< 列王紀下 24 >

1 約雅敬年間,巴比倫王尼布甲尼撒上到 猶大;約雅敬服事他三年,然後背叛他。
यहोयाकीमाच्या काळात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यहूदात आला. यहोयाकीमाने तीन वर्षे त्याचे मांडलिकत्व पत्करले आणि नंतर फितूर होऊन त्याने बंड केले.
2 耶和華使迦勒底軍、亞蘭軍、摩押軍,和亞捫人的軍來攻擊約雅敬,毀滅猶大,正如耶和華藉他僕人眾先知所說的。
यहोयाकीमविरुध्द परमेश्वराने खास्दी, अरामी, मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या टोळ्या पाठवल्या. आपल्या संदेष्ट्यांकरवी परमेश्वराने जे घडेल म्हणून सांगितले होते आणि त्याप्रमाणेच घडत होते. यहूदाच्या संहारासाठी या टोळ्या होत्या.
3 這禍臨到猶大人,誠然是耶和華所命的,要將他們從自己面前趕出,是因瑪拿西所犯的一切罪;
यहूदा आपल्या नजरेसमोरुन नाहीसा व्हावा म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने हे झाले. मनश्शेची पापे याला कारणीभूत होती.
4 又因他流無辜人的血,充滿了耶路撒冷;耶和華決不肯赦免。
मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे यरूशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती.
5 約雅敬其餘的事,凡他所行的都寫在猶大列王記上。
यहोयाकीमाने बाकी जे काही केले त्याची नोंद “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात आहे.
6 約雅敬與他列祖同睡。他兒子約雅斤接續他作王。
यहोयाकीमाच्या मृत्यूनंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा यहोयाखीन राज्य करु लागला.
7 埃及王不再從他國中出來;因為巴比倫王將埃及王所管之地,從埃及小河直到幼發拉底河都奪去了。
मिसरच्या नदीपासून फरात नदीपर्यंत, पूर्वी मिसरच्या ताब्यात असलेला सगळा प्रदेश बाबेलाच्या राजाने बळकावल्यामुळे मिसरचा राजा मिसरदेश सोडून आला नाही.
8 約雅斤登基的時候年十八歲,在耶路撒冷作王三個月。他母親名叫尼護施她,是耶路撒冷人以利拿單的女兒。
यहोयाखीन राजा झाला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर तीन महिने राज्य केले. याच्या आईचे नाव नेहूष्टा. ती यरूशलेमेच्या एलनाथानची मुलगी.
9 約雅斤行耶和華眼中看為惡的事,效法他父親一切所行的。
यहोयाखीनाने आपल्या वडिलांप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने गैर वर्तन केले.
10 那時,巴比倫王尼布甲尼撒的軍兵上到耶路撒冷,圍困城。
१०यावेळी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारभाऱ्यांनी यरूशलेम नगराला वेढा दिला.
11 當他軍兵圍困城的時候,巴比倫王尼布甲尼撒就親自來了。
११नंतर नबुखद्नेस्सर बाबेलचा राजा या नगरात आला.
12 猶大王約雅斤和他母親、臣僕、首領、太監一同出城,投降巴比倫王;巴比倫王便拿住他。那時是巴比倫王第八年。
१२यहूदाचा राजा यहोयाखीन बाबेलच्या या राजाच्या भेटीला आला. यहोयाखीनाची आई, त्याचे कारभारी, वडिलधारी मंडळी, सरदार हेही लोक त्याच्याबरोबर होते. तेव्हा बाबेलच्या राजाने यहोयाखीनाला आपल्या ताब्यात घेतले. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी हे झाले.
13 巴比倫王將耶和華殿和王宮裏的寶物都拿去了,將以色列王所羅門所造耶和華殿裏的金器都毀壞了,正如耶和華所說的;
१३यरूशलेमेच्या परमेश्वराच्या मंदिरातली आणि राजवाड्यातली सर्व मौल्यवान चीजवस्तू नबुखद्नेस्सरने हस्तगत केली. इस्राएलाचा राजा शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली सर्व सुवर्णपात्रे त्याने मोडून तोडून टाकली. हे परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच झाले.
14 又將耶路撒冷的眾民和眾首領,並所有大能的勇士,共一萬人,連一切木匠、鐵匠都擄了去;除了國中極貧窮的人以外,沒有剩下的;
१४नबुखद्नेस्सरने यरूशलेमेमधील सगळी वडिलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांस त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब मनुष्य वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही.
15 並將約雅斤和王母、后妃、太監,與國中的大官,都從耶路撒冷擄到巴比倫去了;
१५यहोयाखीनाला नबुखद्नेस्सरने बाबेलला कैदी म्हणून नेले. राजाची आई, स्त्रिया, सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित लोक यांनाही यरूशलेमेत त्याचे कैदी होते.
16 又將一切勇士七千人和木匠、鐵匠一千人,都是能上陣的勇士,全擄到巴比倫去了。
१६सात हजाराचे सैन्य, एक हजार कुशल कामगार आणि कारागीर यांनाही त्याने नेले. हे सर्व लोक युध्दात वाकबगार, तयार होते. त्यांना राजाने बाबेलला कैदी म्हणून नेले.
17 巴比倫王立約雅斤的叔叔瑪探雅代替他作王,給瑪探雅改名叫西底家。
१७बाबेलाच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनाचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.
18 西底家登基的時候年二十一歲,在耶路撒冷作王十一年。他母親名叫哈慕她,是立拿人耶利米的女兒。
१८सिद्कीया राज्य करु लागला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर अकरा वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्ना शहरातील यिर्मया याची मुलगी.
19 西底家行耶和華眼中看為惡的事,是照約雅敬一切所行的。
१९सिद्कीया यहोयाकीमाप्रमाणेच वर्तनाने वाईट होता. परमेश्वराच्या आज्ञेविरुध्द तो वागला.
20 因此耶和華的怒氣在耶路撒冷和猶大發作,以致將人民從自己面前趕出。
२०तेव्हा परमेश्वराने संतापाने यरूशलेम आणि यहूदा यांची हकालपट्टी केली. नंतर सिद्कीयाने बाबेलाच्या राज्याविरूद्ध बंडखोरी केली.

< 列王紀下 24 >