या सिंहासनावर राज्य करायला मुलगा होऊ नये आणि माझी सेवा करणारे लेवी जे याजक त्यांच्याशी जो करार आहे तोही मोडून जाईल.
22 天上的萬象不能數算,海邊的塵沙也不能斗量;我必照樣使我僕人大衛的後裔和事奉我的利未人多起來。」
२२ज्याप्रमाणे आकाशातील सैन्य मोजू शकत नाही आणि जसे समुद्रकाठच्या वाळूचे मापन होऊ शकत नाही. त्याप्रमाणे माझा सेवक दावीद याच्या वंशजांना आणि जे लेवी माझी सेवा करतात त्यांनाही मी बहुगुणित करीन.”
23 耶和華的話臨到耶利米說:
२३यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
24 「你沒有揣摩這百姓的話嗎?他們說:『耶和華所揀選的二族,他已經棄絕了。』他們這樣藐視我的百姓,以為不再成國。
२४“हे लोक जे काय बोलले, ते तू ऐकलेस लक्षात घेतले नाहीस, ते म्हणतात की, जी दोन घराणी परमेश्वराने निवडली ती त्यांना सोडून दिले आहेत काय? याप्रकारे त्यांच्या दृष्टीने पुन्हा राष्ट्र होऊ नये असे ते माझ्या लोकांस तुच्छ लेखतात.”
25 耶和華如此說:若是我立白日黑夜的約不能存住,若是我未曾安排天地的定例,
२५परमेश्वर असे म्हणतो, “जर माझा दिवस व रात्र याविषयीचा माझा करार अढळ नाही किंवा मी जर आकाशाचे आणि पृथ्वीचे नियम स्थापिले नाहीत,
26 我就棄絕雅各的後裔和我僕人大衛的後裔,不使大衛的後裔治理亞伯拉罕、以撒、雅各的後裔;因為我必使他們被擄的人歸回,也必憐憫他們。」
२६तर याकोबाची संतती व माझा सेवक दावीद याच्या संततीचा मी त्याग करीन आणि दावीदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या संततीवर सत्ता चालविण्यास ठेवणार नाही; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन व त्याजवर दया करीन.”

< 耶利米書 33 >