< 詩篇 52 >

1 達味訓誨歌,交與樂官。 作於厄東人多厄格前去報告撒烏耳,說達味到了阿希默肋客家後。 你這以作惡端為能事的人!你為什麼竟以罪為榮為幸?
दाविदाचे स्तोत्र हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस? देवाच्या कराराची विश्वसनियता प्रत्येक दिवशी येते.
2 你這欺詐的人,你時時懷念邪惡,你的舌頭正如一把銳利的剃刀。
अरे कपटाने कार्य करणाऱ्या, तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी नाशाची योजना करते.
3 你愛作惡超過行善,你愛說謊超過真言。
तुला चांगल्यापेक्षा वाईटाची, आणि प्रामाणिकपणे बोलण्यापेक्षा असत्याची अधिक आवड आहे.
4 你這欺詐虛偽的舌頭,凡人的話你都羨慕。
तू कपटी जीभे, तुला दुसऱ्यांचा नाश करणारे शब्द आवडतात.
5 為此,天主必要消滅你,把你永遠廢去,要帳幕中拔去你,由人間將你根除。
त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील; तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील.
6 義人見了必然害怕,要對他冷嘲熱笑說:
नितीमानसुद्धा ते पाहतील आणि घाबरतील; ते त्याच्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील,
7 請看,這便是那不以天主作自己保障的人,他只依恃自己的財富,以邪惡而誇勝。
पाहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, पण आपल्या विपुल संपत्तीवर भरवसा ठेवला, आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले.
8 我卻好像天主殿中的茂盛橄欖樹,全心信賴天主的慈愛,一直到永久。
पण मी तर देवाच्या घरात हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; माझा देवाच्या कराराच्या विश्वसनीयतेवर सदासर्वकाळ आणि कायम भरवसा आहे.
9 上主行了此事,我要永遠稱頌你,我要在你聖徒的面前,讚揚你美善的聖名。
कारण ज्या गोष्टी तू केल्या आहेत, त्यासाठी मी तुझ्या विश्वासणाऱ्यांच्या समक्षेत सर्वकाळ तुझे उपकार मानीन. आणि तुझ्या नावात आशा ठेवली आहे कारण ते चांगले आहे.

< 詩篇 52 >