< 以西結書 37 >

1 耶和華的靈降在我身上。耶和華藉他的靈帶我出去,將我放在平原中;這平原遍滿骸骨。
परमेश्वराचा हात माझ्यावर आला, परमेश्वराच्या आत्म्याकडून मला बाहेर उचलून नेले आणि खाली दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती हाडांनी भरलेली होती.
2 他使我從骸骨的四圍經過,誰知在平原的骸骨甚多,而且極其枯乾。
मग त्याने मला त्यामधून गोल व गोल चालवले. पाहा! दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होती. आणि पाहा! ती हाडे अगदी सुकलेली होती.
3 他對我說:「人子啊,這些骸骨能復活嗎?」我說:「主耶和華啊,你是知道的。」
तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे पुन्हा जिवंत होऊ शकतील का?” मग मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, फक्त तुलाच माहीत आहे.”
4 他又對我說:「你向這些骸骨發預言說:枯乾的骸骨啊,要聽耶和華的話。
मग तो मला म्हणाला, “त्या हाडांविषयी भविष्य सांग आणि त्यांना म्हण, सुकलेल्या हाडांनो परमेश्वराचे वचन ऐका.
5 主耶和華對這些骸骨如此說:『我必使氣息進入你們裏面,你們就要活了。
प्रभू परमेश्वर या हाडांस असे म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालीन व तुम्ही जिवंत व्हाल.
6 我必給你們加上筋,使你們長肉,又將皮遮蔽你們,使氣息進入你們裏面,你們就要活了;你們便知道我是耶和華。』」
मी तुमच्यावर स्नायू लावीन आणि मांस चढवीन आणि मी तुम्हास त्वचेने आवरण घालीन आणि तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही जिवंत व्हाल. मग तुम्हास समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे.”
7 於是,我遵命說預言。正說預言的時候,不料,有響聲,有地震;骨與骨互相聯絡。
म्हणून मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी भविष्य सांगितले; जसे मी भविष्य सांगत असता, आवाज आला. पाहा भूकंप होऊन हाडांना हाड लागून एकमेकांशी जवळ येऊन जोडली गेली.
8 我觀看,見骸骨上有筋,也長了肉,又有皮遮蔽其上,只是還沒有氣息。
मी पाहिले आणि पाहा, तेव्हा त्यांच्यावर स्नायू होते. आणि मांस चढले व त्यावर त्वचेने आवरण घातले. पण त्यांच्यात अजून श्वास नव्हता.
9 主對我說:「人子啊,你要發預言,向風發預言,說主耶和華如此說:氣息啊,要從四方而來,吹在這些被殺的人身上,使他們活了。」
मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला वाऱ्याला भविष्य सांग, भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे वाऱ्या तू चोहो दिशेने ये व वधलेल्यावर फुंकर घाल म्हणजे ते पुन्हा जिवंत होतील.”
10 於是我遵命說預言,氣息就進入骸骨,骸骨便活了,並且站起來,成為極大的軍隊。
१०मग मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्य सांगितले, तेव्हा त्यामध्ये श्वास येऊन ते जिवंत झाले व ते अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले.
11 主對我說:「人子啊,這些骸骨就是以色列全家。他們說:『我們的骨頭枯乾了,我們的指望失去了,我們滅絕淨盡了。』
११आणि देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे म्हणजे सर्व इस्राएल घराणेच आहे. पाहा ते म्हणतात, आमची हाडे सुकून गेली आहेत. आम्हास आशा राहिलेली नाही. आम्हास नाशासाठी कापून टाकले आहे.
12 所以你要發預言對他們說,主耶和華如此說:『我的民哪,我必開你們的墳墓,使你們從墳墓中出來,領你們進入以色列地。
१२म्हणून भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरी उघडून तुम्हास कबरीतून बाहेर काढीन. आणि मी तुम्हास इस्राएलाच्या भूमीत परत आणीन.
13 我的民哪,我開你們的墳墓,使你們從墳墓中出來,你們就知道我是耶和華。
१३माझ्या लोकांनो, जेव्हा मी तुमच्या कबरी उघडीन व त्यातून तुम्हास बाहेर काढीन तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे.
14 我必將我的靈放在你們裏面,你們就要活了。我將你們安置在本地,你們就知道我-耶和華如此說,也如此成就了。這是耶和華說的。』」
१४मी तुमच्यात माझा आत्मा ओतीन म्हणजे मग तुम्ही जिवंत व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या स्वतःच्या देशात विसावा देईन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हास समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”
15 耶和華的話又臨到我說:
१५मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
16 「人子啊,你要取一根木杖,在其上寫『為猶大和他的同伴以色列人』;又取一根木杖,在其上寫『為約瑟,就是為以法蓮,又為他的同伴以色列全家』。
१६तर “मानवाच्या मुला, आता तू आपल्यासाठी एक काठी घे आणि तिच्यावर लिही, यहूदा आणि त्याचे सहकारी इस्राएलाचे लोक यांच्यासाठी. आणि दुसरी काठी घे व तिच्यावर लिही, योसेफासाठी म्हणजे एफ्राईमाची शाखा व त्यांचे सहकारी सर्व इस्राएलाचे लोक यासाठी आहे.
17 你要使這兩根木杖接連為一,在你手中成為一根。
१७मग त्या दोन्ही एकत्र आणून त्यांची एक काठी कर म्हणजे त्या तुझ्या हातांत एक होतील.
18 你本國的子民問你說:『這是甚麼意思?你不指示我們嗎?』
१८जेव्हा तुझे लोक तुझ्याशी बोलतील आणि म्हणतील, या तुझ्या गोष्टींचा अर्थ काय आहे हे आम्हास सांगणार नाहीस काय?
19 你就對他們說:『主耶和華如此說:我要將約瑟和他同伴以色列支派的杖,就是那在以法蓮手中的,與猶大的杖一同接連為一,在我手中成為一根。』
१९मग त्यांना सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, योसेफाची जी काठी एफ्राईमाच्या हाती आहे तिला आणि इस्राएलाचे जे वंश त्यांचे सहकारी आहेत त्यांना घेऊन मी यहूदाच्या काठीबरोबर जोडीन, यासाठी की त्यांना एक काठी करीन आणि ते माझ्या हातांत एक होतील.
20 你所寫的那兩根杖要在他們眼前拿在手中,
२०नंतर ज्या काठ्यांवर तू लिहिशील त्या त्यांच्या डोळ्यासमोर तुझ्या हातात धर.
21 要對他們說,主耶和華如此說:我要將以色列人從他們所到的各國收取,又從四圍聚集他們,引導他們歸回本地。
२१मग त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी इस्राएल लोकांस ज्या राष्ट्रांत ते गेले आहेत, तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सभोवतालच्या देशातून गोळा करीन. कारण मी त्यांना त्यांच्या देशात आणीन.
22 我要使他們在那地,在以色列山上成為一國,有一王作他們眾民的王。他們不再為二國,決不再分為二國;
२२मी या देशात इस्राएलाच्या पर्वतावर त्यांचे एकच राष्ट्र करीन. त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील. यापुढे ती दोन राष्ट्रे राहणार नाहीत, त्यांचे यापुढे दोन राज्यात विभाजन होणार नाही.
23 也不再因偶像和可憎的物,並一切的罪過玷污自己。我卻要救他們出離一切的住處,就是他們犯罪的地方;我要潔淨他們,如此,他們要作我的子民,我要作他們的上帝。
२३मग ते यापुढे आपल्या स्वत: ला मूर्तीपुढे वा त्यांच्या तिरस्करणीय वस्तूंनी किंवा त्यांचे कोणतेही पापांनी आपणाला विटाळविणार नाहीत. त्यांनी ज्या आपल्या राहण्याच्या स्थानात पाप केले आहे त्या सर्वातून मी त्यांना तारीन व त्यांना शुद्ध करीन, यासाठी की, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.
24 「我的僕人大衛必作他們的王;眾民必歸一個牧人。他們必順從我的典章,謹守遵行我的律例。
२४दावीद माझा सेवक त्यांच्यावर राजा होईल. त्या सर्वांवर एकच मेंढपाळ असेल, आणि ते माझ्या निर्णयानुसार चालतील आणि माझे नियम राखून ठेवतील व त्याचे पालन करतील.
25 他們必住在我賜給我僕人雅各的地上,就是你們列祖所住之地。他們和他們的子孫,並子孫的子孫,都永遠住在那裏。我的僕人大衛必作他們的王,直到永遠。
२५जो देश माझा सेवक याकोब याला मी दिला, जेथे तुमचे पूर्वज राहत होते. त्यामध्ये ते वस्ती करतील, तेथे ते व त्यांची मुले, व त्यांची नातवंडे सर्वकाळ तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा सर्वकाळचा अधिपती होईन.
26 並且我要與他們立平安的約,作為永約。我也要將他們安置在本地,使他們的人數增多,又在他們中間設立我的聖所,直到永遠。
२६मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन. तो त्यांच्याशी सर्वकाळचा करार होईल. मी त्यांना घेऊन बहुगुणीत करीन आणि मी आपले पवित्र स्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ स्थापीन.
27 我的居所必在他們中間;我要作他們的上帝,他們要作我的子民。
२७माझे निवासस्थान त्यांच्यामध्ये राहील. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.
28 我的聖所在以色列人中間直到永遠,外邦人就必知道我是叫以色列成為聖的耶和華。」
२८जेव्हा माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्रांना समजेल की, इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”

< 以西結書 37 >