< 创世记 21 >
1 耶和华按着先前的话眷顾撒拉,便照他所说的给撒拉成就。
१परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेकडे लक्ष दिले, आणि परमेश्वराने सारेला वचन दिल्याप्रमाणे केले.
2 当亚伯拉罕年老的时候,撒拉怀了孕;到 神所说的日期,就给亚伯拉罕生了一个儿子。
२अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर राहिली, त्यास जी नेमलेली वेळी देवाने सांगितली होती त्या वेळी त्याच्यापासून सारेला मुलगा झाला.
३अब्राहामाला जो मुलगा सारेपासून झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले.
4 以撒生下来第八日,亚伯拉罕照着 神所吩咐的,给以撒行了割礼。
४देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहामाने त्याचा मुलगा इसहाक आठ दिवसाचा झाल्यावर त्याची सुंता केली.
५इसहाकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता.
6 撒拉说:“神使我喜笑,凡听见的必与我一同喜笑”;
६सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो प्रत्येकजण माझ्याबरोबर हसेल.”
7 又说:“谁能预先对亚伯拉罕说‘撒拉要乳养婴孩’呢?因为在他年老的时候,我给他生了一个儿子。”
७आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!”
8 孩子渐长,就断了奶。以撒断奶的日子,亚伯拉罕设摆丰盛的筵席。
८मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले, आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.
9 当时,撒拉看见埃及人夏甲给亚伯拉罕所生的儿子戏笑,
९मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा इश्माएल जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले.
10 就对亚伯拉罕说:“你把这使女和她儿子赶出去!因为这使女的儿子不可与我的儿子以撒一同承受产业。”
१०म्हणून सारा अब्राहामाला म्हणाली, “या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा, माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर वारस होणार नाही.”
११त्याच्या मुलामुळे या गोष्टीचे अब्राहामाला फार दुःख झाले.
12 神对亚伯拉罕说:“你不必为这童子和你的使女忧愁。凡撒拉对你说的话,你都该听从;因为从以撒生的,才要称为你的后裔。
१२परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “मुलाकरता व तुझ्या दासी करता दुःखी होऊ नकोस. तुला ती या बाबतीत जे काही सांगते, ते तिचे सर्व म्हणणे ऐक. कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल.
13 至于使女的儿子,我也必使他的后裔成立一国,因为他是你所生的。”
१३मी त्या दासीच्या मुलाचेही राष्ट्र करीन, कारण तो तुझा वंशज आहे.”
14 亚伯拉罕清早起来,拿饼和一皮袋水,给了夏甲,搭在她的肩上,又把孩子交给她,打发她走。夏甲就走了,在别是巴的旷野走迷了路。
१४अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली.
१५कातडी पिशवीतील पाणी संपले, तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले.
16 自己走开约有一箭之远,相对而坐,说:“我不忍见孩子死”,就相对而坐,放声大哭。
१६नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले “मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको.” ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली.
17 神听见童子的声音; 神的使者从天上呼叫夏甲说:“夏甲,你为何这样呢?不要害怕, 神已经听见童子的声音了。
१७देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस, तुझा मुलगा जेथे आहे तेथून त्याचा आवाज देवाने ऐकला आहे
18 起来!把童子抱在怀中,我必使他的后裔成为大国。”
१८ऊठ, मुलाला उचलून घे. आणि त्यास धैर्य दे, मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करीन.”
19 神使夏甲的眼睛明亮,她就看见一口水井,便去将皮袋盛满了水,给童子喝。
१९मग देवाने हागारेचे डोळे उघडले आणि तिने पाण्याची विहीर पाहिली. ती गेली आणि पाण्याची कातडी पिशवी भरून घेतली आणि मुलाला पाणी प्यायला दिले.
20 神保佑童子,他就渐长,住在旷野,成了弓箭手。
२०देव त्या मुलाबरोबर होता आणि तो वाढला. तो रानात राहिला आणि तिरंदाज बनला.
21 他住在巴兰的旷野;他母亲从埃及地给他娶了一个妻子。
२१तो पारानाच्या रानात राहिला आणि त्याच्या आईने त्यास मिसर देशातील मुलगी पत्नी करून दिली.
22 当那时候,亚比米勒同他军长非各对亚伯拉罕说:“凡你所行的事都有 神的保佑。
२२त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली, ते म्हणाले, “तू जे काही करतोस त्यामध्ये देव तुझ्याबरोबर आहे;
23 我愿你如今在这里指着 神对我起誓,不要欺负我与我的儿子,并我的子孙。我怎样厚待了你,你也要照样厚待我与你所寄居这地的民。”
२३म्हणून आता येथे देवाची शपथ वाहा की, तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या मुलांशी किंवा माझ्या वंशजाशी खोटेपणाने वागणार नाहीस. जसा मी तुझ्याशी करार करून विश्वासूपणाने राहिलो, तसाच तू माझ्याशी व ज्या या माझ्या देशात तू राहिलास त्याच्याशी राहशील.”
२४आणि अब्राहाम म्हणाला, “मी शपथ वाहतो.”
25 从前,亚比米勒的仆人霸占了一口水井,亚伯拉罕为这事指责亚比米勒。
२५मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहामाने अबीमलेखाकडे तक्रार केली.
26 亚比米勒说:“谁做这事,我不知道,你也没有告诉我,今日我才听见了。”
२६अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्यापूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस. आजपर्यंत मी हे ऐकले नव्हते.”
27 亚伯拉罕把羊和牛给了亚比米勒,二人就彼此立约。
२७म्हणून अब्राहामाने मेंढरे व बैल घेतले आणि अबीमलेखास दिले आणि त्या दोन मनुष्यांनी करार केला.
२८अब्राहामाने अबीमलेखाला कळपातील सात कोकरे वेगळी करून त्यांच्यापुढे ठेवली.
29 亚比米勒问亚伯拉罕说:“你把这七只母羊羔另放在一处,是什么意思呢?”
२९अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “ही सात कोकरे तू वेगळी करून ठेवली याचा अर्थ काय आहे?”
30 他说:“你要从我手里受这七只母羊羔,作我挖这口井的证据。”
३०त्याने उत्तर दिले, “तू ही कोकरे माझ्याकडून स्विकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल.”
31 所以他给那地方起名叫别是巴,因为他们二人在那里起了誓。
३१तेव्हा त्याने त्या जागेला बैर-शेबा असे नाव दिले, कारण त्या ठिकाणी त्या दोघांनी शपथ वाहून वचन दिले.
32 他们在别是巴立了约,亚比米勒就同他军长非各起身回非利士地去了。
३२त्यांनी बैर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे पलिष्ट्यांच्या देशात परत गेले.
33 亚伯拉罕在别是巴栽上一棵垂丝柳树,又在那里求告耶和华—永生 神的名。
३३अब्राहामाने बैर-शेबा येथे एक एशेल झाड लावले. तेथे सनातन देव परमेश्वर याचे नाव घेऊन त्याने प्रार्थना केली.
३४अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस परदेशी म्हणून राहिला.