< 以斯帖记 5 >
1 第三日,以斯帖穿上朝服,进王宫的内院,对殿站立。王在殿里坐在宝座上,对着殿门。
१तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता.
2 王见王后以斯帖站在院内,就施恩于她,向她伸出手中的金杖;以斯帖便向前摸杖头。
२त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या दुसऱ्या टोकाला स्पर्श केला.
3 王对她说:“王后以斯帖啊,你要什么?你求什么,就是国的一半也必赐给你。”
३मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी तुला काय पाहिजे? तुझी विनंती काय आहे? अगदी अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”
4 以斯帖说:“王若以为美,就请王带着哈曼今日赴我所预备的筵席。”
४एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हामानास घेऊन यावे.”
5 王说:“叫哈曼速速照以斯帖的话去行。”于是王带着哈曼赴以斯帖所预备的筵席。
५तेव्हा राजा म्हणाला, “हामानाला ताबडतोब घेऊन या म्हणजे आम्हास एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल.” राजा आणि हामान मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास गेले.
6 在酒席筵前,王又问以斯帖说:“你要什么,我必赐给你;你求什么,就是国的一半也必为你成就。”
६ते द्राक्षरस घेत असताना पुन्हा राजाने एस्तेरला विचारले “तुझी विनंती काय आहे? ते तुला मिळेल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरीसुध्दा ती मान्य होईल.”
७एस्तेरने उत्तर दिले, “माझे मागणे आणि माझी विनंती हीच आहे की,
8 我若在王眼前蒙恩,王若愿意赐我所要的,准我所求的,就请王带着哈曼再赴我所要预备的筵席。明日我必照王所问的说明。”
८जर महाराजाची माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानासाठी आणखी एक मेजवानी देईन आणि मग राजाने म्हटल्याप्रमाणे मला जे काय मागायचे ते मी उद्या मागेन.”
9 那日哈曼心中快乐,欢欢喜喜地出来;但见末底改在朝门不站起来,连身也不动,就满心恼怒末底改。
९हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मन: स्थितीत निघाला. पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कांपला नाही, हे हामानाने पाहिले तेव्हा त्यास त्याचा अतिशय संताप आला.
10 哈曼暂且忍耐回家,叫人请他朋友和他妻子细利斯来。
१०तरीही आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि त्याची पत्नी जेरेश यांना त्याने बोलावले.
11 哈曼将他富厚的荣耀、众多的儿女,和王抬举他使他超乎首领臣仆之上,都述说给他们听。
११आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला हामानाने सुरुवात केली आणि आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वोच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारु लागला.
12 哈曼又说:“王后以斯帖预备筵席,除了我之外不许别人随王赴席。明日王后又请我随王赴席;
१२हामान म्हणाला, “एवढेच नाहीतर एस्तेर राणीने आज दिलेल्या मेजवानीला राजाबरोबर माझ्याशिवाय कोणालाच बोलावले नाही. आणि पुन्हा उद्याही राणीने मला राजाबरोबर बोलावले आहे.
13 只是我见犹大人末底改坐在朝门,虽有这一切荣耀,也与我无益。”
१३पण तो यहूदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला पाहत आहे तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे.”
14 他的妻细利斯和他一切的朋友对他说:“不如立一个五丈高的木架,明早求王将末底改挂在其上,然后你可以欢欢喜喜地随王赴席。”哈曼以这话为美,就叫人做了木架。
१४मग हामानाची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र त्यास म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक खांब उभारायला सांग, तो पन्नास हात उंच असावा. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयाला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.” हामानाला ही गोष्ट आवडली म्हणून त्याने फाशीचा खांब करून घेतला.