< 诗篇 109 >
1 大卫的诗,交与伶长。 我所赞美的 神啊, 求你不要闭口不言。
१दाविदाचे स्तोत्र हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको.
2 因为恶人的嘴和诡诈人的口已经张开攻击我; 他们用撒谎的舌头对我说话。
२कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात; ते माझ्याविरूद्ध खोटे बोलतात.
३त्यांनी मला वेढले आहे आणि माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगतात. आणि ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात.
४माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात. पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.
५मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट, आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली.
6 愿你派一个恶人辖制他, 派一个对头站在他右边!
६या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम; त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव.
7 他受审判的时候, 愿他出来担当罪名! 愿他的祈祷反成为罪!
७जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो; त्याची प्रार्थना पापच मानली जावो.
८त्याचे दिवस थोडे होवोत; दुसरा त्याचा अधिकार घेवो;
९त्याची मुले पितृहीन आणि त्याची पत्नी विधवा होवो.
10 愿他的儿女漂流讨饭, 从他们荒凉之处出来求食!
१०त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत.
11 愿强暴的债主牢笼他一切所有的! 愿外人抢他劳碌得来的!
११सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कमाई परके लुटून घेवोत;
१२त्यांना कोणीही दया देऊ नये; त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये.
१३त्याचे वंशज कापून टाकली जावोत; पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो.
14 愿他祖宗的罪孽被耶和华记念! 愿他母亲的罪过不被涂抹!
१४परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो. त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत.
15 愿这些罪常在耶和华面前, 使他的名号断绝于世!
१५परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत; परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको.
16 因为他不想施恩, 却逼迫困苦穷乏的和伤心的人, 要把他们治死。
१६कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही, परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत व धैर्य खचलेल्यांचा वध केला.
17 他爱咒骂,咒骂就临到他; 他不喜爱福乐,福乐就与他远离!
१७त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला. त्याने आशीर्वादाचा द्वेष केला; म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत.
18 他拿咒骂当衣服穿上; 这咒骂就如水进他里面, 像油入他的骨头。
१८त्याने त्याच्या वस्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्र पांघरले, आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात, तेलासारखे त्याच्या हाडात आले.
१९त्याचे शाप त्यास पांघरावयाच्या वस्राप्रमाणे होवो, ते नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे तो त्यास वेढून राहो.
20 这就是我对头和用恶言议论我的人 从耶和华那里所受的报应。
२०माझ्या आरोप्यास, माझ्याविरूद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ आहे
21 主—耶和华啊,求你为你的名恩待我; 因你的慈爱美好,求你搭救我!
२१हे परमेश्वरा, माझा प्रभू, कृपा करून तुझ्या नावाकरता मला वागवून घे. कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे म्हणून मला वाचव.
२२कारण मी पीडित आणि गरजवंत आहे, आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे.
२३मी संध्याकाळच्या सावल्यांप्रमाणे दिसेनासा झालो आहे; मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे.
24 我因禁食,膝骨软弱; 我身上的肉也渐渐瘦了。
२४उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत; मी त्वचा आणि हाडे असा होत आहे.
२५माझा विरोध्यास मी निंदेचा विषय झालो आहे, ते जेव्हा माझ्याकडे बघतात, तेव्हा आपले डोके हालवतात.
26 耶和华—我的 神啊,求你帮助我, 照你的慈爱拯救我,
२६हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर; तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझा उध्दार कर.
27 使他们知道这是你的手, 是你—耶和华所行的事。
२७हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की, ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस.
28 任凭他们咒骂,惟愿你赐福; 他们几时起来就必蒙羞, 你的仆人却要欢喜。
२८जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे; जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील, परंतु तुझा सेवक आनंदी होईल.
29 愿我的对头披戴羞辱! 愿他们以自己的羞愧为外袍遮身!
२९माझे विरोधी वस्राप्रमाणे लाज पांघरतील, आणि ते त्यांची लाज झग्याप्रमाणे पांघरतील.
30 我要用口极力称谢耶和华; 我要在众人中间赞美他;
३०मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन; लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन.
31 因为他必站在穷乏人的右边, 要救他脱离审判他灵魂的人。
३१कारण तो पीडितांना धमकी देणाऱ्यांपासून, त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो.