< 创世记 14 >

1 当暗拉非作示拿王,亚略作以拉撒王,基大老玛作以拦王,提达作戈印王的时候,
त्यानंतर शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर आणि गोयिमाचा राजा तिदाल यांच्या दिवसात असे झाले की,
2 他们都攻打所多玛王比拉、蛾摩拉王比沙、押玛王示纳、洗扁王善以别,和比拉王;比拉就是琐珥。
त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेला ज्याला सोअर म्हणतात त्याच्या राजांशी युद्ध केले.
3 这五王都在西订谷会合;西订谷就是盐海。
नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात.
4 他们已经事奉基大老玛十二年,到十三年就背叛了。
त्यांनी बारा वर्षे कदार्लागोमरची सेवा केली होती, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्या विरूद्ध बंड केले.
5 十四年,基大老玛和同盟的王都来在亚特律·加宁,杀败了利乏音人,在哈麦杀败了苏西人,在沙微·基列亭杀败了以米人,
त्यानंतर चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे आले आणि त्यांनी अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाईम लोकांस, हाम येथे जूजीम लोकांस, शावेह किर्याथाईम येथे एमीम या लोकांस मारले.
6 在何利人的西珥山杀败了何利人,一直杀到靠近旷野的伊勒·巴兰。
आणि होरी यांना त्यांच्या सेईर डोंगराळ प्रदेशात जे एल पारान रान आहे तेथपर्यंत त्यांनी जाऊन मारले.
7 他们回到安·密巴,就是加低斯,杀败了亚玛力全地的人,以及住在哈洗逊·他玛的亚摩利人。
नंतर ते मागे फिरून एन-मिशपात म्हणजे कादेश येथे आले. आणि त्यांनी सर्व अमालेकी देशाचा आणि तसेच हससोन-तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला.
8 于是所多玛王、蛾摩拉王、押玛王、洗扁王,和比拉王(比拉就是琐珥)都出来,在西订谷摆阵,与他们交战,
नंतर सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा ह्यांनी लढाईची तयारी केली.
9 就是与以拦王基大老玛、戈印王提达、示拿王暗拉非、以拉撒王亚略交战;乃是四王与五王交战。
एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्या विरूद्ध ते लढले. हे चार राजे पाच राजांविरूद्ध लढले.
10 西订谷有许多石漆坑。所多玛王和蛾摩拉王逃跑,有掉在坑里的,其余的人都往山上逃跑。
१०सिद्दीम खोऱ्यात पूर्ण डांबराने भरलेले खड्डे होते आणि सदोम व गमोराचे राजे पळून जाताना त्यामध्ये पडले, जे राहिले ते डोंगराकडे पळून गेले.
11 四王就把所多玛和蛾摩拉所有的财物,并一切的粮食都掳掠去了;
११अशा रीतीने शत्रूंनी सदोम व गमोरा नगराच्या सर्व वस्तू आणि त्यांचा सर्व अन्नसाठा लुटून घेऊन माघारी गेले.
12 又把亚伯兰的侄儿罗得和罗得的财物掳掠去了。当时罗得正住在所多玛。
१२ते गेले तेव्हा त्यांनी अब्रामाच्या भावाचा मुलगा लोट जो सदोमात राहत होता, त्यालासुद्धा त्याच्या सर्व मालमत्तेसह नेले.
13 有一个逃出来的人告诉希伯来人亚伯兰;亚伯兰正住在亚摩利人幔利的橡树那里。幔利和以实各并亚乃都是弟兄,曾与亚伯兰联盟。
१३तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले. तो तर अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडांजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते.
14 亚伯兰听见他侄儿被掳去,就率领他家里生养的精练壮丁三百一十八人,直追到但,
१४जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.
15 便在夜间,自己同仆人分队杀败敌人,又追到大马士革左边的何把,
१५त्याने रात्री त्याचे लोक त्यांच्याविरुद्ध विभागले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि दिमिष्काच्या डावीकडे होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
16 将被掳掠的一切财物夺回来,连他侄儿罗得和他的财物,以及妇女、人民也都夺回来。
१६अब्रामाने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाइक लोट आणि त्याच्या वस्तू, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले.
17 亚伯兰杀败基大老玛和与他同盟的王回来的时候,所多玛王出来,在沙微谷迎接他;沙微谷就是王谷。
१७मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम परत आला तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्यास भेटायला बाहेर आला. या खोऱ्याला राजाचे खोरे असे म्हणतात.
18 又有撒冷王麦基洗德带着饼和酒出来迎接;他是至高 神的祭司。
१८देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परात्पर देवाचा याजक होता.
19 他为亚伯兰祝福,说:“愿天地的主、至高的 神赐福与亚伯兰!
१९त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.
20 至高的 神把敌人交在你手里,是应当称颂的!”亚伯兰就把所得的拿出十分之一来,给麦基洗德。
२०परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्यास सर्वाचा दहावा भाग दिला.
21 所多玛王对亚伯兰说:“你把人口给我,财物你自己拿去吧!”
२१सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त माझे लोक द्या आणि तुमच्यासाठी वस्तू घ्या.”
22 亚伯兰对所多玛王说:“我已经向天地的主—至高的 神耶和华起誓:
२२अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा उत्पन्नकर्ता परमेश्वर परात्पर देव याच्यासमोर आपला हात उंचावून मी वचन देतो की,
23 凡是你的东西,就是一根线、一根鞋带,我都不拿,免得你说:‘我使亚伯兰富足!’
२३तुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील, ‘अब्रामाला मी धनवान केले.’
24 只有仆人所吃的,并与我同行的亚乃、以实各、幔利所应得的分,可以任凭他们拿去。”
२४माझ्या या तरुणांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढे पुरे. आनेर, अष्कोल व मम्रे हे जे पुरुष माझ्याबरोबर गेले त्यांना आपापला वाटा घेऊ द्या.”

< 创世记 14 >