< 詩篇 71 >

1 上主,我託庇於您,使我永不受羞恥!
हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नको.
2 求您照您的正義解救我,求您側耳聽我,並拯救我。
मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव; तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर.
3 求您作我避難的石壁,獲救的堡壘;因為您是我的磐石,我的堡壘,
मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस.
4 我的天主,求您由邪惡人的手中將我救出,由兇蠻橫暴者的掌中將我救走。
हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव, अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव.
5 因為,我主上主,您是我的期望,您是我自幼唯一的仰仗。
कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे.
6 我自從在母胎中,就仰賴您,尚在母懷中,您就是我的託庇;我全心的希望,時時寄托於您。
गर्भापासून तूच माझा आधार आहेस; माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल.
7 許多人都把我視作妖怪,您卻作了我有力的仰賴。
पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे; तू माझा बळकट आश्रय आहे.
8 我要滿口讚頌您,我要終日稱揚您。
माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने आणि सन्मानाने भरलेले असो.
9 在我年老時,求您不要拋棄我,在我氣力衰弱時,不要遠離我。
माझ्या वृद्धापकाळात मला दूर फेकून देऊ नको; जेव्हा माझी शक्ती कमी होईल तेव्हा मला सोडू नकोस.
10 不然,我的仇敵必要對我說,窺伺我命的人,互相私議說:
१०कारण माझे शत्रू माझ्याविरूद्ध बोलत आहेत; जे माझ्या जिवावर पाळत ठेवून आहेत ते एकत्रित येऊन कट करत आहेत.
11 天主已經捨棄了他,您們追擊他,捕捉他! 因為無人再來救他。
११ते म्हणाले देवाने त्यास सोडले आहे; त्याचा पाठलाग करा आणि त्यास घ्या, कारण त्यास सोडवणारा कोणीही नाही.
12 天主,求您不要遠離我,我的天主,請快來救我。
१२हे देवा, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस; माझ्या देवा, माझ्या मदतीला त्वरा कर!
13 願那些謀殺我命的人,走頭無路,願那些設法害我的人,蒙受恥辱!
१३जे माझ्या जिवाचे विरोधी आहेत त्यांना लज्जित आणि नष्ट कर, जे माझे अनिष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना धिक्काराने आणि मानहानीने झाकून टाक.
14 我仍不斷地期望您,每日加倍地讚美您。
१४पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन, आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन.
15 我的口要傳述您的寬仁,終日不斷宣揚您的救恩,因為我不知它們的數額。
१५माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे आणि तारणाविषयी सांगत राहील, जरी मला ते समजले नाही.
16 我要稱揚我天主的偉大奇能,上主,我要傳述您獨有的寬仁。
१६प्रभू परमेश्वराच्या सामर्थ्यी कृत्याबरोबर मी त्यांच्याकडे जाईन; मी तुझ्या, केवळ तुझ्याच, नितिमत्वाचा उल्लेख करीन.
17 天主,遠自我幼年時,您已教導了我。直至今日,我仍宣示您的微妙。
१७हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस; आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे.
18 天主,即我髮白年老,求您也不要離棄我,直至我將您的威力宣示給這一代,將您的奇能傳述給下一代。
१८खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे, तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत, हे देवा, मला सोडू नको.
19 天主,您的仁慈直達天際,天主,您行大事誰可比您?
१९हे देवा, तुझे नितिमत्व खूप उंच आहे; हे देवा, ज्या तू महान गोष्टी केल्या आहेस, त्या तुझ्यासारखा कोण आहे?
20 您曾使我經歷許多困苦艱難,現今仍然是您使我生活安全,並提拔我脫離了地下的深淵。
२०ज्या तू मला अनेक भयंकर संकटे दाखवली, तो तू मला पुन्हा जिवंत करशील; आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.
21 求您增加我的尊位,求您再來給我安慰。
२१तू माझा सन्मान वाढव; आणि पुन्हा वळून माझे सांत्वन कर.
22 我的天主,我要彈琴,歌頌您的忠誠,以色列的聖者,我要鼓瑟,向您歌頌。
२२मी सतारीवरही तुला धन्यवाद देईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्रोत्रे गाईन.
23 當我歌頌您時,我的雙唇要歡騰,我那為您所救的靈魂,也要歡騰。
२३मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील.
24 我的舌頭也要終日伸述您的仁慈,因為謀圖傷害我的人蒙受了羞恥。
२४माझी जीभदेखील दिवसभर तुझ्या नितिमत्वाविषयी बोलेल; कारण ज्यांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला ते लज्जित झाले आहेत, आणि गोंधळून गेले आहेत.

< 詩篇 71 >