< 詩篇 84 >
1 詠【朝拜上主歌】 科辣黑子孫的詩歌,交於樂官。調寄「加特」。 萬軍的上主,您的居所是多麼可愛!
१कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे सेनाधीश परमेश्वरा, तू जेथे राहतो ती जागा किती लावण्यपूर्ण आहे.
2 我的心靈對上主的宮庭渴慕及緬懷。我的心靈及肉身向生活的天主踴躍歡欣。
२माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे.
3 萬軍的上主,我的君王,我的天主,麻雀您的祭壇找到了住所,燕子也找到了安置 幼雛的窩巢。
३हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे.
4 上主,居住在您的殿宇,時常讚美您的,真是有福!
४जे तुझ्या घरात राहतात ते आशीर्वादित आहेत; ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील.
5 那以您作為自己的助佑,居心朝聖的人,真是有福!
५ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे, ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे.
6 他們把他們經過的乾谷變為水泉,並以初雨給乾谷披上祝福的衣衫。
६शोकाच्या खोऱ्यातून जाताना, त्यांना पिण्याच्या पाण्याचे झरे सापडतात. आगोटीचा पाऊस त्यांना पाण्याच्या तलावाने झाकतो.
७ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात; त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते.
8 萬軍的上主,求您允我的懇請,雅各伯的天主,求您側耳傾聽!
८हे सेनाधीश परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; याकोबाच्या देवा, मी जे सांगतो ते माझे ऐक.
9 天主,我們的護盾,求您目睹,請對您的受傅者予以回顧。
९हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव.
10 的確在您的聖殿逗留一日,遠勝過在別處逗千日。我寧願站在我天主殿宇的門限,我不願逗留在惡人帳幕的裏面,
१०तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे.
11 因為上主天主是護盾。上主常廣施恩愛和光榮;祂對行為正直純潔的人,從來不會拒絕賜祐賜福。
११कारण परमेश्वर देव आमचा सूर्य आणि ढाल आहे; परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो; जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.
१२हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे.