< 以斯拉記 9 >
1 這事做完了,眾首領來見我,說:「以色列民和祭司並利未人,沒有離絕迦南人、赫人、比利洗人、耶布斯人、亞捫人、摩押人、埃及人、亞摩利人,仍效法這些國的民,行可憎的事。
१या सर्व गोष्टी झाल्यावर अधिकारी माझ्याकडे येऊन म्हणाले, “इस्राएल लोक, याजक आणि लेवी हे इतर देशाच्या लोकांपासून वेगळे राहत नसून व ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी आणि अमोरी यांच्याप्रमाणेच घृणास्पद कृत्ये करतात.
2 因他們為自己和兒子娶了這些外邦女子為妻,以致聖潔的種類和這些國的民混雜;而且首領和官長在這事上為罪魁。」
२कारण त्यांनी आपणाला व आपल्या मुलांना त्यांच्या काही स्त्रिया करून घेतल्या आहेत आणि पवित्र लोक इतर देशाच्या लोकांबरोबर मिसळून गेले आहेत. आणि अधिकारी व नेते हेच प्रथम यामध्ये अप्रामाणिक आहेत.”
3 我一聽見這事,就撕裂衣服和外袍,拔了頭髮和鬍鬚,驚懼憂悶而坐。
३जेव्हा हे मी ऐकले, मी माझा अंगरखा आणि वस्त्रे फाडली. डोक्यावरचे आणि दाढीचे केस उपटले. नंतर मी शरमेने खाली बसलो.
4 凡為以色列上帝言語戰兢的,都因這被擄歸回之人所犯的罪聚集到我這裏來。我就驚懼憂悶而坐,直到獻晚祭的時候。
४तेव्हा या अविश्वासूपणाविषयी ऐकून जे सर्व इस्राएली लोक देवाच्या वचनाने थरथर कापत होते ते माझ्याभोवती जमले आणि संध्याकाळची अर्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे शरमेने खाली बसून राहिलो.
5 獻晚祭的時候我起來,心中愁苦,穿着撕裂的衣袍,雙膝跪下向耶和華-我的上帝舉手,
५संध्याकाळची अर्पणांची वेळ झाली तेव्हा मी अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा अपमानीत स्थितीत मी गुडघे टेकून व माझा देव परमेश्वर याच्यापुढे हात पसरुन बसलो.
6 說:「我的上帝啊,我抱愧蒙羞,不敢向我上帝仰面;因為我們的罪孽滅頂,我們的罪惡滔天。
६मी म्हणालो, “हे देवा, तुझ्याकडे पाहण्याची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकावरून गेली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोहचले आहेत.
7 從我們列祖直到今日,我們的罪惡甚重;因我們的罪孽,我們和君王、祭司都交在外邦列王的手中,殺害、擄掠、搶奪、臉上蒙羞正如今日的光景。
७आमच्या वाडवडिलांच्या वेळेपासून आतापर्यंत आम्ही महान पापांचे दोषी आहोत. आमच्या अपराधांमुळे आमचे राजे आणि याजक यांना या जगिक राजाच्या हाती तलवार व बंदीवास, लुटालुट आणि मुखलज्जेला, आज आम्ही जसे आहोत तसे दिलेत.
8 現在耶和華-我們的上帝暫且施恩與我們,給我們留些逃脫的人,使我們安穩如釘子釘在他的聖所,我們的上帝好光照我們的眼目,使我們在受轄制之中稍微復興。
८आमच्या देवाने आमचे डोळे प्रकाशीत केले आहेत. आमच्या दास्यपणात आम्हास दिलासा दिलास. परमेश्वर आमचा देव याने आम्हावर कृपा केली आहे. तू आमच्यापैकी काहीजणांना वाचवून अवशेष ठेवले आहे. आणि त्याच्या पवित्रस्थानात आमच्या पायांना खुंटीचा आधार दिला आहे.
9 我們是奴僕,然而在受轄制之中,我們的上帝仍沒有丟棄我們,在波斯王眼前向我們施恩,叫我們復興,能重建我們上帝的殿,修其毀壞之處,使我們在猶大和耶路撒冷有牆垣。
९आम्ही गुलामच आहोत. तरी आमचा देव आम्हास विसरला नाही. पण त्याने आमच्यावर कराराप्रमाणे विश्वास योग्यता दाखवली. आमच्या देवाचे उद्ध्वस्त झालेले मंदिर पुन्हा बांधण्यास त्यांना नवीन शक्ती दिली यासाठी पारसाच्या राजाची आमच्यावर कृपा होईल असे केलेस. यहूदा आणि यरूशलेमेच्या संरक्षणासाठी भिंत बांधावी म्हणून तू साह्यकारी झालास.
10 「我們的上帝啊,既是如此,我們還有甚麼話可說呢?因為我們已經離棄你的命令,
१०परंतु आमच्या देवा, आता यानंतर आम्ही काय बोलावे? कारण आम्ही तुझ्या आज्ञा विसरून गेलो आहोत.
11 就是你藉你僕人眾先知所吩咐的說:『你們要去得為業之地是污穢之地;因列國之民的污穢和可憎的事,叫全地從這邊直到那邊滿了污穢。
११त्या आज्ञा, तुझे सेवक जे संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हास दिल्यास. जेव्हा तू म्हणालास, तुम्ही ज्या देशात प्रवेश करून ताब्यात घेण्यास जात आहात तो अशुद्ध देश आहे. तो त्या देशाच्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे.
12 所以不可將你們的女兒嫁他們的兒子,也不可為你們的兒子娶他們的女兒,永不可求他們的平安和他們的利益,這樣你們就可以強盛,吃這地的美物,並遺留這地給你們的子孫永遠為業。』
१२त्यामुळे आता तुमच्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नका. त्यांच्या मुली तुमच्या मुलांना करू नका आणि कधी त्यांची शांती आणि सुस्थिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका यासाठी की, तुम्ही बलशाली होऊन त्या देशाचे उत्तम फळ खावे, अशा रीतीने आपल्या मुलांबाळासाठी तो प्रदेश सर्वकाळासाठी ताब्यात घ्यावा.
13 上帝啊,我們因自己的惡行和大罪,遭遇了這一切的事,並且你刑罰我們輕於我們罪所當得的,又給我們留下這些人。
१३आमच्या वाईट कृत्यामुळे आणि महान दोषामुळे हे सर्व आम्हावर आल्यानंतर, हे आमच्या देवा आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हास केलेले शासन कमीच आहे आणि तू आम्हास वाचवून अवशेष ठेवले.
14 我們豈可再違背你的命令,與這行可憎之事的民結親呢?若這樣行,你豈不向我們發怒,將我們滅絕,以致沒有一個剩下逃脫的人嗎?
१४आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ लोकांशी सोयरीक करावी काय? काहीही शिल्लक राहणार नाही, कोणीही निसटणार नाही असा आमचा संपूर्ण नाश करीपर्यंत तुझा क्रोध आमच्यावर पेटणार नाही काय?
15 耶和華-以色列的上帝啊,因你是公義的,我們這剩下的人才得逃脫,正如今日的光景。看哪,我們在你面前有罪惡,因此無人在你面前站立得住。」
१५हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तू न्यायी आहेस. तू आजच्याप्रमाणे आम्हास वाचवून अवशेष ठेवले आहेस. पाहा, आम्ही इथे तुझ्यापुढे आमच्या अपराधामुळे आहोत, यामुळे तुझ्यापुढे कोणालाहि उभे राहता येत नाही.”