< 诗篇 148 >
1 你们要赞美耶和华! 从天上赞美耶和华, 在高处赞美他!
१परमेश्वराची स्तुती करा. आकाशातून परमेश्वराची स्तुती करा; उंचामध्ये त्याची स्तुती करा.
२त्याच्या सर्व देवदूतांनो त्याची स्तुती करा; त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3 日头月亮,你们要赞美他! 放光的星宿,你们都要赞美他!
३सूर्य व चंद्रहो त्याची स्तुती करा; तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
४आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.
5 愿这些都赞美耶和华的名! 因他一吩咐便都造成。
५ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.
6 他将这些立定,直到永永远远; 他定了命,不能废去。
६त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली; त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही.
७पृथ्वीवरून परमेश्वराची स्तुती करा. तुम्ही समुद्रातील प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो,
८अग्नी आणि गारा, बर्फ आणि धुके, त्याचे वचन पूर्ण करणारे सर्व वादळी वारा,
९पर्वत आणि सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू,
१०जंगली आणि पाळीव प्राणी, सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी,
११पृथ्वीवरचे राजे आणि सर्व राष्ट्रे, अधिपती आणि पृथ्वीतले सर्व न्यायाधीश,
12 少年人和处女, 老年人和孩童, 都当赞美耶和华!
१२तरुण पुरुष आणि तरुण स्रिया, वृद्ध आणि मुले दोन्ही,
13 愿这些都赞美耶和华的名! 因为独有他的名被尊崇; 他的荣耀在天地之上。
१३ही सर्व परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत, कारण केवळ त्याचेच नाव उंचावलेले आहे; आणि त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर पसरविले आहे.
14 他将他百姓的角高举, 因此他一切圣民以色列人, 就是与他相近的百姓,都赞美他! 你们要赞美耶和华!
१४त्याने आपल्या लोकांचे शिंग उंचाविले आहे; कारण तो आपल्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याच्याजवळ असलेल्या इस्राएलाच्या लोकांस स्तुतीपात्र आहे. परमेश्वराची स्तुती करा.