< 歷代志下 17 >
1 亞撒的兒子約沙法接續他作王,奮勇自強,防備以色列人,
१आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र इस्राएलाशी तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटाने आपले बळ वाढवले.
2 安置軍兵在猶大一切堅固城裏,又安置防兵在猶大地和他父亞撒所得以法蓮的城邑中。
२त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या आसाने काबीज केलेल्या एफ्राइमाच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने तटबंदी असलेली ठाणी वसवली.
3 耶和華與約沙法同在;因為他行他祖大衛初行的道,不尋求巴力,
३यहोशाफाटाला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. तो बआल देवतेच्या भजनी लागला नाही.
4 只尋求他父親的上帝,遵行他的誡命,不效法以色列人的行為。
४आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही.
5 所以耶和華堅定他的國,猶大眾人給他進貢;約沙法大有尊榮資財。
५परमेश्वराने यहोशाफाटाकरवी राज्य बळकट केले. यहूदाच्या लोकांनी यहोशाफाटासाठी नजराणे आणले त्यामुळे त्यास धन तसेच बहुमान मिळाला.
6 他高興遵行耶和華的道,並且從猶大除掉一切邱壇和木偶。
६परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटाचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्चस्थाने आणि अशेरा देवीच्या मूर्ती त्याने काढून टाकल्या.
7 他作王第三年,就差遣臣子便‧亥伊勒、俄巴底、撒迦利雅、拿坦業、米該亞往猶大各城去教訓百姓。
७आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून यहूदी लोकांस शिकवण द्यायला पाठवले. बेन-हईल, ओबद्या, जखऱ्या, नथनेल आणि मीखाया हे ते सरदार होते.
8 同着他們有利未人示瑪雅、尼探雅、西巴第雅、亞撒黑、示米拉末、約拿單、亞多尼雅、多比雅、駝‧巴多尼雅,又有祭司以利沙瑪、約蘭同着他們。
८त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असाएल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवीचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले.
9 他們帶着耶和華的律法書,走遍猶大各城教訓百姓。
९हे सरदार, लेवी आणि याजक सर्व लोकांस शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातील गावोगावी जाऊन ते लोकांस शिकवत गेले.
10 耶和華使猶大四圍的列國都甚恐懼,不敢與約沙法爭戰。
१०यहूदाच्या आसपासच्या राजसत्तांनी परमेश्वराची धास्ती घेतली, त्यामुळे त्यांनी यहोशाफाटाबरोबर युध्द केले नाही.
11 有些非利士人與約沙法送禮物,納貢銀。阿拉伯人也送他公綿羊七千七百隻,公山羊七千七百隻。
११कित्येक पलिष्टयांनी यहोशाफाटासाठी चांदीच्या भेटी आणल्या. काही अरबी शेळ्यामेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे सात हजार सातशे मेंढेरे आणि सात हजार सातशे बोकड त्यास दिले.
१२यहोशाफाटाचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारांची नगरे बांधली.
13 他在猶大城邑中有許多工程,又在耶路撒冷有戰士,就是大能的勇士。
१३यहूदाच्या नगरात त्याची भरपूर कामे चालत असत. यरूशलेमामध्ये यहोशाफाटाने चांगली बळकट, धीट लढाऊ माणसेही ठेवली.
14 他們的數目,按着宗族,記在下面:猶大族的千夫長押拿為首率領大能的勇士-三十萬;
१४आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे यहूदातील सरदार असे अदना हा तीन लाख सैनिकांचा सेनापती होता.
15 其次是,千夫長約哈難率領大能的勇士-二十八萬;
१५यहोहानानाच्या हाताखाली दोन लाख ऐंशी हजार सैनिक होते.
16 其次是,細基利的兒子亞瑪斯雅(他為耶和華犧牲自己)率領大能的勇士-二十萬。
१६जिख्रीचा पुत्र अमस्या हा त्या खालोखाल दोन लाख योध्दाचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.
17 便雅憫族,是大能的勇士以利雅大率領拿弓箭和盾牌的-二十萬;
१७बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत दोन लाख सैनिक धनुष्यबाण आणि ढाल वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता.
१८यहोजाबादाकडे युध्दसज्ज असे एक लाख ऐंशी हजार पुरुष होते.
19 這都是伺候王的,還有王在猶大全地堅固城所安置的不在其內。
१९ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. याखेरीज यहूदाच्या सर्व नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.