< 創世記 31 >
1 雅各聽見拉班的兒子們有話說:「雅各把我們父親所有的都奪了去,並藉着我們父親的,得了這一切的榮耀。」
१लाबानाचे पुत्र आपसात बोलत असताना याकोबाने ऐकले ते म्हणाले, “जे आपल्या बापाचे त्यातून सर्वकाही याकोबाने घेतले आहे आणि जे आमच्या वडिलाच्या त्या मालमत्तेतून तो संपन्न झाला आहे.”
२याकोबाने लाबानाचा चेहरा पाहिला. त्याच्या वागण्यात बदल झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
3 耶和華對雅各說:「你要回你祖、你父之地,到你親族那裏去,我必與你同在。」
३परमेश्वर याकोबाला म्हणाला, “तुझ्या वडिलाच्या देशात आपल्या नातलगांकडे तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन.”
४तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना, तो आपले शेरडामेंढरांचे कळप राखीत होता, तेथे शेतात बोलावले,
5 對她們說:「我看你們父親的氣色向我不如從前了;但我父親的上帝向來與我同在。
५आणि त्यांना म्हणाला, “तुमच्या वडिलाच्या वागण्यात मला बदल झालेला जाणवला आहे. परंतु माझ्या बापाचा देव माझ्याबरोबर आहे.
६तुम्हास माहीत आहे की, मी आपल्या सर्व शक्तीने तुमच्या बापाची सेवा केली आहे.
7 你們的父親欺哄我,十次改了我的工價;然而上帝不容他害我。
७तुमच्या वडिलाने मला फसवले आणि त्याने माझ्या वेतनात दहा वेळा बदल केलेला आहे. परंतु देवाने माझे नुकसान करण्याची परवानगी त्यास दिली नाही.
8 他若說:『有點的歸你作工價』,羊群所生的都有點;他若說:『有紋的歸你作工價』,羊群所生的都有紋。
८जेव्हा तो म्हणाला, सर्व ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुझे वेतन होतील, सर्व शेळ्यामेंढ्यांना ठिपकेदार करडे होऊ लागली. परंतु मग लाबान म्हणाला, तू बांड्या बकऱ्या घे; त्या तुला वेतनादाखल होतील. त्याने असे म्हटल्यानंतर सर्व बकऱ्यांना बांडी करडे होऊ लागली,
९तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या वडिलाच्या कळपातून गुरेढोरे काढून घेऊन ती मला दिलेली आहेत.
10 羊配合的時候,我夢中舉目一看,見跳母羊的公羊都是有紋的、有點的、有花斑的。
१०एकदा शेळ्यामेंढ्यांचा कळप निपजण्याच्या वेळेस मी आपली दृष्टी वर करून स्वप्नात पाहिले, तो पाहा, कळपातल्या माद्यांवर नर उडत होते ते फक्त ठिपकेदार व बांडे, करडे होते.”
11 上帝的使者在那夢中呼叫我說:『雅各。』我說:『我在這裏。』
११देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला, “याकोबा,” मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?”
12 他說:『你舉目觀看,跳母羊的公羊都是有紋的、有點的、有花斑的;凡拉班向你所做的,我都看見了。
१२तो म्हणाला, “आपले डोळे वर करून पाहा, ‘फक्त ठिपकेदार व बांडे, करडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत. लाबान तुला काय करीत आहे ते सर्व मी पाहिले आहे.
13 我是伯特利的上帝;你在那裏用油澆過柱子,向我許過願。現今你起來,離開這地,回你本地去吧!』」
१३बेथेलचा मी देव आहे. जेथे तू एका स्मारकस्तंभास अभिषेक केलास, जेथे नवस करून तू मला वचन दिले, आणि आता तू हा देश सोड आणि आपल्या जन्मभूमीस परत जा.’”
14 拉結和利亞回答雅各說:「在我們父親的家裏還有我們可得的分嗎?還有我們的產業嗎?
१४राहेल व लेआ यांनी त्यास उत्तर दिले आणि त्यास म्हणाल्या, “आमच्या वडिलाच्या घरी आम्हांला वारसा किंवा तेथे काही भाग नाही.
15 我們不是被他當作外人嗎?因為他賣了我們,吞了我們的價值。
१५आम्ही परक्या असल्यासारखे त्याने आम्हांला वागवले नाही काय? त्याने आम्हास तुम्हास विकून टाकले, आणि आमचे पूर्ण पैसे खाऊन टाकले आहेत.
16 上帝從我們父親所奪出來的一切財物,那就是我們和我們孩子們的。現今凡上帝所吩咐你的,你只管去行吧!」
१६देवाने ही सर्व संपत्ती आमच्या पित्याकडून घेतली आणि आता ती आपली व आपल्या मुळाबाळांची संपत्ती झाली आहे. तेव्हा देवाने तुम्हास जे करावयास सांगितले आहे ते करा.”
१७तेव्हा याकोब उठला आणि त्याने आपल्या स्त्रिया व मुलांना उंटांवर बसवले.
18 又帶着他在巴旦‧亞蘭所得的一切牲畜和財物,往迦南地、他父親以撒那裏去了。
१८तो आपली सर्व गुरेढोरे आणि आपण मिळवलेले सर्व धन, म्हणजे जे गुरांढोरांचे कळप त्याने पदन-अरामात मिळवले होते, ते घेऊन आपला बाप इसहाक याच्याकडे कनान देशास जाण्यास निघाला.
19 當時拉班剪羊毛去了,拉結偷了他父親家中的神像。
१९त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता. तेव्हा राहेलने आपल्या वडिलाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या.
२०याकोबानेही अरामी लाबानाला फसवले. आपण येथून सोडून जात आहो हे त्यास सांगितले नाही.
21 就帶着所有的逃跑。他起身過大河,面向基列山行去。
२१याकोब आपली बायकामुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब पळाला. त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले.
२२तीन दिवसानंतर याकोब पळून गेल्याचे लाबानास कळाले.
23 拉班帶領他的眾弟兄去追趕,追了七日,在基列山就追上了。
२३तेव्हा त्याने आपले नातलग एकत्र जमवले आणि याकोबाचा पाठलाग सुरू केला. सात दिवसानंतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्यास याकोब सापडला.
24 夜間,上帝到亞蘭人拉班那裏,在夢中對他說:「你要小心,不可與雅各說好說歹。」
२४त्या रात्री देव अरामी लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नये म्हणून काळजी घे.”
25 拉班追上雅各。雅各在山上支搭帳棚;拉班和他的眾弟兄也在基列山上支搭帳棚。
२५लाबानाने याकोबाला गाठले. याकोबाने डोंगराळ प्रदेशात तळ दिला होता. लाबानानेही आपल्या बरोबरच्या नातलगासह गिलादाच्या डोंगराळ भागात तळ दिला.
26 拉班對雅各說:「你做的是甚麼事呢?你背着我偷走了,又把我的女兒們帶了去,如同用刀劍擄去的一般。
२६लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला हे काय केले? तू मला फसवलेस. आणि युद्धकैदी केलेल्या स्त्रियांप्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास?
27 你為甚麼暗暗地逃跑,偷着走,並不告訴我,叫我可以歡樂、唱歌、擊鼓、彈琴地送你回去?
२७तू मला न सांगता का पळून गेलास? मला का फसवले? तू मला सांगितले नाही. मी तर उत्सव करून आणि गाणी, डफ व वीणा वाजवून तुला पाठवले असते.
28 又不容我與外孫和女兒親嘴?你所行的真是愚昧!
२८तू मला माझ्या नातवांचा व माझ्या मुलींचा निरोप घेण्याची किंवा त्यांची चुंबने घेण्याची संधी दिली नाहीस. आता हा तू मूर्खपणा केला आहे.
29 我手中原有能力害你,只是你父親的上帝昨夜對我說:『你要小心,不可與雅各說好說歹。』
२९खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे, परंतु काल रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात बोलला आणि म्हणाला, ‘तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नको म्हणून काळजी घे.’
30 現在你雖然想你父家,不得不去,為甚麼又偷了我的神像呢?」
३०तुला तुझ्या वडिलाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास, परंतु तू माझ्या घरातील कुलदेवता का चोरल्यास?”
31 雅各回答拉班說:「恐怕你把你的女兒從我奪去,所以我逃跑。
३१याकोबाने उत्तर दिले आणि लाबानास म्हणाला, “मी गुप्तपणे निघालो कारण मला भीती वाटली, आणि मी विचार केला की, तुम्ही तुमच्या मुली माझ्यापासून हिसकावून घ्याल.
32 至於你的神像,你在誰那裏搜出來,就不容誰存活。當着我們的眾弟兄,你認一認,在我這裏有甚麼東西是你的,就拿去。」原來雅各不知道拉結偷了那些神像。
३२ज्या कोणी तुमच्या कुलदेवता चोरल्या आहेत तर तो जगणार नाही. तुमच्या नातलगासमोर माझ्याबरोबर जे काही तुमचे आहे ते तुम्ही आपले ओळखा आणि ते घ्या.” राहेलीने त्या मूर्ती चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते.
33 拉班進了雅各、利亞,並兩個使女的帳棚,都沒有搜出來,就從利亞的帳棚出來,進了拉結的帳棚。
३३लाबान याकोबाच्या तंबूत गेला, लेआच्या तंबूत गेला आणि दासींच्या तंबूत गेला परंतु त्यास त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर तो राहेलीच्या तंबूत गेला.
34 拉結已經把神像藏在駱駝的馱簍裏,便坐在上頭。拉班摸遍了那帳棚,並沒有摸着。
३४राहेलीने त्या कुलदेवता उंटाच्या खोगिरात लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधला परंतु त्या सापडल्या नाहीत.
35 拉結對她父親說:「現在我身上不便,不能在你面前起來,求我主不要生氣。」這樣,拉班搜尋神像,竟沒有搜出來。
३५ती आपल्या पित्यास म्हणाली, “मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझी मासिकपाळी आली आहे.” अशा रीतीने त्याने शोध केला परंतु त्यास कुलदेवता सापडल्या नाहीत.
36 雅各就發怒斥責拉班說:「我有甚麼過犯,有甚麼罪惡,你竟這樣火速地追我?
३६मग याकोबाला राग आला आणि त्याने लाबानाशी वाद केला, तो त्यास म्हणाला, “माझा गुन्हा काय आहे? माझे पाप कोणते आहे, म्हणून तुम्ही माझा रागाने पाठलाग केलात?
37 你摸遍了我一切的家具,你搜出甚麼來呢?可以放在你我弟兄面前,叫他們在你我中間辨別辨別。
३७माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही शोधून पाहिल्या आहेत. तुम्हास तुमच्या मालकीची एकतरी चीजवस्तू आढळली का? जर तुम्हास तुमचे काही मिळाले असेल तर ते आपल्या नातलगासमोर ठेवा. यासाठी की ते आपल्या दोघांचा न्याय करतील.
38 我在你家這二十年,你的母綿羊、母山羊沒有掉過胎。你群中的公羊,我沒有吃過;
३८मी वीस वर्षे तुमच्याबरोबर होतो. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरू मरण पावलेले जन्मले नाही आणि तुमच्या कळपातील एकही बकरा मी खाल्ला नाही.
39 被野獸撕裂的,我沒有帶來給你,是我自己賠上。無論是白日,是黑夜,被偷去的,你都向我索要。
३९जनावरांनी फाडलेले ते मी तुमच्याकडे आणले नाही. त्याऐवजी ते नुकसान मी भरून दिले. दिवसा किंवा रात्री चोरी गेलेले, प्रत्येक हरवलेले जनावर ते तुम्ही नेहमी माझ्या हातून भरून घेत होता.
40 我白日受盡乾熱,黑夜受盡寒霜,不得合眼睡着,我常是這樣。
४०दिवसा उन्हाच्या तापाने व रात्री गारठ्यामुळे मला त्रास होई. आणि माझ्या डोळ्यावरून झोप उडून जाई, अशी माझी स्थिती होती.
41 我這二十年在你家裏,為你的兩個女兒服事你十四年,為你的羊群服事你六年,你又十次改了我的工價。
४१वीस वर्षे मी तुमच्या घरी राहिलो; पहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुलींसाठी आणि सहा वर्षे तुमच्या कळपांसाठी. दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला.
42 若不是我父親以撒所敬畏的上帝,就是亞伯拉罕的上帝與我同在,你如今必定打發我空手而去。上帝看見我的苦情和我的勞碌,就在昨夜責備你。」
४२परंतु माझ्या पूर्वजांचा देव; अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा देव ज्याचे मी भय धरतो, तो माझ्या बरोबर होता. तो जर माझ्याबरोबर नसता तर तुम्ही मला नक्कीच रिकामे पाठवले असते. देवाने माझ्यावर झालेला जुलूम पाहिला आणि मी कष्टाने केलेले काम पाहिले आणि काल रात्री त्याने तुम्हास धमकावले.”
43 拉班回答雅各說:「這女兒是我的女兒,這些孩子是我的孩子,這些羊群也是我的羊群;凡在你眼前的都是我的。我的女兒並她們所生的孩子,我今日能向他們做甚麼呢?
४३लाबानाने उत्तर दिले आणि तो याकोबाला म्हणाला, “या मुली माझ्या मुली आहेत आणि ही नातवंडे माझी नातवंडे आहेत आणि हे कळप माझे कळप आहेत. जे काही तू पाहतोस ते सर्व माझे आहे. परंतु आज मी या मुलींसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी ज्यांना त्यांनी जन्म दिला त्यांना मी काय करू शकतो?
44 來吧!你我二人可以立約,作你我中間的證據。」
४४म्हणून मी व तू आता आपण करार करू आणि तो माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी होवो.”
४५तेव्हा याकोबाने मोठा दगड घेऊन स्मारकस्तंभ उभा केला.
46 又對眾弟兄說:「你們堆聚石頭。」他們就拿石頭來堆成一堆,大家便在旁邊吃喝。
४६याकोब त्याच्या नातलगांना म्हणाला की, “दगड गोळा करा.” मग त्यांनी दगड गोळा करून त्याची रास केली. नंतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले.
47 拉班稱那石堆為伊迦爾‧撒哈杜他,雅各卻稱那石堆為迦累得。
४७लाबानाने त्या राशीला यगर-सहादूथा असे नाव ठेवले. परंतु याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले.
48 拉班說:「今日這石堆作你我中間的證據。」因此這地方名叫迦累得,
४८लाबान म्हणाला, “ही दगडांची रास आज माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी आहे.” म्हणून त्याचे नाव गलेद ठेवले.
49 又叫米斯巴,意思說:「我們彼此離別以後,願耶和華在你我中間鑒察。
४९मग लाबान म्हणाला, “आपण एकमेकापासून दूर होत असताना परमेश्वर माझ्यावर व तुझ्यावर लक्ष ठेवो.” म्हणून त्या जागेचे नाव मिस्पा ठेवण्यात आले.
50 你若苦待我的女兒,又在我的女兒以外另娶妻,雖沒有人知道,卻有上帝在你我中間作見證。」
५०जर का तू माझ्या मुलींना दुःख देशील किंवा माझ्या मुलींशिवाय दुसऱ्या स्त्रिया करून घेशील. तर पाहा, “जरी आमच्याबरोबर कोणी नाही पण तुझ्यात व माझ्यात देव साक्षी आहे.”
51 拉班又說:「你看我在你我中間所立的這石堆和柱子。
५१लाबान याकोबास म्हणाला, या राशीकडे पाहा आणि स्मारकस्तंभाकडे पाहा, जो मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये ठेवला आहे.
52 這石堆作證據,這柱子也作證據。我必不過這石堆去害你;你也不可過這石堆和柱子來害我。
५२ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची साक्ष होवो, की हानी करायला मी तुझ्याकडे ही रास ओलांडून येणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्ध ही रास ओलांडून कधीही येऊ नये.
53 但願亞伯拉罕的上帝和拿鶴的上帝,就是他們父親的上帝,在你我中間判斷。」雅各就指着他父親以撒所敬畏的上帝起誓,
५३अब्राहामाचा देव, नाहोराचा देव आणि त्यांच्या वडिलांचा देव आमचा न्याय करो. याकोबाने त्याचा बाप इसहाक, ज्या देवाचे भय धरत असे त्याची शपथ घेतली.
54 又在山上獻祭,請眾弟兄來吃飯。他們吃了飯,便在山上住宿。
५४मग याकोबाने त्या डोंगरावर यज्ञ केला आणि त्याने आपल्या सर्व नातलगांना भोजनासाठी आमंत्रण दिले. भोजन संपल्यावर त्यांनी ती रात्र डोंगरावरच घालवली.
55 拉班清早起來,與他外孫和女兒親嘴,給他們祝福,回往自己的地方去了。
५५दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या मुली व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.