< 约书亚记 10 >

1 耶路撒冷王亚多尼·洗德听见约书亚夺了艾城,尽行毁灭,怎样待耶利哥和耶利哥的王,也照样待艾城和艾城的王,又听见基遍的居民与以色列人立了和约,住在他们中间,
यहोशवाने आय नगर जिंकून त्याचा कसा पूर्णपणे नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले, पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी समेट करून त्यांच्यामध्ये राहत आहेत, हे सर्व यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने ऐकले होते.
2 就甚惧怕;因为基遍是一座大城,如都城一般,比艾城更大,并且城内的人都是勇士。
तेव्हा यरूशलेमातील लोक फार भयभीत झाले, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजकीय नगरासारखे मोठे होते. ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष पराक्रमी योद्धे होते.
3 所以耶路撒冷王亚多尼·洗德打发人去见希伯 王何咸、耶末王毗兰、拉吉王雅非亚,和伊矶伦王底璧,说:
मग यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर यांना निरोप पाठवला,
4 “求你们上来帮助我,我们好攻打基遍,因为他们与约书亚和以色列人立了和约。”
“वर माझ्याकडे येऊन मला मदत करा, आपण गिबोनाला मार देऊ; कारण त्याने यहोशवाशी व इस्राएल लोकांशी समेट केला आहे.”
5 于是五个亚摩利王,就是耶路撒冷王、希伯 王、耶末王、拉吉王、伊矶伦王,大家聚集,率领他们的众军上去,对着基遍安营,攻打基遍。
तेव्हा यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्यांच्याशी लढू लागले.
6 基遍人就打发人往吉甲的营中去见约书亚,说:“你不要袖手不顾你的仆人,求你速速上来拯救我们,帮助我们,因为住山地亚摩利人的诸王都聚集攻击我们。”
हे पाहून गिबोनातल्या मनुष्यांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरील मदतीचा हात काढून घेऊ नको; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.
7 于是约书亚和他一切兵丁,并大能的勇士,都从吉甲上去。
तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला.”
8 耶和华对约书亚说:“不要怕他们;因为我已将他们交在你手里,他们无一人能在你面前站立得住。”
परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नको; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.”
9 约书亚就终夜从吉甲上去,猛然临到他们那里。
यहोशवा गिलगालाहून सारी रात्र चालत चढून जाऊन त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला
10 耶和华使他们在以色列人面前溃乱。约书亚在基遍大大地杀败他们,追赶他们,在伯·和 的上坡路击杀他们,直到亚西加和玛基大。
१०आणि परमेश्वर देवाने इस्राएलापुढे शत्रूंत गोंधळ उडवला. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.
11 他们在以色列人面前逃跑,正在伯·和 下坡的时候,耶和华从天上降大冰雹在他们身上,直降到亚西加,打死他们。被冰雹打死的,比以色列人用刀杀死的还多。
११ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मरण पावले.
12 当耶和华将亚摩利人交付以色列人的日子,约书亚就祷告耶和华,在以色列人眼前说: 日头啊,你要停在基遍; 月亮啊,你要止在亚雅 谷。
१२परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा देवाशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.”
13 于是日头停留,月亮止住, 直等国民向敌人报仇。 这事岂不是写在雅煞珥书上吗?日头在天当中停住,不急速下落,约有一日之久。
१३तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचा बदला घेईपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.
14 在这日以前,这日以后,耶和华听人的祷告,没有像这日的,是因耶和华为以色列争战。
१४असा दिवस त्यापुर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
15 约书亚和以色列众人回到吉甲的营中。
१५मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.
16 那五王逃跑,藏在玛基大洞里。
१६ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.
17 有人告诉约书亚说:“那五王已经找到了,都藏在玛基大洞里。”
१७मक्केदा येथील गुहेत ते पाच राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले.
18 约书亚说:“你们把几块大石头滚到洞口,派人看守,
१८तेव्हा यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर मनुष्यांचा पहारा बसवा.
19 你们却不可耽延,要追赶你们的仇敌,击杀他们尽后边的人,不容他们进自己的城邑,因为耶和华—你们的 神已经把他们交在你们手里。”
१९पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांस ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांत जाऊ देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.
20 约书亚和以色列人大大杀败他们,直到将他们灭尽;其中剩下的人都进了坚固的城。
२०यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले; पण त्यांच्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले.
21 众百姓就安然回玛基大营中,到约书亚那里。没有一人敢向以色列人饶舌。
२१मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले; इस्राएलाविरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही.
22 约书亚说:“打开洞口,将那五王从洞里带出来,领到我面前。”
२२मग यहोशवा म्हणाला, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या.”
23 众人就这样行,将那五王,就是耶路撒冷王、希伯 王、耶末王、拉吉王、伊矶伦王,从洞里带出来,领到约书亚面前。
२३त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले.
24 带出那五王到约书亚面前的时候,约书亚就召了以色列众人来,对那些和他同去的军长说:“你们近前来,把脚踏在这些王的颈项上。”他们就近前来,把脚踏在这些王的颈项上。
२४ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर लढाईवर गेलेल्या योद्ध्यांच्या सेनानायकांना म्हणाला, “पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.
25 约书亚对他们说:“你们不要惧怕,也不要惊惶。应当刚强壮胆,因为耶和华必这样待你们所要攻打的一切仇敌。”
२५यहोशवा त्यांना म्हणाला, “भिऊ नका, कचरू नका, बलवान व निर्भय व्हा; कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूचे परमेश्वर असेच करील.”
26 随后约书亚将这五王杀死,挂在五棵树上。他们就在树上直挂到晚上。
२६नंतर यहोशवाने त्यांना ठार मारून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर टांगलेले होते.
27 日头要落的时候,约书亚一吩咐,人就把尸首从树上取下来,丢在他们藏过的洞里,把几块大石头放在洞口,直存到今日。
२७सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरविले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहेत.
28 当日,约书亚夺了玛基大,用刀击杀城中的人和王;将其中一切人口尽行杀灭,没有留下一个。他待玛基大王,像从前待耶利哥王一样。
२८त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्यांचा व त्याच्या राजाचा पूर्णपणे नाश केला; त्यांच्याबरोबर तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचाही त्याने नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.
29 约书亚和以色列众人从玛基大往立拿去,攻打立拿。
२९मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलांना बरोबर घेऊन यहोशवा लीब्नावर चालून गेला व लिब्नाच्याविरुद्ध त्यांनी लढाई केली;
30 耶和华将立拿和立拿的王也交在以色列人手里。约书亚攻打这城,用刀击杀了城中的一切人口,没有留下一个。他待立拿王,像从前待耶利哥王一样。
३०परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्यातल्या सर्व जिवंत प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यांच्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.
31 约书亚和以色列众人从立拿往拉吉去,对着拉吉安营,攻打这城。
३१त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला. त्याने त्यासमोर तळ दिला आणि त्याच्याविरुध्द लढला.
32 耶和华将拉吉交在以色列人的手里。第二天约书亚就夺了拉吉,用刀击杀了城中的一切人口,是照他向立拿一切所行的。
३२परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्याचा त्याने तलवारीने नाश केला.
33 那时基色王荷兰上来帮助拉吉,约书亚就把他和他的民都击杀了,没有留下一个。
३३तेव्हा गेजेराचा राजा होरम लाखीशाला मदत देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्यास व त्याच्या लोकांस एवढा मार दिला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.
34 约书亚和以色列众人从拉吉往伊矶伦去,对着伊矶伦安营,攻打这城。
३४मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले.
35 当日就夺了城,用刀击杀了城中的人。那日,约书亚将城中的一切人口尽行杀灭,是照他向拉吉一切所行的。
३५त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशातल्याप्रमाणे तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला.
36 约书亚和以色列众人从伊矶伦上希伯 去,攻打这城,
३६मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला. आणि ते त्याच्याशी लढले;
37 就夺了希伯 和属希伯 的诸城邑,用刀将城中的人与王,并那些城邑中的人口,都击杀了,没有留下一个,是照他向伊矶伦所行的,把城中的一切人口尽行杀灭。
३७त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यातले सर्व प्राणी यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचा समूळ नाश केला.
38 约书亚和以色列众人回到底璧,攻打这城,
३८नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरास चालून गेला आणि त्याच्याविरुध्द लढला.
39 就夺了底璧和属底璧的城邑,又擒获底璧的王,用刀将这些城中的人口尽行杀灭,没有留下一个。他待底璧和底璧王,像从前待希伯 和立拿与立拿王一样。
३९त्याने ते तेथला राजा व त्याची सर्व नगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला. तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. कोणालाही जिवंत राहू दिले नाही हेब्रोनाचे, लिब्ना व त्याचा राजा यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा यांचेही केले.
40 这样,约书亚击杀全地的人,就是山地、南地、高原、山坡的人,和那些地的诸王,没有留下一个。将凡有气息的尽行杀灭,正如耶和华—以色列的 神所吩咐的。
४०या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशांचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे यांना काबीज केले; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक जिवंत गोष्टीचा त्याने समूळ नाश केला.
41 约书亚从加低斯·巴尼亚攻击到迦萨,又攻击歌珊全地,直到基遍。
४१यहोशवाने तलवारीने हल्ला करून कादेश-बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलूख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत त्याने मारला.
42 约书亚一时杀败了这些王,并夺了他们的地,因为耶和华—以色列的 神为以色列争战。
४२हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
43 于是约书亚和以色列众人回到吉甲的营中。
४३मग यहोशवा आणि त्याच्याबरोबर सर्व इस्राएल गिलगाल येथील छावणीकडे माघारी आले.

< 约书亚记 10 >