< 诗篇 65 >
1 大卫的诗歌,交与伶长。 神啊,锡安的人都等候赞美你; 所许的愿也要向你偿还。
१दाविदाचे स्तोत्र हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो; तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल.
२जो तू प्रार्थना ऐकतोस, त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते.
३दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे. आमचे अपराध तर तूच क्षमा करशील.
4 你所拣选、使他亲近你、住在你院中的, 这人便为有福! 我们必因你居所、你圣殿的美福知足了。
४ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे, याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे. तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ.
5 拯救我们的 神啊,你必以威严秉公义应允我们; 你本是一切地极和海上远处的人所倚靠的。
५हे आमच्या तारणाऱ्या देवा, जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस, तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस.
६कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून, पर्वत दृढ केले आहेत.
7 使诸海的响声和其中波浪的响声, 并万民的喧哗,都平静了。
७तू गर्जणाऱ्या समुद्राला, त्यांच्या लाटांच्या गर्जनेला आणि लोकांचा गलबला शांत करतो.
8 住在地极的人因你的神迹惧怕; 你使日出日落之地都欢呼。
८जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात; तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस.
9 你眷顾地,降下透雨, 使地大得肥美。 神的河满了水; 你这样浇灌了地, 好为人预备五谷。
९तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस; तू तिला फारच समृद्ध करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस.
10 你浇透地的犁沟,润平犁脊, 降甘霖,使地软和; 其中发长的,蒙你赐福。
१०तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस; तू तिचे उंचवटे सपाट करतोस; तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस
11 你以恩典为年岁的冠冕; 你的路径都滴下脂油,
११तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस; तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो.
१२रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत.
13 草场以羊群为衣; 谷中也长满了五谷。 这一切都欢呼歌唱。
१३कुरणांनी कळप पांघरले आहेत; दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत. ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत.