< 阿摩司書 8 >

1 主耶和華又指示我一件事:我看見一筐夏天的果子。
परमेश्वराने मला हे दाखवले, पाहा, उन्हाळ्यातल्या फळांची टोपली दिसली.
2 他說:「阿摩司啊,你看見甚麼?」我說:「看見一筐夏天的果子。」耶和華說:「我民以色列的結局到了,我必不再寬恕他們。」
तो म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.” मग परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या लोकांचा, इस्राएलचा, शेवट आला आहे; मी त्यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करणार नाही.
3 主耶和華說:「那日,殿中的詩歌變為哀號;必有許多屍首在各處拋棄,無人作聲。」
परमेश्वर, असे म्हणातो, त्या दिवसात मंदिरातील गाणे विलाप होतील. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील, प्रत्येक स्थानांत लोक गुपचूप ती बाहेर टाकून देतील.”
4 你們這些要吞吃窮乏人、 使困苦人衰敗的,當聽我的話!
जे तुम्ही गरिबांना तुडविता, आणि देशातील गरीबांना काढता. ते तुम्ही हे ऐका.
5 你們說:月朔幾時過去, 我們好賣糧; 安息日幾時過去, 我們好擺開麥子; 賣出用小升斗, 收銀用大戥子, 用詭詐的天平欺哄人,
तुम्ही म्हणता “चंद्रदर्शन केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू. शब्बाथ, केव्हा संपेल? म्हणजे मग आम्हास गहू विकता येईल? मग आपण एफा लहान करू, व शेकेल नाणे मोठे करू व कपटाचे तराजू घेऊन फसवू.
6 好用銀子買貧寒人, 用一雙鞋換窮乏人, 將壞了的麥子賣給人。
आपण चांदी देऊन गरीबांना आणि एका जोड्याच्या किंमतीत गरजूंना विकत घेऊ आणि गव्हाचे भूसही विकून टाकू.”
7 耶和華指着雅各的榮耀起誓說: 他們的一切行為,我必永遠不忘。
परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहीली आहे की, “खचित त्यांच्या कर्मातले कोणतेही मी विसरणार नाही.
8 地豈不因這事震動? 其上的居民不也悲哀嗎? 地必全然像尼羅河漲起, 如同埃及河湧上落下。
त्यांमुळे भूमी हादरणार नाही काय? आणि या देशात राहणारा प्रत्येकजण शोक करणार नाही काय? त्यातील सर्व नील नदीप्रमाणे चढेल, आणि मिसरातल्या नदी सारखी खवळेल व पुन्हा खाली ओसरेल.”
9 主耶和華說:到那日, 我必使日頭在午間落下, 使地在白晝黑暗。
परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात,” “मी सूर्याला दुपारीच मावळवीन आणि पृथ्वीला निरभ्र दिवशी अंधकारमय करीन.
10 我必使你們的節期變為悲哀, 歌曲變為哀歌。 眾人腰束麻布,頭上光禿, 使這場悲哀如喪獨生子, 至終如痛苦的日子一樣。
१०मी तुमचे उत्सव पालटून शोक असे करीन, आणि तुमची सर्व गाणी पालटून विलाप अशी करीन. मी प्रत्येकाला गोणताटाचे कपडे घालीन. मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. ए कुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो, तसा मी करीन. तो फारच कडू शेवट असेल.”
11 主耶和華說:日子將到, 我必命饑荒降在地上。 人飢餓非因無餅,乾渴非因無水, 乃因不聽耶和華的話。
११परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी देशात दुष्काळ पाठवीन, ते दिवस येतच आहेत, तेव्हा भाकरीचा दुष्काळ नसेल, पाण्याचा दुष्काळ नसेल, परंतू परमेश्वराची वचने ऐकण्याचा दुष्काळ असेल.”
12 他們必飄流,從這海到那海, 從北邊到東邊,往來奔跑, 尋求耶和華的話,卻尋不着。
१२“लोक समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील. परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील. पण त्यांना ते सापडणार नाहीत.
13 當那日,美貌的處女 和少年的男子必因乾渴發昏。
१३त्यावेळी, सुंदर तरुण-तरुणी तहानेने दुर्बल होतील.
14 那指着撒馬利亞牛犢起誓的說: 但哪,我們指着你那裏的活神起誓; 又說:我們指着別是巴的神道起誓。 這些人都必仆倒,永不再起來。
१४जे शोमरोनाच्या पापाची शपथ वाहतात, आणि ‘हे दाना’, तुझा परमेश्वर जिवंत आहे, असे म्हणतात, आणि बैर-शेब्याचा देव जिवंत आहे, असे म्हणतात, ते पडतील, आणि ते परत कधीही उठणार नाहीत.”

< 阿摩司書 8 >