< 詩篇 62 >
1 達味詩歌,交與樂官耶杜通。 我的靈魂只安息在天主內,因為我的救援是由天主而來。
१दाविदाचे स्तोत्र माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे; त्याच्यापासून माझे तारण येते.
2 只有天主是我的磐石,我的救星;天主是我的堡壘,我決不搖傾。
२तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही.
3 你們不斷侵犯一人,並向他一人衝擊,如衝擊將倒的牆,將坍的壁,要到幾時?
३झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या, एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजण किती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल?
4 實在,他們企圖要將我由我高位上推下;他們喜愛謊言,口雖祝福,心卻辱罵。
४त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात; त्यांना लबाड बोलण्यास आवडते; ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणातून शाप देतात.
5 我的靈魂,你只安息在天主內,因為我的期望全是由祂而來。
५हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर; कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.
6 只有天主是我的磐石,我的救星;天主是我的堡壘,我決不搖傾。
६तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही.
7 我的救恩,我的光榮全在於天主,我的堡壘,我的護衛全基於天主。
७माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे; माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे.
8 百姓,你們該常向他表示依靠,該在他面前吐露你們的心竅:因為天主確是我們的避難所。
८अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा; त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा; देव आमच्यासाठी आश्रय आहे.
9 庶民不過是口氣,顯貴也無非是幻影;放在天秤上必然浮起,合計還比氣輕。
९खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत; वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत.
10 莫依勢凌人,不要以劫掠驕矜;如財寶日增,也不要掛念在心。
१०दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका; आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका;
११देव एकदा बोलला आहे, मी दोनदा ऐकले आहे, सामर्थ्य देवाचे आहे.
12 威能屬於天主;慈愛也非你莫屬,因你按照各人的行為給予酬報。
१२हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे. कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.