< 詩篇 76 >
1 阿撒夫的詩歌。交與樂官,樂用絃樂。 天主在猶大地顯示了自己,在以色列廣揚了自己的名。
१मुख्य संगीतकारासाठी, तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र गीत. यहूदात देव कळाला आहे, इस्राएलामध्ये त्याचे नाव थोर आहे.
2 他在撒冷支搭了自己的帳幕,他在熙雍建豎了自己的住處。
२शालेममध्ये त्याचा मंडप आहे, आणि सियोनेत त्याची गुहा आहे.
3 在那裏他打斷了弓上的火箭,他也打斷了槍柄、盾牌與刀劍。
३तेथे त्याने धनुष्य बाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रे मोडून टाकली आहेत.
४तू जेथे शत्रूंना ठार केलेस, त्या डोंगरावरून उतरताना तू तेजस्वी चमकतोस आणि तुझे वैभव प्रकट करतोस.
5 膽大的人,全被剝奪,一睡不醒,那勇敢的將領,手臂麻木失靈。
५जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत, ते झोपी गेले आहेत, सर्व योद्धे असहाय्य झाले आहेत.
6 雅各伯的天主,因您的恐嚇,戰車戰馬都驚得麻木僵直。
६हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने, रथ आणि घोडे दोन्हीपण झोपी गेलेत आहेत.
७तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?
८तुझा न्याय आकाशातून आला, आणि पृथ्वी भयभित व नि: शब्द झाली.
९देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला, न्याय अमलांत आणण्यास उठला आहे.
10 人 的狂怒成全您的光榮,幸免憤怒的人,向您祝頌。
१०खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे.
11 您們許願要向上主您們的天主還願;他四周的人都要向可敬者供奉祭獻。
११परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा, ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या सभोवती आहात, त्यास भेटी आणा.
१२तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो. पृथ्वीच्या राजांना तो भयावह असा आहे.